HinduismNews

महिला कीर्तनकार… स्त्री शक्तीचा जागर.

आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांनी गीत रामायणात (geet ramayan) “अयोध्या मनू निर्मित नगरी” हे राजा दशरथाच्या अयोध्येचे वर्णन करणारे अप्रतिम गीत लिहिले आहे…
या गीताच्या एका ओळीत दशरथाच्या तीनही राण्या या “उच्चविद्याविभूषित” होत्या हे दर्शवण्यासाठी गदिमांनी फक्त एकच शब्द वापरला आहे…
“बहुश्रुता” त्या रूपशालिनी अतुलप्रभा सुंदरी…अयोध्या (ayodhya) मनू निर्मित नगरी..

“बहुश्रुता”… ज्यांनी खूप श्रवण केलेले आहे… त्या बहुश्रुता म्हणजे उच्चविद्याविभूषित…

श्रवण हा आपल्या देशात शिक्षणाचा सगळ्यात मोठा राजमार्ग मानला गेल्यामुळे… सहाजिकच भजन, कीर्तन आणि प्रवचन ह्या शिक्षण पद्धती अनादी कालापासून चालू असल्या पाहिजेत…

त्यातल्या त्यात कीर्तन ही शिक्षण पद्धती अत्यंत अनोखी व आकर्षक आहे… एका चांगल्या कीर्तनकारासाठी कीर्तन ही एक कला असते…

कीर्तनात(kirtan) वारकरी कीर्तन (varkari kirtan) व नारदीय कीर्तन( nardiya kirtan) असे दोन प्रकार आहेत… नारदीय कीर्तनात पूर्वरंग व उत्तररंग असे दोन भाग असतात… साधारण दीड तासापर्यंत हे कीर्तन केले जाते…

नारदीय कीर्तन हे एकटाच कीर्तनकार करतो… कीर्तनाच्या विषयाचे सखोल तसेच अद्ययावत ज्ञान, गद्य आणि पद्य यावर पकड, संगीताचे बऱ्यापैकी ज्ञान, विणेसारख्या एखाद्या वाद्य वादनाचे कौशल्य, समय सूचकता, आवाजातील चढउतार तसेच आवाजातील खणखणीतपणा… हे सगळे कसब पणाला लावून त्याला समोर बसलेल्या प्रेक्षकांचे प्रबोधन करता करता त्यांना तास दीड तास जागेवर खिळवून ठेवावे लागते…

नारदीय कीर्तनकार हा खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाचा शिक्षक असतो…

असाच एक नारदीय कीर्तनाचा रोमांचकारी अनुभव कविताताई विभावरी (kavita vibhavari) यांचे कीर्तन ऐकताना येतो… कविताताई एक कसलेल्या नारदीय कीर्तनकार आहेत… स्त्री कीर्तनकार म्हणून त्यांचे शिक्षण काय झाले असेल अशी शंका घेऊ नका… त्या उच्चविद्याविभूषित आहेत… अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले तर M.SC.(Biochemistry)…त्या उत्तम व्याख्यात्या ही आहेत. पालकत्व, एकात्मता, अहंकार आशा अनेकविधी विषयांवर त्यांनी व्याख्यान दिले आहे. समाजप्रबोधनासाठी त्यांनी नारदीय किर्तनाचा मार्ग स्वखुशीने निवडला आहे… त्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे… आपल्या अंगभूत कलाकाराचे गुण त्यांनी कीर्तनासाठी उपयोगात आणले आहेत… त्यांचे कीर्तनाचे विषय देखील राष्ट्रीय असतात… राजमाता जिजाऊ साहेब, वंदनीय मावशी केळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

विशेष म्हणजे एखाद्या देवस्थानाने कीर्तनासाठी बोलावल्यास त्या मिळालेल्या बिदागीवर खुश असतात… कीर्तनाला तरुणांची संख्या लक्षणीय रहाणार असेल तरीही कविता ताई मिळेल त्या बिदागीवर कीर्तनाला आनंदाने तयार होतात… त्यांचा हेतू अत्यंत शुद्ध असतो… राष्ट्रीय विषय तरुणाई पर्यंत पोचावेत…

सोमवार, १२ जून २०२३ रोजी राजमाता जिजाऊ साहेब यांची पुण्यतिथी आहे… आपण कविता ताईंना या विषयावरील कीर्तनासाठी बोलावू शकता… त्यांचे कीर्तन हा एक रोमांचकारी आणि अविस्मरणीय अनुभव असेल हे निश्चित…

कीर्तनासाठी संपर्कासाठी:- कविता ताई
+919821129825

Back to top button