CultureNewsRSS

आपली संस्कृती, तंत्रज्ञान आणि आपल्या ज्ञानाचे अनुसरण करा..

भारत (Bharat )गरीब झाला कारण आपल्याकडे विकासासाठी पुरेशी संसाधने नव्हती. त्यांना वाटते की आपल्याकडे विज्ञान नव्हते. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होण्यास बराच वेळ लागतो आणि त्यात आपल्या देशाचे मोठे योगदान आहे.

कर्णावतीमध्ये (अमदाबाद) आयोजित ‘साबरमती संवाद’च्या ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या सत्रात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, आपण आपले ज्ञान, आपली संस्कृती आणि तंत्रज्ञान आत्मसात करून नवीन पिढीला अशा प्रकारे तयार केले पाहिजे की, ते जगाला एक नवीन दिशा देऊ शकतील. यामुळे भारत पुन्हा एकदा विश्वगुरू होईल. सुनील आंबेकर यांनी व्यक्त केलेले विचार येथे देत आहोत.

आपण लहानपणी महात्मा गांधींबद्दल वाचत आणि ऐकत असू नंतर कळले की. गुजरातच्या लोकांची सागरी मार्गाने परदेशात जाऊन व्यवसाय करण्याची फार जुनी परंपरा आहे. गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत गेले, तेव्हा गुजराती लोक त्यांना सहकार्य करण्यासाठी आधीपासूनच तेथे होते.

यावरून असे दिसून येते की, आपण ब्रिटीश (British) जहाजांतून जगभर प्रवास करायला सुरुवात केलेली नाही. आम्ही फार पूर्वीपासून जगभर फिरायचो. हजार वर्षापूर्वीच्या दस्तऐवजामध्ये या प्रवासाचा तपशील आहे. ज्यामध्ये प्रवासी भारतात कसे आले आणि येथील लोक कोणत्या प्रकारच्या वस्तू बनवत असत, हे सांगितले आहे. या दस्तऐवजांमध्ये कपड्यांपासून ते लोखंडी आणि सोन्याच्या वस्तूंपर्यंत भारतात बनवलेल्या छोट्या-छोट्या वस्तूंचा उल्लेख आहे. ज्यांची संपूर्ण जगात प्रशंसा होत असे. आजच्या संगणक युगात भारतीय ज्ञान परंपरेची काय आवश्यकता आहे, असे अनेकांना वाटते. आपल्याला याबद्दल जाणून घेण्याची नितांत गरज आहे.

आमचे ज्ञान दडपले..

आपल्याकडे विकासासाठी पुरेशी संसाधने नसल्याने भारत गरीब झाला असे अनेकांना वाटते. त्यांना वाटते की, आपल्याकडे विज्ञानाचा अभाव होता. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होण्यास बराच कालावधी लागतो आणि त्यात आपल्या देशाचे मोठे योगदान आहे. आमचे ज्ञान दडपले गेले म्हणून आम्ही गरीब झालो. आपण इतिहासापासून धडे घेतले पाहिजे. एखाद्या देशाची स्मरणशक्ती कमी झाली तर त्या देशात राहणाऱ्या लोकांची शक्तीही समाप्त होते. त्यामुळे इतिहास ज्ञात असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला भूतकाळाचे आकलन नसेल, तर तुम्हाला समजणार नाही की. आपण कुठे उभे आहोत. आपण कुठून आलो आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे? आपल्या देशात असे अनेक लोक आहेत. ज्यांच्या मनात कुठे जायचे आहे. का जायचे आहे आणि कसे जायचे आहे याबाबत संभ्रम आहे. याचप्रमाणे कधी कधी देश म्हणूनही पेच निर्माण होतो. म्हणून आपण काय आहोत, आपले ज्ञान काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. आज या सदर्भात आपली हरवलेली स्मरणशक्ती परत आणण्याची गरज आहे.

नालंदा विद्यापीठात (Nalanda University) केवळ वेद, शास्त्र आणि रामायण इत्यादी विषय शिकवले जात नव्हते, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुमारे ७२ प्रकारचे अभ्यासक्रम तेथे तयार केलेले होते. याशिवाय इतर किती अभ्यासक्रम आणि विषय होते याची मोजदादच नाही. नालंदा विद्यापीठ जळाले. तथापि, तेथे सापडलेल्या कागदपत्रांमध्ये धातूपासून जीवनावश्यक वस्तूपर्यंत सर्व साधने हाताने कशी बनवायची याचा उल्लेख आहे. अगदी श्रृंगार कसा करायचा आणि उत्सव कसे साजरे करायचे, याचेही अभ्यासक्रम होते. म्हणजेच आज आपण ज्याला एंटरप्राइज कोर्स म्हणतो, नालंदा विद्यापीठात वेदाचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी कौशल्य शिक्षण घेत असे. विद्यार्थ्यांना अत्यंत गूढ ज्ञान देण्यात येत असे. जसे ‘अग्नी म्हणजे काय? पाणी म्हणजे काय? त्यांचा काय संबंध?

आजच्या भाषेत आपण ज्याला प्रगत विज्ञान म्हणतो त्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती होती… त्यांचा सूर्य आणि चंद्राचा अभ्यास होता आणि कोणता ग्रह कोणत्या ग्रहाभोवती फिरतो याची गणना करण्यासही ते विद्यार्थी सक्षम होते. त्यावेळी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना दैनदिन जीवनाविषयीची माहितीही दिली जात असे. पाकशास्त्रात त्यांना ऋतूनुसार स्वयंपाक कसा करावा तसेच अत्र केव्हा व कसे खावे हे शिकवले जात असे. हा उपक्रम ज्याला आज आपण कोशल्य शिक्षण’ म्हणतो. तो आपल्या.. शिक्षण व्यवस्थेत फार पूर्वीपासून अंतर्भुत होता.

तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत असायला हवी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे येथील प्रत्येकजण म्हणतो. शेती हा भारतातील मुख्य उद्योग आहे. परंतु पूर्वी शेतकन्याला गावातील इतर उद्योगाचीही माहिती होती. गरजेनुसार तो लोखडाव्या किंवा धातूच्या वस्तू बनवू शकत असे. गुमला हा झारखंडवा एक जिल्हा आहे. जिथे लोकांना अजूनही स्टील बनवण्याची पद्धत अवगत आहे. गावोगावी अशा लोकांचा शोध सुरू केला. असला गुमला येथे असा उद्योग सापडला. म्हणजे त्यांनी पिढ्यानपिढ्या मिळालेले हे ज्ञान जपून ठेवले.

प्राचीन ज्ञानाचे जतन..

उत्तर प्रदेशात एक जिल्हा, एक उत्पादन पावर भर दिला.जात आहे. प्रत्येक जिल्हा एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी लाकडी वस्तू तर काही ठिकाणी कुलूप इत्यादी… या हजारो वर्ष जुन्या परंपरा आहेत. असे उद्योग नष्ट करण्यासाठी मुघलांनी अनेक प्रयत्न केले. तसेच ब्रिटीश काळात यंत्रे आणून जुने उद्योग संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. स्वातंत्र्यसैनिकांनी मुघल आणि इंग्रजाविरुद्ध लढा दिला. देशाची, माती वाचवली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांना आम्ही आदरांजली वाहतो. पण ज्यांनी हजारो वर्षे जुने ज्ञान पिढ्यानपिढचा, शेकडो वर्षांच्या हल्ल्यानंतरही पुढे नेते तें, देखील स्वातंत्र्यसैनिकच आहेत. त्याच्यामुळेच आज आपल्याकडे ते ज्ञान आहे. त्यामुळे २०२१ पासून एक जिल्हा. एक उत्पादन योजनेंतर्गत वस्तु तयार केल्या जात आहेत.

श्रीराम जन्मभूमीवर ( shri ram janmabhoomi )भक्तवत्सल श्री रामाचे मंदिर बांधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आमची अशी इच्छा आहे की, अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या मंदिराला हजारो वर्षापर्यंत कोणतीच क्षती. पोहोचू नये. पण आजचे लोक म्हणतील की, पासाठी देश- विदेशातून इंजिनीअर आणा. हजारो वर्षांची ज्ञानपरंपरा जपणारे लोक परदेशात नव्हे, तर आपल्याच देशातील खेड्यापाड्यात उपेक्षित पडलेले आढळले. त्यांनी मंदिराची रचना केली. मंदिरात वापरण्यात येणारे दगड कोरण्याचे आणि जोडण्याचे तंत्र समजावून सांगितले. असे कुशल कारागीर आजही आपल्यात आहेत, ज्यांनी हजारो वर्षांची कलाकुसर जपली आहे. हे सर्व एकत्र आणले गेले आणि संयुक्त प्रयत्नांनी आज हे मंदिर भारताच्या पारंपरिक कौशल्याच्या आधारे उभारले जात आहे.

आपल्या धर्मग्रंथात मंदिर बांधणीची पद्धत खूप तपशीलवार सांगितली आहे. त्यामुळे भारतीय कंपन्या, भारतीय लोक आणि जुने अनुभव यांची सांगड घालून हजार वर्षे कोणीही नुकसान करू शकणार नाही, अशा तंत्रज्ञानाने मंदिर उभारले जात आहे.

तुम्ही यू ट्यूबवर स्वयंपाकाच्या पाककृती पाहता तेव्हा. जुन्या स्वयंपाकाच्या पारंपरिक पद्धती तुम्हाला सर्वात जास्त दिसतील. अनेकदा पाककृती कशा करायच्या हे सांगणारे लोक फार शिकलेले नसतात. आपल्याच देशात किती विविध प्रांत आहेत आणि किती प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, कल्पना करा की किती प्रकारचे उद्योग आणि अनुभव असतील? आत्तापर्यंत आपण जगभरातील वस्तू खात होतो. पण आता आपण जे बनवत आहोत ते जग खायला तयार आहे. त्यामुळे आपण जगाला काय देऊ शकतो याविषयी आपल्या जुन्या आठवणी जागवल्या पाहिजेत. अनेकजण अशा नवीन गोष्टी शिकत आहेत. हे शिकून ते त्यांच्याशी संबंधित उद्योग उभारत आहेत. जे खूप मोठ्या उद्योगाचे स्वरूप घेत आहेत. म्हणजे आजच्या नवीन तंत्रज्ञानाचा आणि प्राचीन ज्ञानाचा सुरेख संगम तयार होत आहे.

आमच्याकडे प्रत्येक ज्ञानाची पुस्तके उपलब्ध आहेत. धातू शास्त्र. विमान शास्त्र हे वेद आणि धर्मग्रंथातही उपलब्ध आहेत. भारत सरकारनेही भारतीय ज्ञान परंपरेबाबत एक योजना सुरू केली आहे. या अंतर्गत भौतिकशास्त्र आणि गणितासह प्रत्येक क्षेत्रातील भारताचे ज्ञान शिकवले जाईल. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला आता या जुन्या ज्ञानपराबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. या आधारावर आपण संपूर्ण जगाला आपल्या ज्ञानाची जाणीव करून देऊ शकतो. योगाचेच घ्या, हे आपले फार जुने ज्ञान आहे. जे जगाने अंगिकारले आहे. हे कौशल्य आणि ज्ञान हजारो वर्षांपूर्वी आपल्याजवळ होते आणि हजारो वर्षांनंतरही त्याचा उपयोग होईल. त्यामुळे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज लोक गुगलवर अवलंबून आहेत, ज्यातून त्यांची भविष्यात फसवणूक होते. म्हणजे इतरांच्या मदतीने आयुष्यात पुढे चालणे शक्य नाही. कुठे आणि कोणत्या मार्गाने जायचे याचे ज्ञान आपल्याला विकसित करावे लागेल.

इतक सगळ असूनही, चांगलं अन्न, चांगलं पाणी आणि चांगलं आयुष्य याच शर्यतीत आपण धावणार आहोत की आपल्या भविष्याचा विचार करणार आहोत? हा प्रश्न मी उपस्थित करीत आहे. कारण गेल्या काही वर्षात जे काही तंत्रज्ञान आमच्याकडे आले. ते आम्ही स्वीकारले. पण यामुळेही अनेक समस्या निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, आपण जगातून आर्थिक व्यवस्था, विपणन व्यवस्था, उत्पादन व्यवस्था स्वीकारली त्यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. त्यामुळे चांगले जीवन जगायचे असेल तर जगाला दिशा दाखवावी लागेल अशा पद्धतीची ओळख करून द्यावी लागेल जेणेकरून आपण एक चांगले जग निर्माण करू शकू.

या पिढीसमोर दोन प्रश्न आहेत. प्रथम, संस्कृतीची निवड आणि दुसरी, तंत्रज्ञानाची निवड. संस्कृतीची निवड म्हणजे संस्कृती तिच्या सर्व आर्थिक आणि उत्पादन क्रियाकलापांसाठी निवडली पाहिजे आणि उत्पादन आणि तंत्रज्ञानावर आधारित संस्कृती बनू नये, तुम्हाला कोणत्या प्रकारचे जीवन जगायचे आहे हे तुम्ही आधी ठरवा. आम्हाला आनंद कशात होतो? आम्हाला सुख कशात सापडते? हे निश्चित केले पाहिजे. याला संस्कृती म्हणतात. म्हणजेच, रोबोटला निर्देशित करण्याचा विवेक आपल्याकडे असणे आवश्यक आहे. असे ज्ञान केवळ भारतीय परंपराच देऊ शकते. याच्या मदतीने आपण असे जग निर्माण करू शकतो, जे शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल असेल, तरच संसाराचे चक्र चालेल आणि आमचे कुटुंबही सुखी होईल.

भारताला विश्व गुरू तेव्हाच संबोधले जाईल. जेव्हा भारतातील लोक इतराच्या मनाप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या मनाप्रमाणे चालतील जर तुम्ही दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागलात तर हे शक्य होणार नाही. आपली संस्कृती आपले तंत्रज्ञान, हा आपल्या पिढीचा मंत्र असायला हवा. आपले ज्ञान नक्कीच जुने आहे. परंतु आजही ते खूप उपयुक्त आहे. त्याला नव्या स्वरूपात सादर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

साभार:- नागपूर तरुण भारत

Back to top button