CultureEnvironmentHinduismNews

सकल हिंदू समाजाच्या एकजुटीचा विजय..

श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र परिसरात पर्यटनावर बंदी…

केंद्राकडून अधिसूचना जारी;सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाला मोठे यश..

महान बल ह्या एकजुटीचे.

नकोत आता भांडण तंटे.

एकदिलाने एकजुटीने.

होती कामे जलद गतीने

संघ शक्तीने जादू घडे..

ही कविता येथे देण्याचे कारण म्हणजे संबंध हिंदू समाजाच्या एकजूटीचा विजय झाला आहे.हिंदू समाजाने कमालीची एकजूटता दाखवल्यामुळे आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाले आहे. महत्वाचे म्हणजे झारखंड सरकारच्या या निर्णयाला केंद्र सरकारने केवळ २ तासात स्थगिती दिली आहे.

म्हणतात ना :-Power is given only to those who dare to lower themselves and pick it up. Only one thing matters, one thing; to be able to dare!

श्री सम्मेद शिखरजी (sammed shikharji) या तीर्थक्षेत्राच्या परिसरात पर्यटनाला मुभा देण्याचा जो निर्णय झारखंड सरकारने घेतला होता, त्याला केंद्र सरकारने स्थगिती दिली आहे. तसेच या संपूर्ण विषयाचा आढावा घेण्यासाठी खास समितीही स्थापन करण्यात आली आहे. सम्मेद शिखरजीचा तीर्थक्षेत्र हा दर्जा यापुढेही कायम राखला जाईल, असा निर्वाळा केंद्राने दिला आहे. एवढेच नव्हे; तर तेथील पावित्र्याचे जतन केले जाईल, यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जावी, असेही केंद्र सरकारने झारखंड सरकारला बजावले आहे..

झारखंडमधील पारसनाथ पर्वतावर असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या जैन धर्मीयांच्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सर्वप्रकारच्या पर्यटनावर बंदी घालण्याचे निर्देश केंद्र सरकारने जारी केले आहेत. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सकल हिंदू समाजाने यासंदर्भात केलेले आंदोलन यशस्वी ठरले आहे.

केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी दिल्लीत जैन समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.श्री सम्मेद शिखरजीसह जैन समाजाच्या सर्व धार्मिकस्थळांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांना आश्वासन यादव यांनी यावेळी दिले.तसेच तीर्थस्थळाच्या पावित्र्यासाठी काही गोष्टींना असलेल्या बंदीचे काटेकोर पालन करण्याचे आदेशही झारखंड सरकारला दिले आहेत.

–या गोष्टींवर असणार बंदी

*दारू, अमली पदार्थ आणि मादक पदार्थांची विक्री.

*मोठ्या आवाजात संगीत किंवा लाऊडस्पीकर वाजवणे.

*पाळीव प्राण्यांसह प्रवेश.

*अनधिकृत कॅम्पिंग आणि ट्रेकिंग.

*मांसाहारी पदार्थाची विक्री.

*जलस्रोत, वनस्पती, खनन कार्य , गुहा आणि मंदिर यांचे नुकसान करणाऱ्या सर्व कामांवर बंदी.

श्री सम्मेद शिखरजी हे जैन समुदायाचे धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र व्हावे !

झारखंड सरकारने सम्मेद शिखरजीला जैन समुदायाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले, तर त्यावर विचार होऊ शकतो हे धार्मिक जैन तीर्थक्षेत्र असावे, येथे होणारी सर्वच कामे धार्मिक रीतिरिवाजानुसार व्हावीत. -प्रमाण सागरजी (जैन संत)

दरवर्षी लाखो भाविकांची भेट

दरवर्षी देश-विदेशातील लाखो जैन भाविक येतात. मधुवनातील मंदिरात पूजा करून ते टेकडीच्या शिखरावर जातात. मधुवन ते शिखर म्हणजे डोंगरमाथ्यापर्यंतचा प्रवास हा नऊ किलोमीटरचा आहे. जंगलाने वेढलेल्या पवित्र पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी भाविक पायी किंवा पालखीतून जातात.

तीर्थक्षेत्राचा इतिहास

श्री सम्मेद शिखरजी हे ठिकाण झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात आहे. भौगोलिकदृष्ट्या, ही झारखंडची सर्वात उंच टेकडी असून, ती प्रामुख्याने पारसनाथ टेकडी म्हणून ओळखली जाते. या टेकडीची उंची एक हजार ३५० मीटर आहे. या टेकडीला झारखंडचा हिमालय म्हणून ओळखले जाते. जगभरातील जैन समाज या टेकडीला श्री शिखर आणि सम्मेद शिखरजी म्हणून ओळखतात. या टेकडीच्या पायथ्याशी वसलेले शहर मधुवन म्हणून ओळखले जाते.

आंदोलन मागे

केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर जैन समाजाने आपले आंदोलन मागे घेत. असल्याची घोषणा केली आहे. समाजाचे नेते रसिकलाल शहा यांनी सांगितले की, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट आपण घेतली असून, भारत सरकारने आमच्या मागणीला मान्यता दिली. त्यामुळे आम्ही आमचे आंदोलन मागे घेत आहोत.

झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले तेव्हापासून संपूर्ण देश- विदेशात सरकारच्या या निर्णयाविरोधात मोठा जनक्षोभ उफाळला होता.या निर्णयाच्या निषेधार्थ जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज यांनी मंगळवारी राजस्थानच्या सांगानेरमध्ये उपोषण करत देहत्यागही केला.त्यामुळे सकल समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती.

हिंदू द्वेष्ट्यांनी सदैव याद ठेवावे जेव्हा संपूर्ण हिंदू समाज आत्म-सन्मानासाठी एकवटतो तेव्हा अशक्य पण सहज शक्य होते.

पारसनाथ भगवान की जय …

https://www.esakal.com/desh/sammed-shikhar-shrine-case-central-government-took-its-steps-back-pjp78

Back to top button