IslamNews

आक्रोश संघटित हिंदू मनाचा..

गेल्या काही दिवसांपासून संबंध महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात लव्ह जिहाद विरोधात ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येत आहे.

दिल्ली येथील श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्ये नंतर लव्ह जिहादविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजाकडून मोर्चे काढण्यात येत आहे. लव्ह जिहादच्या नावे हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांच्यावर धार्मिक, शारीरिक अत्याचार होत आहेत. त्यामुळे राज्यात हिंदू संघटनांनी एकत्रित येऊन मोर्चे, निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

चोपडा, लातूर, पिंपरी चिंचवड, धुळे, सातारा, अहमदनगर, श्रीरामपूर, नाशिक, इचलकरंजी, वाई, दोंडाईचा, बुलढाणा, शिरपूर… या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आले आहेत. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील लव्ह जिहादचे प्रकार सतत वाढत असून, हे थांबवायचे असतील तर हिंदू समाजात जागृती आवश्यक आहे. याची सुरुवात स्वतःपासून, स्वत:च्या घरापासून, स्वत:च्या दुकानपासून करावी असे आवाहन करण्यासाठी या मोर्च्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

आधी मोर्चा मग व्यापार

हिंदू जनआक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदू समाज एकवटला होता. जात, पात, पक्ष, पंथ, सांप्रदाय भेद विसरुन सगळेच हिंदू संघटीत झाले आहेत.
लातूरमध्ये तर ‘आधी मोर्चा मग व्यापार’ अश्या घोषणा देण्यात आल्या. व्यापार बाजूला ठेऊन लव्ह जिहाद विरोधात आपल्या संतप्त भावना प्रकट करण्यासाठी रस्त्यावर उतरत असेल तर संघटित हिंदू समाजासाठी ते एक शुभ चिन्ह मानले पाहिजे.

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या विरुध्द सरकारने कडक कायदे करावेत व त्याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करावी; श्रद्धा वालकर हत्ये प्रकरणी जलद न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी; अशा विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हे मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चाला हिंदू समाज बांधवांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हजारो हिंदू बंधू भगिनींनी मोर्चात सहभागी होऊन एकजुटीचे दर्शन घडविले आहे. तरीही आपल्या राज्याचा बराचसा भाग अजूनही लव्ह जिहाद विरोधी भावना प्रकट करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान आता हा आक्रोश आधिक व्यापक व्हावा, यासाठी हिंदू प्रेमी संघटनांचे प्रयत्न सुरु असल्याचे कळते.

हिंदू समाजात लव्ह जिहाद बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चा हे त्याचेच द्योतक आहे. श्रद्धा वालकरच्या निर्घृणपणे झालेल्या हत्येमुळे हिंदू समाजमन ढवळून निघाले आहे. विशेषतः हत्ये नंतर अतिशय शांत डोक्याने तिचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले; या क्रूर जिहादी प्रवृत्तीमुळे हिंदू समाज अंतर बाह्य हादरला आहे. लव्ह जिहादचे संकट आता आपल्या दारापर्यंत पोहोचले आहे, याची जाणीव संपूर्ण हिंदू समाजाला होत आहे.

महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

हिंदू जनआक्रोश मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. आपल्या भारत देशामध्ये मातृशक्ती कायमच वंदनीय राहिली आहे, हे या धर्मांध नराधमांना अत्यंत स्पष्टपणे व कडक शब्दात समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. सकल हिंदू समाजाला आपण एकत्र आल्याने आपले अनेक प्रश्न सहज सुटू शकतात हे आता उमगले आहे. लव्ह जिहाद विरोधी कडक कायदा हा हिंदू समाजातील जनजागृतीला पूरक ठरू शकतो पर्याय नाही. लव्ह जिहादचे संकट परतवून लावायचे असेल तर हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकाला, विशेषतः हिंदू तरुणींना जागृत करावेच लागेल आणि ते काम अशा मोर्चाद्वारे अतिशय प्रभावीपणे होऊ शकते.

“लव जिहाद” नावाची गोष्टच अस्तित्वात नाही असे गोंडस तत्त्वज्ञान सांगणाऱ्या तमाम डावे, पुरोगामी, लिब्रांडू पत्रकार यांच्या कानाखाली मारलेली सणसणीत चपराक म्हणजे सकल हिंदू समाजाचे हे जन आक्रोश मोर्चे आहेत.

या हिंदू जनआक्रोश मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे उस्फूर्तपणे सहभागी झालेल्या सकल हिंदू समाज. कुठेही या मोर्चाचा गाजावाजा करण्यात आला नव्हता, खर्चिक जाहिराती करण्यात आल्या नव्हत्या, कोणत्याही सेलिब्रिटीच्या उपस्थितीचे आकर्षण नव्हते आणि तरीही निव्वळ एखाद्या आवाहनावर लक्षावधींचा हिंदू समाज रस्त्यावर उतरला. हे या मोर्चांचे विलक्षण यश म्हणावे लागेल. हिंदू समाजाला आपल्या अस्तित्वाची आणि भावी पिढ्यांची वाटणारी चिंताच या विराट मोर्चांमुळे प्रकट झाली.

एव्हढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊनही कोठेही बेशिस्त नाही, उन्माद नाही, भडकाऊ घोषणा नाहीत मात्र यापुढे लव्ह जिहाद खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट संदेशच हे मोर्चे देत होते.

हिंदुस्थानात हिंदूंना स्वतःच्या अधिकारासाठी झगडावे लागू नये म्हणून शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते की, “उठ हिंदू बांधवा जागा हो, हिंदुत्वाचा धागा हो.. “

https://marathi.abplive.com/news/latur/maharashtra-news-latur-news-hindu-janakrosh-morcha-in-latur-against-love-jihad-a-large-police-presence-1132628

https://www.newslaundry.com/2022/12/22/a-burning-issue-how-the-sangh-family-is-spearheading-protests-in-maharashtra-for-a-love-jihad-law

Back to top button