EducationNews

नॅकचे मानांकन ही विद्यार्थी हितोपयोगी निर्णय घेण्याची संधी – प्रेरणा पवार

मुंबई, दि. १  सप्टेंबर  :   मुंबई विद्यापीठाला नॅक कडून मिळालेल्या  ‘ए-प्लस प्लस’ मानांकनामुळे विद्यार्थी हिताचे नवीन निर्णय घेण्याची संधी विद्यापीठाला मिळेल, असे मत अभिनंदन पर वक्तव्यात कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्ययन परिषद अर्थात नॅकने मुंबई विद्यापीठाला ‘ए –प्लस, प्लस’ दर्जा बहाल केला आहे. नॅकच्या मूल्यांकनात मुंबई विद्यापीठाला राज्यातील सर्व विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ३.६५ गुण मिळाले आहेत. त्यानंतर नॅकनं मुंबई विद्यापीठाला ‘ए- प्लस प्लस’ श्रेणी जाहीर केली असून पुढील सहा वर्षांसाठी ही श्रेणी कायम राहणार आहे. याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रदेश मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठातील विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन करते.

Back to top button