RSS

अपूर्ण आणि खंडित स्वातंत्र्य

(लेखमाला विश्वगुरू भारत – १६)


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्या पूर्ण संमतीने आपल्या प्राचीन राष्ट्राची फाळणी केल्यावर ब्रिटिश आपल्या मायदेशी परत गेले. स्वातंत्र्याची भीक मागणारे आणि तडजोड करणारे काँग्रेसजन अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या वेदना आणि दुःखाची तीळमात्र कल्पनाही करू शकले नाहीत. १२०० वर्षे भारतावर असलेले परकीयांचे राज्य या देशाने एका दिवसासाठीही स्वीकारले नाही, उलट सातत्याने प्रतिकार केला. आपल्या राष्ट्रीय आदर्शांकडून या देशाच्या एखाद्या भागात स्वातंत्र्याची मशाल तेवती राहिली नाही असा एकही क्षण आला नाही. प्रत्येक पिढीने स्वातंत्र्याची ही मशाल पुढच्या हातात सोपवण्याचे आणि परकियांना पराभूत करण्याचे कार्य सुरूच ठेवले. पण जेव्हा ही मशाल एका ब्रिटिशाने स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हातात गेली तेव्हा स्वातंत्र्याचा लढा हा भिक्षा आणि तडजोडीत रुपांतरीत झाला. परकीय आक्रमकांच्या आणि रानट्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपल्या प्राचीन राष्ट्राचा एक तुकडा मोडून एक नवीन देश आकाराला आला. रानट्यांचा विजयाचे हे प्रतीक अर्थात पाकिस्तान म्हणजे सध्याच्या काळात मानवी मूल्ये आणि मानवता नामशेष करणाऱ्या रानट्यांचे कुरण आहे. या देशातील दहशतवादाच्या कारखान्यातून दहशतवाद हा वेगाने जगभर पसरतो आहे. फाळणीची किंमत केवळ आपला देशच नव्हे तर अन्य देशही चुकती करत आहेत.

https://www.vskkokan.org/rss/2548/

भारताची फाळणी स्वीकारून काँग्रेसने स्वातंत्र्य सैनिकांच्या पाठीत खुपसला खंजीर

ब्रिटिश साम्राज्याचा सूर्यास्त लवकरच होणार असल्याचा निष्कर्ष १९४५मध्ये द्वितीय जागतिक महायुद्धाच्या शेवटानंतर ब्रिटिश साम्राज्याची धुरा वाहणाऱ्यांनी काढला. युद्धानंतर अनेक राष्ट्रांतील साम्राज्यांतील ब्रिटिशांचे सामर्थ्य आणि सत्ता व नियंत्रणाचे स्रोत संपुष्टात आले. आर्थिक आणि देशांतर्गत निर्बंधांमुळे अनेक राष्ट्रांमधील आपली वसाहतवादी सत्ता मागे घेऊन त्या देशांना ‘स्वतंत्र’ घोषित करावे लागले. १९४६मध्ये ब्रिटिशांनी जॉर्डन सोडले तर १९४७मध्ये पॅलेस्टाईन तर १९४८मध्ये श्रीलंका आणि म्यानमार सोडले. भारतातून सन्मानपूर्वक बाहेर पडण्याची हीच वेळ आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. सुभाषचंद्र बोसांच्या चलो दिल्ली घोषणेने ब्रिटिश भारतीय लष्करात उठाव झाला होता. रा. स्व. संघ, स्वा. सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्याशी झालेल्या गुप्त कराराला अनुसरून लष्करातील सैनिकांनी उठावाच्या हालचाली सुरु केल्या.  

लष्करी प्रशिक्षणानंतर ब्रिटिशांशी लढायचे हा स्पष्ट दृष्टीकोन समोर ठेवून अनेन जवानांनी लष्करात प्रवेश केला. राष्ट्रीय अभिलेखागारातील गुप्तचर संस्थांच्या वर्गीकृत दस्तावेजांमध्ये म्हटले आहे की, आझाद हिंद सेनेच्या जपानच्या पाठिंब्याने भारतात झालेल्या मोर्चाच्या क्रियान्वयनासंबंधी रा. स्व. संघाच्या २० सप्टेंबर १९४३ रोजी नागपुरात झालेल्या गुप्त बैठकीत चर्चा करण्यात आली होती, इतिहासकार देवेंद्र स्वरूप यांनी म्हटले आहे. नौदलातील उठावाने ब्रिटिशांना भयभीत केले होते. असाच उठाव अन्य दलांमध्येही झाला तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तपात होईल असे त्यांना वाटले.

वास्तविक ब्रिटिशांना १९४६च्या आसपासच देश सोडून जायचे होते मात्र ही परिस्थिती हाताळण्याबाबत काँग्रेसला आत्मविश्वास नव्हता व थोड्या काळापुरते ब्रिटिशांनी इथे थांबावे अशी त्यांची इच्छा होती. आपण जून १९४८मध्ये देश सोडत असल्याचे अखेर ब्रिटिशांनी घोषित केले. यामुळे स्वातंत्र्य चळवळी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट झाले. राजकीय स्वातंत्र्याचे नव्हे तर देशात एकता आणि अखंडता कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रीय नेते आणि संस्था-संघटनांपुढे होते.

१२०० वर्षांपूर्वी चेतवलेली स्वातंत्र्याची मशाल काँग्रेसच्या हातात जाण्याचा आव्हानात्मक काळ अखेर आपल्या देशात आला होता. इतिहासाच्या निर्णायक वळणावर काँग्रेस पक्ष हे आव्हान पेलण्यात वाईट पद्धतीने अयशस्वी ठरला.

काँग्रेस पक्षाच्या वयोवृद्ध नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीची मशाल पुढच्या पिढीकडे सोपवण्याऐवजी राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी देशाची फाळणी स्वीकारली. पं. नेहरू म्हणाले होते, आम्ही दमलो होतो, वयोवृद्ध झालो होतो. स्वातंत्र्य संग्राम तसाच सुरू ठेवणे म्हणजे पुन्हा सत्याग्रह आणि तुरुंगात जाणे आले. फाळणी स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. राजकीय पंडितांच्या मते आपण अजून एक वर्ष थांबलो असतो तर आपले अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे स्वप्न नक्की पूर्ण झाले असते. पण फुटिरतावादासाठी आमिष द्या आणि झुका, तुष्टीकरण करा आणि साम्यवादाला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रवादाच्या मूल्यांना तीलांजली द्या या ब्रिटिशांच्या नीतीपुढे काँग्रेस पक्ष हरला.

ब्रिटिशांच्या षडयंत्रात अडकली काँग्रेस

फाळणीपूर्वीच्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार, दत्तोपंत ठेंगडी म्हणाले होते की, इंग्रजांचे भारत सोडणे अपरिहार्यच होते. पण फाळणी टाळणे शक्य होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आंदोलन सुरू ठेवण्यासाठी देशाला साद घातली. लाखो भारतीय अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले. परंतु काँग्रेस, मुस्लीम लीग आणि डाव्या विचारांचे पक्ष यांनी ब्रिटिशांच्या भारतविरोधी षडयंत्रापुढे गुडघे टेकले. फाळणीविरोधी राष्ट्रीय शक्तींनी एकत्र येण्यास सुरुवात केली आणि या शक्ती संघटित होण्यास आणि स्वतःचे बल वाढवण्यास सक्षम आहेत आणि यामुळे आपण आखलेल्या योजनेला धोका पोहोचू शकतो हे काही काळातच ब्रिटिशांच्या लक्षात आले.

तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या मते, अस्तित्वात येणाऱ्या राष्ट्रीय शक्तींचे ब्रिटनला भय वाटत होते आणि त्यांनी ठरलेल्या तारखेच्या दहा महिने आधीच त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. फाळणीला विरोध करणाऱ्या विश्वसनीय आणि बलशाली शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी आणि सर्व प्रश्न सोडविण्यास सक्षम होतो, असे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांनीही मान्य केले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाची फाळणी झाली. ही फक्त एका जमिनीच्या तुकड्याची फाळणी नव्हती. हजारो वर्ष अगणित स्वातंत्र्य सैनिक, संत आणि ईश्वरी आत्म्यांनी पूजलेल्या परमपवित्र अशा भारतमातेच्या मूर्तीचाही भंग यामुळे झाला होता.


पाकिस्तानच्या निर्मितीची घोषणा झाली आणि मोहम्मद अली जिना आणि मुस्लीम लीगने मुस्लीमबहुल परिसरांत कुप्रसिद्ध अशा ‘डायरेक्ट ऍक्शन’ला सुरुवात केली. हिंदूंना प्रचंड मोठ्या नरसंहाराला सामोरे जावे लागले. वंशविच्छेद, प्रचंड नरसंहार, मोठ्या संख्येने हिंदू महिलांवर झालेले बलात्कार, अभूतपूर्व लूट असे अनाचार या काळात घडून आले. प्राप्त माहितीनुसार ३० लाख लोक मारले गेले. १५ ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचे नामांकित प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू जेव्हा खंडीत भारताचा तिरंगा फडकावित होते तेव्हा लाखो हिंदू आणि शीख रक्ताने माखलेल्या सामानासह भारताच्या दिशेने निघाले होते. पाकिस्तानच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेच्या डब्यांत केवळ मृतदेहांचा खच होता. काही जखमी होते तर काही अंतिम घटका मोजत होते. जे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वातंत्र्याची फार मोठी रक्कम चुकती करावी लागली.  

अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले हे मिथक

आपल्या मातृभूमीत एकिकडे रक्ताचे पाट वाहत होते तर दुसरीकडे काही नेते गांधीजींनी तलवारही न उपसता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल त्यांचे गुणगान करण्यात मग्न होते. अहिंसेने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे हा पृथ्वीराज चौहान, ललितादित्य, राणा संगा, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, सुभाषचंद्र बोस, सरदार भगत सिंह आणि डॉ. हेडगेवार अशा अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि शूर आदर्शांचा तो अपमान होता. गांधीजींच्या राजकीय शक्ती प्राप्त करण्याच्या काही दिवसांपूर्वीच्या इच्छेसाठी या व्यक्तिमत्त्वांचा १२०० वर्षांचा लढा आणि अस्तित्व टिकवण्यासाठी केलेले कठोर परिश्रम याच्याशी काँग्रेसने तडजोड केली होती.  

अखेर फार मोठी किंमत मोजल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. ज्या अधिकाराच्या खुर्चीवर पूर्वी इंग्रज बसले होते तिथे आता आपले लोक येऊन बसले होते.सत्तेच्या ज्या खुर्चीवर ब्रिटिश बसले होते तिथेच आज आपली माणसे बसली होती. सत्ताधारी बदलले होते पण व्यवस्था आणि सगळा सेटअप तोच होता. हे अपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य होते.  

ब्रिटिश शासकांशी लढताना गांधीजींनी स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले. अहिंसा, स्वदेशी उत्पादन, उच्च मूल्ये आणि आत्मसन्मान यासाठी त्यांचा आदर केला जाऊ लागला. स्वातंत्र्यानंतर नव्या राज्यकर्त्यांनी त्या सर्व मूल्यांचा त्याग केला. याचेच रुपांतर गुलामगिरीच्या मानसिकतेत झाले, ज्याचा आपल्या देशाच्या तळागाळातील वास्तवाशी काही संबंध नव्हता. स्वदेशीचा आदर्श, आपली सांस्कृतिक मूल्ये, आपली भाषा, रामराज्य आणि स्वराज्य यांचा त्याग केला. त्याऐवजी भाषा, भ्रष्टाचाराची बीजे, साम्यवाद, तुष्टीकरण आणि जातिपातींचे, भाषेचे आणि धर्माचे नवे राजकारण याची रुजवण झाली.  

आपला भूगोल, राज्यघटना, शिक्षणपद्धती, आर्थिक धोरणे, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था यांना पाश्चात्य विचारांच्या अंधानुकरणातून दिशा देण्यात आली असल्यामुळे ती चूक दुसु्त होत नाही तोवर आपल्या संपूर्ण स्वातंत्र्याबाबत प्रश्नचिह्न कायम राहते. खंडित भारताच्या अपूर्ण स्वातंत्र्याचा, पाकिस्तानच्या निर्मितीचा आणि पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव याचा स्वीकार याने स्वातंत्र्यसैनिकांच्या आदर्शांची फसवणूक झाली. १२०० वर्षांपासून देशाला स्वतंत्र करण्याचे आणि बलशाली राष्ट्राचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे स्वप्न बघणाऱ्या शूर नेत्याचे आणि नागरिकांचे आपणांस विस्मरण होता कामा नये. आपल्या शक्तीचा वापर दुसऱ्या राष्ट्रांवर विजय मिळवण्यासाठी वा त्याची लूट करण्यासाठी करायचा नसून परस्पर सहअस्तित्वासाठी शांती आणि तत्त्वज्ञानाचे मूल्य यांचा प्रसार करण्यासाठी करायचा असतो हेच आपल्याला इतिहास शिकवतो. आपल्या बलशाली पूर्वजांनी मानवी मूल्यांची मशाल हाती घेतली आणि  मानवी दुःखाच्या माध्यमातून विश्वाला मार्गदर्शन केले. आपल्याला भव्यपणे विश्वगुरू म्हटले जात असे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक हे स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी आपण अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना विसरून चालणार नाही.

या लेखमालेतील आधीचे लेख वाचण्यासाठी खालील लिंक पहा

विश्वगुरु भारत – भाग 15स्वयंसेवकांचा ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रिय सहभाग https://www.vskkokan.org/rss/2548/

विश्वगुरु भारत – भाग 14मातृभूमीला परमवैभव प्राप्त झालेले (याचि देहि याचि डोळा) पाहण्याचे स्वप्न अपूर्णच https://www.vskkokan.org/rss/2492/

विश्वगुरु भारत – भाग 13हेडगेवार-गांधी ऐतिहासिक संवाद https://www.vskkokan.org/rss/13/

विश्वगुरु भारत – भाग 12 – डॉ. हेडगेवारांना पुन्हा एकदा सश्रम कारावास https://www.vskkokan.org/rss/12/

विश्वगुरु भारत – भाग 11 – संघ शाखांतील स्वातंत्र्यदिन सोहळा https://www.vskkokan.org/rss/2266/

विश्वगुरु भारत – भाग 10 – परमवैभवी देशासाठी रा. स्व. संघाचा सुदैवी जन्म https://www.vskkokan.org/rss/10/

विश्वगुरु भारत – भाग 9 – आपल्या प्रदीर्घ गुलामगिरीची कारणे – डॉ. हेडगेवार यांचे मूलगामी विश्लेषण https://www.vskkokan.org/rss/1816/

विश्वगुरु भारत – भाग 8 – कठोर तुरुंगवासातही जपले दृढ राष्ट्रवादी जीवन https://www.vskkokan.org/rss/1757/

विश्वगुरु भारत – भाग 7 – असहकार आंदोलनात अग्रेसर डॉ. हेडगेवार https://www.vskkokan.org/rss/7/

Back to top button