NewsRSS

एक लाख गरजू विद्यार्थ्यांना करणार वह्यांच्या संचाचे वितरण

सेवा(SEWA) फाऊंडेशनचे दानशूरांना मदतीचे आवाहन

मुंबई, दि. १२ नोव्हेंबर : सेवा सहयोग(SEWA FOUNDATION) फाऊंडेशनच्यावतीने यावर्षी एक लाख(1LAC) शालेय गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचा संच पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता जास्तीत जास्त दानशूरांनी किमान २०० रुपयांची आर्थिक मदत करावी, असे आवाहन फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. 

ग्रामीण, दुर्ग, डोंगराळ भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता सेवाभावी  वृत्तीने दरवर्षी सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून शैक्षणिक संच पुरविला जातो. यामध्ये दप्तर, वह्या, रंगपेटी, ब्रश, कंपासपेटी आदी शैक्षणिक संचाचा समावेश आहे.  हा उपक्रम गेली १० वर्ष सुरु आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ही मदतीची निर्मिती केली जाते आणि ही मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सेवा सहयोग फांऊडेशन करते.

 परंतु यावर्षी  कोविड -१९ (COVID-19)च्या सावटामुळे  यामध्ये बदल करून इयत्ता पाचवी ते दहावीच्या  प्रत्येक विद्यार्थ्याला दहा  वह्यांचा सेट देण्याचे ठरविण्यात आले आहे. यावर्षी ४७१ शाळांकडून  गरजू विद्यार्थ्यांची यादी पाठविण्यात आली असून त्यानुसार एक लाख मुलांपर्यंत वह्यांचा सेट पुरविण्यात येणार आहे. आतापर्यंत एक लाख रुपये किंमतीच्या वह्यांचे संच वाटप करण्यात आले असल्याचे फाऊंडेशनचे रमेश देवळे यांनी सांगितले.

दरम्यान, समाजातील दानशूरांनी या सेवाकार्यात सहभाग घेऊन निधी, रोख किंवा धनादेशाद्वारे सेवा सहयोग फाऊंडेशनच्या बँक खात्यात जमा करावा, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे. निधी पाठविण्यासाठी तपशिल :  स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा – सांताक्रुझ (पूर्व), खाते क्र.  30896190916, IFS CODE:SBIN0013265. किंवा ऑनलाईन मदत ९३२२२ ५२४५३ या क्रमांकावर पाठवावी.  

Back to top button