NewsScience and Technology

शास्त्रज्ञ ४
भारतीय चर्मोद्योग विज्ञानाची पायाभरणी करणारे एम संतप्पा

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या(indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…

भारतीय पॉलिमर विज्ञान आणि चर्मोद्योग तंत्रज्ञान यावर आपली अमिट छाप उमटविणारे प्रा. मुशि संतप्पा(Mushi Santappa) हे एक अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेलं व्यक्तिमत्त्व होतं. दोन डॉक्टरेट, अनेक वेगवेगळ्या विषयांवर संशोधन, नवनव्या तंत्रांचा विकास यांतून त्यांनी ते संचालक असलेल्या चेन्नईच्या सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटला जागतिक पटलावर सन्मानाने स्थापित केले.

आंध्रप्रदेशच्या(andhrapradesh) कर्नुल जिल्ह्यातलं जोन्नगिरी नावाचं गाव म्हणजे हिऱ्यांची खुली खाणच समजलं जातं. या गावातले शेतकरी मोसमी पावसाने धूप झालेल्या गावाभोवतालच्या पडीक जमिनीवर नैसर्गिक हिरे शोधायला जात असत, असं सांगतात. अशा या हियांच्या गावात २ ऑक्टोबर १९२३ रोजी मुशि संतप्या नावाच्या एका दुर्मिळ नररत्नाचा जन्म झाला. आपल्या प्रदीर्घं कारकिर्दीत या नररत्नाने भारतातील आणि जगभरच्या चर्मोद्योग तंत्रज्ञानाशी स्वतःचं नाव अगदी घट्टपणे जोडून घेतलं.

प्रा. संतप्पा यांनी मद्रास विद्यापीठातून(University of Madras) १९४३ साली बीए ची पदवी मिळवली आणि नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून १९४५ मध्ये ते एमएससी झाले. त्यांनी डॉक्टरेटही दोन केल्या. पहिली १९४९ मध्ये लंडनहून ऑरगॅनिक केमेस्ट्रीमध्ये आणि दुसरी मॅचेस्टर विद्यापीठातून १९५१ मध्ये ते १९५२ मध्ये भारतात परतले आणि आपल्या मद्रास विद्यापीठात त्यांनी अध्यापन कार्य सुरू केले. त्यासोबतच त्यांनी कोलॅजेनवर व्हिनाइल मोनोमर्स आरूढ करण्याच्या तंत्रावर संशोधनही सुरू केलं. १९७२ मध्ये भारत सरकारने प्रा. संतप्पा यांची निवड चर्म उद्योग आणि पॉलिमर विज्ञान तसेच संशोधनासाठी जगद्विख्यात असे दोन नवे विभाग सुरू केले. असलेल्या चेन्नईच्या सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (central leather research institute-CLRI) संचालक पदासाठी केली.

प्रा. संतप्पांच्या नेतृत्त्वाखाली अवघ्या सात वर्षांच्या काळात या संस्थेने वार्षिक चार हजार रुपयांच्या (तत्कालीन) चर्म उत्पादनांच्या निर्यातीपर्यंत मजल मारली. त्यावेळी भारतातून निर्यात होणाऱ्या चर्म उत्पादनाच्या ८० टक्के एवढा हा मोठा वाटा होता. प्रा. संतप्पांना जगभरातील संशोधकांच्या वर्तुळामध्ये एवढा मान होता की, १९८३ साली त्यांनी चेन्नईच्या सीएलआरआयमध्ये आययूपीएसी इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमेस्ट्री या संस्थेच्या एका परिसंवादाचे आयोजन करीत या संस्थेला तसेच भारतीय चर्म उद्योग आणि विज्ञान व संशोधन यांना आंतरराष्ट्रीय पटलावर प्रभावीपणे सादर करण्यात यश मिळवले. १९७९ ते ८१ या काळात ते तिरुपती येथील वेंकटेश्वरा विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानंतर १९८१ ते ८४ या काळात ते मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू झाले जिथे त्यांनी ऊर्जा विभाग आणि पॉलिमर विज्ञान व तंत्रज्ञान विभाग असे दोन विभाग सुरु केले.

प्रा. मुशि संतप्पा यांना त्यांच्या वैज्ञानिक संशोधनासाठी तसेच त्यांच्या वैज्ञानिक संस्थांच्या प्रशासकीय कारकिर्दीसाठीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) सदस्य व राष्ट्रीय प्राध्यापक होते, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) विज्ञान व समाज प्रकल्पाचे अध्यक्षही होते. त्यांच्या नावे भारतातील सोसायटी ऑफ पॉलिमर सायन्सने एक राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला आहे. त्यांना १९६७ मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (फिक्की) १९८५ मध्ये त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आदी संस्थांसहित अनेक वैज्ञानिक संस्थांचे ते फेलो होते. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ केमेस्ट्री आणि न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचेही ते मानद सदस्य होते.

प्रा. संतप्पा यांचे २६ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन झाले. भारतीय पॉलिमर विज्ञान आणि चर्मोद्योग तंत्रज्ञान यावर ते आपली अमिट छाप सोडून गेले.

लेखक :- प्रा. ए रामचंद्रैय्या

(प्रा. ए रामचंद्र है वारंगळ एनआयटीमध्ये प्राध्यापक असून विज्ञान प्रसारच्या स्कोप इन तेलुगु या प्रकल्पाचे समन्वयक आहेत)

(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)

Back to top button