CultureHinduismNews

हिंदू द्वेष्ट्यानां मद्रास उच्च न्यायालयाची सणसणीत चपराक..

nonbelieving nonhindus restricted from entering tamilnadu temples madras high court

मंदिर म्हणजे सहलीचे ठिकाण नव्हे,इतकेच नव्हेतर अहिंदूंना मंदिरात यायचे असेल तर हिंदू धर्मावर विश्वास असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार– मद्रास उच्च न्यायालय…

मंदिर ही एक सामाजिक संस्था आहे. तिथे अनेक प्रकारचे लोक येत असतात, भेटत असतात, चर्चा करतात. प्राचीन काळापासून मंदिरांचा उपयोग हा केवळ देवाचे निवासस्थान या स्वरूपात न करता एक सामाजिक संदर्भ म्हणून केला जायचा. तिथे होणारे उत्सव, समारंभ, जत्रा-यात्रा यांचा उद्देश परिसरातील लोकांनी त्या निमित्ताने एकत्र यावे हाच होता. मंदिराच्या येणाऱ्या भाविकाचे प्रबोधन व्हावे, त्याला काही तत्त्वज्ञान सांगावे, त्याच्या मनाच्या अवस्थांचे प्रातिनिधिक स्वरूप त्याच्या समोर उभे करावे या उद्देशाने केल्या गेल्या. याचाच अर्थ मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकाला वाट दाखवण्याचे, प्रकाश दाखवण्याचे काम ही सर्व प्रतीके वर्षांनुवर्षे करीत आली आहेत.

अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हावा आणि ज्ञानाचा उजेड त्याच्या आयुष्यात पडावा यासाठी केलेला हा सारा खटाटोप होता असे दिसून येते. मंदिरावर असलेली कोणतीही मूर्ती, प्रतिमा, चिन्हे ही केवळ उगाच केलेली नाहीत. त्यांच्यामागे काही तत्त्वज्ञान काही ठाम वैचारिक बठक नक्कीच आहे. या गोष्टींचा मागोवा घेताना तो विचार, ते तत्त्वज्ञान काही प्रमाणात जरी आपल्या मनात भिनले तरीसुद्धा देवाचिये द्वारी झालेली आपली वारी ही निश्चितच प्रकाशमय झाली असे म्हणता येईल. अशा आपल्या आसपास असलेल्या अनेक स्थळांना या निमित्ताने आपण भेट देऊन त्यावरील कलाकुसर, शिल्पकला पाहिली, ते निर्माण करण्यामागची कारणे समजून घेतली तर आपले पर्यटन अधिक समृद्ध होईल, अधिक संपन्न होईल यात शंकाच नाही.

मंदिर धर्म शास्त्राची सांगोपांग चर्चा करण्याचे कारण म्हणजे मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडू सरकार आणि राज्य हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्स (एचआर अँड सीई) विभागाला तामिळनाडूतील पलानी मंदिर (अरुल्मिगु धनदायुथापनीस्वामी मंदिर) आणि त्याच्या उपमंदिरांच्या ध्वजस्तंभाच्या पलीकडे अहिंदूंना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

पलानी हिल मंदिर भक्त संघटनेचे आयोजक डी. सेंथिलकुमार यांच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने सुनावणी केली. या याचिकेमध्ये मंदिरात अहिंदूंना प्रवेश न करण्याबाबतचे प्रतिबंधात्मक फलक आणि चिन्हे लावण्याचे निर्देश द्यावेत, अशी देखील विनंती करण्यात आली होती.

याचिकेवर मदुराई खंडपीठाच्या न्यायमूर्ती एस. श्रीमति यांनी सुनावणी करून निकाल दिला. त्यांनी निकालात म्हटले की, मंदिरे ही सहलीची ठिकाणे नाहीत आणि इतर समुदायांप्रमाणे हिंदूंनाही हस्तक्षेप न करता त्यांचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला ध्वजस्तंभाच्या पलीकडे मंदिराच्या आवारात “गैर-हिंदूंना परवानगी नाही, असे फलक लावावेत” असे निर्देश दिले. कोणत्याही अहिंदू व्यक्तीला मंदिरात प्रवेश करायचा असेल तर अशा व्यक्तीकडून हिंदू धर्म, तेथील चालीरीती आणि मंदिरातील देवदेवतांवर विश्वास असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र घ्यावे लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

मंदिर आणि टेकडीभोवती असे फलक लावल्याने मंदिराच्या गर्भगृहात केवळ दर्शनासाठीच नव्हे तर मंदिराच्या माथ्यावरून दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशी राज्य सरकारची भीती न्यायमूर्तीनी मान्य करण्यास स्पष्टपणे नकार दिला. अहिंदूंवर बंदी न घातल्याने हिंदू आस्तिक आणि उपासकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याने अशा आशंका चुकीच्या आहेत. हिंदूंनाही त्यांच्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे न्यायमूर्तीनी अधोरेखित केले.

हिंदूंच्या भावनांचे रक्षण करण्यास विभाग धर्मादाय अपयशी- मद्रास उच्च न्यायालय..

हिंदू धर्म न मानणाऱ्या अहिंदूंच्या भावनांबद्दल सरकारला काळजी आहे. प्रतिवादी हिंदूंच्या भावनांचे रक्षण करण्यात सरकार अयशस्वी ठरले आहेत. किंबहुना हिंदू धर्म आणि धर्मादाय देणगी विभागाला हिंदू धर्म, हिंदू मंदिरे, त्यातील प्रथा आणि प्रथा, मंदिरातील विधी इत्यादींचे संरक्षण करणे बंधनकारक आहे.

गैर- हिंदूंच्या भावनांबद्दल सरकार सहानुभूती दाखवत आहेत, जे अतिशय चुकीचे आहे. मंदिर प्रवेश प्राधिकरण कायदा, १९४७ हा हिंदू समुदायामध्ये मंदिरांमध्ये प्रवेश देण्याबाबत भेदभाव दूर करण्यासाठी लागू करण्यात आला होता, परंतु हा कायदा गैर-हिंदूंच्या मंदिर प्रवेशाशी अजिबात संबंधित नाही. त्याचप्रमाणे मंदिरांना जाणीवपूर्वक कलम १५ च्या कक्षेत समाविष्ट केले गेले नाही, अशीही महत्त्वाची टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे.

अचेत हिंदू रुपी शरीरात श्रीराम रुपी प्राण विराजमान झाले आहेत आपण एकत्र झाल्यास इतिहास घडवू शकतो असा आत्मविश्वास हिंदू समाजाला जाणवायला लागला आहे. म्हणूनच आज सकल हिंदू समाज आपल्या न्याय हक्कासाठी एकवटला आहे. त्याला अडवण्याची हिंमत कोणाचीही नाही आणि कुणी अडवण्याची हिंमत केल्यास त्याचा कपाळमोक्ष निश्चित…

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की,

देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना ।
सत्य सुंदर मगंलाची नित्य हो आराधना ॥

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना ।
वेदना जाणावयाला जागवू संवेदना ।
दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना ।।

Back to top button