News

संस्कार भारती, कोकण प्रांताचे संरक्षक वसंत जोशी यांचे निधन

पनवेल : संस्कार भारती, कोकण प्रांताचे संरक्षक नरहरी गौरीनाथ उपाख्य वसंतराव जोशी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बालवयापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले वसंतराव जोशी १९८४ साली दादर भागाचे कार्यवाह झाले. १९८६ सालापासून त्यांनी संस्कारभारतीसाठी योगदान दिले होते. कोडॅक कंपनीत नोकरीला असल्याने सुरवातीला दादर येथील पितृछाया या संघ कार्यालय येथे त्यांनी चित्रपट विभागाचे काम सुरू केले.  राष्ट्रीय स्तरावरील अनेक चित्रपट, लघुपट निर्मिती व त्याचे जतन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती व पुढे राष्ट्रीय कोषाचे काम अनेक वर्षे त्यांनी सांभाळले.  अतिशय मृदु स्वभावी व तितकेच हिशोबाच्या बाबतीत चोख असलेल्या वसंतराव यांच्या निधनाने संस्कारभारतीची कधीही भरून पोकळी निर्माण झाली  आहे. वसंतराव जोशी यांनी जनकल्याण सहकारी बँकेचे संस्थापक संचालकपदही भूषविले होते.   

Back to top button