National SecurityNaxalismNews

लाल सलाम न केल्यामुळे माओवाद्यांनी केली आदिवासी लालसू ची हत्या…तीव्र निषेध…

कम्युनिस्ट माओवादी (नक्षलवादी) च्या हिंसक कारवाया करणाऱ्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (People’s Liberation Guerrilla Army) च्या दहा ते पंधरा माओवाद्यांनी गुरुवारी रात्री गावप्रमुख पाटील लालसू वेडदा यांच्या घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

लालसू वेडदा वय ६३ हा टीटोडा (तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली) या गावचा ग्रामप्रमुख होता.हे गाव जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत येत असून हा भाग पूर्णपणे नक्षलग्रस्त (naxalvaadi) आहे.२३ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ही थरारक घटना घडली. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी तेथे पत्रक टाकले असून त्यात गाव पाटलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलीस तसेच स्थानिक नेत्यांवर आरोप केले आहेत.

जो कोणी व्यक्ती,तरुण,महिला व दलीत बांधव सरकारने राबविलेल्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्याच्या जीवनाचा उत्कर्ष साधण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले की कम्युनिस्ट माओवादी लोकं लगेच त्याला पोलिस खबरी ठरवून त्याची क्रूरपणे हत्या करत आहेत.जो कोणी यांना लाल सलाम करणार नाही,यांच्या दहशतीला जुमनार नाही त्या व्यक्तीची त्याच्या घरातील व्यक्तीनं समोर च हत्या करून दहशत निर्माण करत आहेत.

पीएलजीएच्या भेकड माओवाद्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी तेथील तरुण आणि काही मुलांनाही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. माओवाद्यांनी नेहमीप्रमाणेच लालसू पोलिसांना माहिती देणारा खबरी म्हणून काम केल्याचा आरोप करणारे एक पत्रकही घटनास्थळी ठेवले आहे.

माओवाद्यांनी सोडलेल्या पत्रकात, प्रतिबंधित सीपीआय-माओवादी( maovadi) च्या गडचिरोली विभाग समितीने या क्रूर हत्येची जबाबदारी स्वीकारताना लालसूवर पोलिस आणि सूरजगड खाण मालकांसोबत कट रचल्याचा आरोप केला आहे. पत्रकामध्ये माओवाद्यांनी असा आरोप केला आहे की लालसू स्थानिकांना पैशासाठी खाणींमध्ये काम करण्यास प्रवृत्त करण्यात आघाडीवर होता. माओवाद्यांनी हेदारीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि काही स्थानिक राजकारण्यांवर स्थानिकांच्या विरोधात कट रचल्याचा आणि खनिज समृद्ध प्रदेशाची लूट केल्याचा आरोपही केला आहे.

लालसू गावचा प्रमुख या नात्याने गावातील तरुणांनी रोजगार मिळावा म्हणून सुरजागड खाणीत तरुणांना नोकरी मिळवून देत असेल तर लालसू चुकीचा कसा?

हेच माओवादी अनेक वेळा व्यापारी,गुत्तेदार, खाण मालक व अन्य लोकांकडून खंडणी वसूल करतात तेव्हा हे दलाली त्यांच्या हिताची,त्या दलाली वर अनेक माओवादी नेत्यांची मुलं प्रदेशात शिक्षण घेत आहेत.

सद्य स्थितीत संपूर्ण एटापल्ली तालुक्यातील प्रत्येक गावातील घराशी एका तरी व्यक्तीला सुरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पामुळे रोजगार मिळत आहे.

Todgatta येथील आंदोलनात आदिवासी बांधवांना दहशतीच्या जोरावर सहभागी करून माओवादी परत एकदा स्थानिक आदिवासी लोकांच्या विकासाच्या आड येत आहेत.केंद्र सरकार व राज्य सरकारने तातडीने यावर कडक कारवाई करून एकदाचा सोक्षमोक्ष लावून ही लाल वाळवी देशातून कायमची हद्दपार करावी.

लालसू वेदादा व अन्य स्थानिक लोकं माओवाद्यांच्या दबावाला बळी पडत नसल्याचे पाहून या लाल सलामवाल्याचे त्यांच्या शरीरात वाहत असलेले बेईमानी चे रक्त खवळ्याचे दिसत आहे.

मागच्याच आठवड्यात माओवाद्यांची विकास विरोधी भूमिकेतूनच दिनेश गावडे रा लाहेरी टोला, लाहेरी ता. भामरागड जिल्हा.गडचिरोली येथील तरुण छत्तीसगड राज्यातील मंगुर या गावात कामानिमित्त जात धोडराज पोलिस स्टेशन हद्दीत छत्तीसगड राज्याच्या सिमेजवळ असताना माओवाद्यांनी त्याचे अपहरण करून हत्या केली होती.

कोणत्याही प्रकारचं शिक्षण, वीज, रस्ते, आरोग्य, प्रशासन या सार्‍या मुलभूत सुविधावंचीत स्थानिक आदिवासींपर्यंत हे नक्षलवादी त्यांच्या बळाच्या जोरावर पोहोचू देत नसत.पण आता प्रशासनाच्या भूमिकेमुळे अनेक विकास कामे होत असून स्थानिक आदिवासी लोकांच्या मनातील देखील नक्षलवाद्यांचे भय कमी झाल्याचे दिसत असताना एका आठवड्यात दोन निष्पाप आदिवासी बांधवांच्या क्रूर हत्या माओवाद्यांनी केल्या आहेत.

संविधान व लोकशाही विरोधी कम्युनिस्ट माओवादी हातात शस्त्र, दारूगोळा घेवून जंगलातून स्थानिक आदिवासी बांधवांचे बळी घेऊन देशविरोधी हिंसक चळवळ चालवत आलेले आहेत. देशातील अनेक विद्यापीठात ,अनेक नामांकित शिक्षण संस्थेत व आयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थे मध्ये असलेले कम्युनिस्ट प्राध्यापक लोक माओवादी निष्पाप आदिवासी बांधवांच्या हत्येचा निषेध करताना दिसत नाहीत. उलट माओवाद्यांचे समर्थन करत पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाया विरोधात बोलतात. हे शहरांत असलेले कॉम्रेड लोक अत्यंत घातक असून जनतेच्या पैशातून सरकारकडून पगार घेतात आणि पक्षपाती देशविरोधी चळवळ चालवतात. या शहरी तथाकथित बुद्धिजीवी लाल गिधाडांच्या समर्थन व सहकार्यानेच नक्षल चळवळ जंगलात राहून गरीब आदिवासी बांधवांना दहशतीखाली ठेवून अजूनही जिवंत आहे.

स्वत:ला आदिवासी व दलीत बांधवांचे रक्षक म्हणवून घेणारे हे कम्युनिस्ट माओवादी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार नि:शस्त्र आणि शिक्षण रुपी वाघिणीचे दूध पिवून नव्या उमेदीचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुण मुलांचा/मुलींचा,स्थानिक निष्पाप आदिवासी व दलीत बांधवांच्या आपली दहशत निर्माण करण्यासाठी वारंवार हत्या करत आहेत.माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या या निर्दयी हत्येनंतर तरी समस्त संविधान प्रेमी जनतेने एकवटून या देशद्रोही कम्युनिस्ट माओवाद्यांना कायमचा धडा शिकविण्यासाठी सरकार वर दबाव आणला पाहिजे.

नक्षलवाद मुर्दाबाद…माओवाद मुर्दाबाद….

लेखक :- अशोक तिडके (विवेक विचार मंच)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid032LaYBsCbHp9S51csR6cucqrcvcwcqbwzS1ie4bTEUV3jNqv4qiukjmh2eV1TPM5Sl&id=100005450704910&mibextid=Nif5oz

Back to top button