National SecurityNews

ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा यशस्वी लक्ष्यभेद

नवी दिल्ली, दि. २६ नोव्हेंबर :   भारताने  ‘ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ’ क्षेपणास्त्राची अंदमान-निकोबार बेटावर यशस्वी  चाचणी घेतली. घेण्यात आलेल्या चाचणीत या क्षेपणास्त्राने ३०० किमी च्या परिक्षेत्रातील आपले लक्ष्य नष्ट  केले.   डीआरडीओकडून विकसित झालेल्या या क्षेपणास्त्राची स्ट्राइक रेंज आता ४५० कि.मी.झाली आहे.

ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आपल्या श्रेणीत जगातील सर्वात वेगवान कार्यरत यंत्रणा आहे. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने झेपावते. तसेच ते सुखोई विमानातूनही डागण्यात येते. हे क्षेपणास्त्र डागल्यास शत्रूला सावध होण्याचा वेळ मिळणार नाही. जेवढ्या वेळात त्यांची डिफेन्स सिस्टिम हा हल्ला रोखण्यासाठी कार्यरत होऊ शकते, तेवढ्या वेळात हे मिसाईल आपले लक्ष्य उदध्वस्त करू शकते. गेल्या दोन महिन्यांत डीआरडीओने अनेक शौर्य क्षेपणास्त्र यंत्रणांची चाचणी करण्यात यश मिळविले आहे. त्यामध्ये अनेक नवीन आणि अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा आहेत. ज्यामध्ये ८०० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर अचूक लक्ष्यभेद करू शकणाऱ्या यंत्रणांचासुद्धा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button