IslamNews

मंदिरात आक्षेपार्ह वस्तू ठेवणाऱ्यांची देवाचा कोप झाल्याच्या भावनेने गुन्ह्याची कबुली

बेंगळुरू, दि. ३ एप्रिल – मंगळुरू येथे कोरगज्जा मंदिराच्या दानपेटीत आक्षेपार्ह वस्तू टाकण्याचे संतापजनक कृत्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल रहीम आणि तौफिक अशी या दोघांची नावे असून ते जोकट्टे गावाचे रहिवासी आहेत. देवाचा कोप झाल्याच्या भावनेतून या दोघांनी मंदिराच्या पुजाऱ्याकडे आपला गुन्हा कबूल केला व पोलिसांपुढे हजर झाले. या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या मित्राचा आकस्मात मृत्यू झाल्याने हा देवाचा कोपच असल्याचे या दोघांना वाटले.  

नवाझ हा त्यांचा मित्रही त्यांच्या या कुकृत्यात सहभागी होता. या तिघांनी मिळून बुधवारी रात्री मंदिराच्या दानपेटीत आक्षेपार्ह वस्तू टाकल्याने नागरिकांत संतापाचे आणि तणावाचे वातावरण होते. नवाझ हा अनपेक्षितपणे गंभीर आजारी पडला. कृत्याचा पश्चात्ताप झालेल्या नवाझने अत्यवस्थ अवस्थेत आपल्या मित्रांना बोलवून शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या स्वामी कोरगज्जा यांची क्षमा मागण्याची विनंती केली. त्यानंतर तौफिक यालाही नवाझप्रमाणे तब्येतीच्या तक्रारींना तोंड द्यावे लागले. आपला त्रास हा देवाने दिलेली शिक्षा आहे असे वाटल्याने त्यांनी मंदिरात येऊन पुजाऱ्याकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अब्दुल आणि तौफिक यांच्यावर भादसं कलम १५३अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मंगलोर पोलीस आयुक्त एन. शिवकुमार म्हणाले की, नवाझ या कृत्यात सहभागी होता. काळी जादू करत होता अशीही माहिती मिळते. तो आजारी पडला तेव्हा त्याने आरोपींना आपला गुन्हा कबूल करण्यास सांगितले.

**

Back to top button