RSSकोकण प्रान्त

अज्ञात, अप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी डॉ. हेडगेवार

लेखमाला – विश्वगुरु भारत – संघाचे अंतिम ध्येय – भाग २

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशव बळीराम हेडगेवार(KESHAV BALIRAM HEDGEWAR) यांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS)स्थापना केली. समाजसेवेत महत्वपूर्ण भूमिका निभावताना, संस्कृती, मूल्ये आणि श्रद्धांचे संरक्षण करताना आणि मातृभूमीप्रती जाणीवा जागृत करताना संघाने प्रसिद्धीची वा प्रकाशझोतात येण्याची चिंता कधीच केली नाही

त्या काळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या आणि अन्य मार्गांनी लढणाऱ्या सगळ्या राष्ट्रीय समूहांत आणि पक्षांत संघाचे स्वयंसेवक सक्रीय स्वरुपात सहभागी होते. संघाने प्रसिद्धीची धडपड केली नाही म्हणून त्याचा स्वातंत्र्ययुद्धात सहभागच नव्हता अशी कल्पना करणे हे खरोखरच मूर्खपणाचे ठरेल. खरे तर संघ ही एकमेव संघटना होती जिच्या स्वयंसेवकांनी भारतभरात स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला आणि त्याचवेळी समाजाचा मोठा घटक असणाऱ्या हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी कार्य केले.

इतिहासाची हाताळणी

संघाच्या कोणतेही श्रेय न घेता, नि:स्वार्थीपणे आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहत काम करण्याच्या पद्धतीची नोंद अनेक वृत्तसंस्थांनी घेतली. स्वयंसेवक कोणतीही चर्चा न करता नैसर्गिक आपत्तींत नुकसान झालेल्या नागरिकांना अथकपणे मदत करताना दिसून आले. मदतकार्य करणाऱ्या अनेक सरकारी संस्था अयशस्वी ठरल्या पण त्यांनी संघाच्या या सहभागाला कधीही प्रसिद्धी दिली नाही. याचाच फायदा घेत संघविरोधी शक्ती त्याचप्रमाणे स्वार्थी व निहित स्वारस्य असणाऱ्या मंडळींनी संघाच्या स्वातंत्र्ययुद्धातील सहभागावर प्रश्नचिह्न उभे केले. या व्यक्तींनी आपणच स्वातंत्र्ययुद्धातील नेते असल्याचे वेळोवेळी मांडले. वास्तविक स्वातंत्र्ययुद्द्धाची ठिणगी ही १८५७ सालीच पडली होती आणि ही चळवळ एका मोठ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या गटाने पुढे नेली. यात वासुदेव बळवंत फडके यांचे शेतकरी आंदोलन, सतगुरु राम सिंग यांचे कुका आंदोलन, अनुशिलन समिती, गदर पार्टी, अभिनव भारत, हिंदू महासभा, आर्य समाज, आझाद हिंद सेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक क्रांतिकारी संघटना यांचा समावेश होता. परंतु, संघविरोधी शक्तींनी एका पक्षाचे उदात्तीकरण करण्यासाठी इतिहासाची तोडमोड करून त्याला विकृत रूप दिले. आणि यात केवळ संघच नव्हते तर अनेक सशस्त्र संघटना आणि आर्य समाजासारख्या संघटनांच्या कार्याला कमी लेखले. त्यांनी केवळ लाखो स्वातंत्रसैनिकांचा नव्हे तर ज्यांनी देशासाठी बलिदान दिले अशांचाही अपमान केला आणि त्याचवेळी इंग्रजांच्या गुलामीत, स्वातंत्र्याशी तडजोड करून जे आनंदाने जगले त्यांना जास्तीत जास्त समाजापुढे आणले केले. स्वातंत्र्य चळवळी सुरु असताना या व्यक्तीना ब्रिटीश शासनाकडून चांगली वागणूक मिळत होती. आंदोलने करताना एक काठीही त्यांना खावी लागली नाही. स्वातंत्र्यसैनिकांच्या सशस्त्र लढा आणि बलिदान यांना जणू काही किंमतच नाही अशी मांडणी त्यांनी वारंवार केली.

जन्मजात लढवय्या  

संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे स्वातंत्र्यलढ्यातील(INDIPENDENCE) योगदान दुर्लक्षित करून त्यांच्यावर खरेतर अन्यायच करण्यात आला. डाव्या विचारसरणीला समर्पित असलेल्या इतिहासात कॉंग्रेस पक्ष वगळता अन्य कोणत्याही समूहाचे योगदान डावलण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसचे योगदान हे लज्जास्पद होते व ते त्यांना झाकायचे होते. ऐतिहासिक घटना आणि त्यांतील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान इतिहासात मांडले गेले असते तर कॉंग्रेसचे इंग्रज सरकारशी असणारे लागेबांधे प्रकाशात आले असते आणि स्वातंत्र्यसैनिकांची त्यांनी केलेली फसवणूकही. स्वातंत्र्ययुद्धातील समर्पित पण दुर्लक्षित असे सेनानी असणारे डॉ. हेडगेवार हे जन्मजात लढवैय्ये होते. जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला.

त्यांनी आत्मकथन लिहिले नाही वा स्वतःबद्दल वृत्तपत्रात छापूनही आणवले नाही. त्यांच्या बालवयातील अनेक घटना त्यांचे लढवय्येपण आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी असणरी वचनबद्धता प्रकट करतात. सीताबर्डी किल्ल्यावर भगवा फडकविण्याची त्यांची योजना, राणी व्हिक्टोरियाच्या जन्मदिवस आणि राज्याभिषेकाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांवर टाकलेला बहिष्कार या विशेष उल्लेखनीय घटना. कलकत्याला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते अनुशिलन समिती या करांतकरी संघटनेत सक्रीय होते. सार्वजनिक ठिकाणी सभाधीटपणे बोलणे आणि कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी दिसून आलेले संघटन कौशल्य, स्वातंत्र्यासाठी स्वयंसेवकांना संघटीत करणे आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव आणणे हे त्यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान होते.  या घटनांमधून त्यांचे स्वातंत्र्याप्रती असणारे समर्पणही दिसून आले. डॉक्टरांना दोन वेळा एकेका वर्षासाठी कठोर कारावासात जावे लागले. संघाच्या स्थापनेनंतर स्वयंसेवकांना त्यांनी गांधीजींच्या आंदोलनात सहभागी होण्याची परवानगी दिली. हजारो संघस्वयंसेवकांनी तुरुंगवासात नरकयातना भोगल्या आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या निमंत्रणावरून २६ जानेवारी १९२९ रोजी सर्व संघशाखांवर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. डॉ. हेडगेवार, स्वा. सावरकर आणि सुभाषचंद्र बोस हे तिघेही सशस्त्र क्रांतिकारी लढ्याच्या आणि आझाद हिंद सेनेच्या स्थापनेच्या बाजूने होते. संघ स्वयंसेवकांनी १९४२च्या छोडो भारत आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  

(माहिती पुढील लेखात)

स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण भूमिका

आता जे स्वातंत्र्यलढ्यापासून अलिप्त असल्याचा संघावर आरोप करीत आहेत तेच आपण इंग्रजांच्या हाताखाली काम करीत असल्याचे भासवून इंग्रजांकडे भिक्षा मागत होते. सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, स्वा. सावरकर, त्रेलोक्यानाथ शेरणी, कर्तारसिंग सराबा, रस बिहारी बोस, श्यामजी कृष्ण वर्मा, लाल हरदयाळ, यतींद्रनाथ सन्याल, राम प्रसाद बिस्मिल आणि चंद्रशेखर आझाद अशा नेत्यांना ते स्वतःच्या(मवाळ कॉंग्रेसच्या) ध्येयापासून विचलित झालेले मानत असत. संघाच्या सगळ्याच स्वातंत्र्यसैनिकांना संपूर्ण पाठींबा होता. संघाच्या स्वयंसेवकांनी अहिंसात्मक आणि सशस्त्र अशा दोन्ही चळवळीमध्ये संघाकडे वा स्वतःकडे श्रेय न घेता सहभाग घेतला होता.   

१८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर हिंदूजागृती आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन झाले हे ऐतिहासिक तथ्य आहे. या बदलामध्ये आपल्याला नुकसान पोहोचविण्याची क्षमता असल्याचे इंग्रजांच्या लक्षात आले. या पुनरुज्जीवनाकडे लक्ष ठेवण्यासाठी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादाची संकल्पना आणि परदेशी नागरिकांबद्दल असणारा जनक्षोभ याबाबत संभ्रम निर्माण व्हावा यासाठी ऍलन ऑक्टव्हीयन ह्यूम या कट्टर ख्रिस्ती माणसाने १८८५मध्ये कॉंग्रेसची स्थापना केली. (या कॉंग्रेस पक्षाला स्वातंत्र्यचळवळीची काही देणेघेणे नव्हते. उलट राष्ट्रवाद जागृतीच्या विरोधात असणाऱ्या इंग्रजांसाठी तयार करण्यात आलेली ढाल होती. ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली राजकीय आकांक्षा असणाऱ्या ठराविक स्थानिकांना भेटण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.)

ब्रिटीश सरकार(BRITISH SARKAR) आणि मिशनऱ्यांचे षड्यंत्र यांना हरवणे, राष्ट्राचे रक्षण करणे  यासाठी सशक्त हिंदू संघटना स्थापन करण्याच्या हेतूने डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या स्वातंत्रसैनिकांसाठी समर्पित असणारी संघटना म्हणून संघ स्थापन झाला होता.

              क्रमशः    

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)      

**

Back to top button