EntertainmentNews

झोमॅटो: ‘महाकाल’ जाहिरात

‘महाकाल’ जाहिरातप्रकरणी ‘झोमॅटो’चा माफीनामा

तीव्र आक्षेप आणि वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर झोमॅटो या ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरणसेवा पुरवणाऱ्या कंपनीने रविवारी आपली ‘महाकाल’ ही वादग्रस्त जाहिरात मागे घेऊन माफी मागितली. जाहिरातील ‘महाकाल’चा संदर्भ मंदिराशी नव्हता, रेस्टॉरंटशी होता, असेही कंपनीने माफीनाम्याद्वारे स्पष्ट केले.

‘‘आम्ही उज्जैनच्या नागरिकांच्या भावनांचा मनापासून आदर करतो आणि संबंधित जाहिरात यापुढे प्रसारित केली जाणार नाही, याची हमी देतो. कोणाच्याही श्रद्धा आणि भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परंतु घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही माफी मागतो, असेही ‘झोमॅटो’ने ट्वीटर संदेशात म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी अभिनेता हृतिक रोशनने काम केलेल्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचे मत व्यक्त करीत जाहिरात मागे घेण्यात यावी, कंपनी आणि हृतिक रोशन यांनी माफी मागावी, अशी मागणीही पुजाऱ्यांनी केली होती. त्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. उजैनच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही याप्रकरणी चौकशीचे निर्देश दिले होते.

‘‘उज्जैनच्या विशिष्ट भागांत दाखवल्या जाणाऱ्या या जाहिरातीला ‘महाकाल रेस्टॉरंट’मधील ‘थाली’चा संदर्भ आहे, पूजनीय श्री महाकालेश्वर मंदिराचा नाही. ‘महाकाल रेस्टॉरंट’ हे उज्जैनमधील आमच्या रेस्टॉरंट भागीदारांपैकीच एक आहे. त्याच्या मेनूमध्ये ‘थाली’चा समावेश आहे,’’ असे झोमॅटोने आपल्या ट्विटर खात्यावर प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जाहिरातीची चित्रफित संपूर्ण भारतातील कंपनीच्या जाहिरात मोहिमेचा भाग आहे. त्यासाठीच उज्जैनमधील ‘महाकाल रेस्टॉरंट’ची निवड करण्यात आली होती, असेही कंपनीने स्पष्ट केले.

नेमकी जाहिरात काय?

महाकाल जाहिरातीत हृतिक रोशन म्हणतो, ‘‘मला भूक लागली होती, म्हणून मी ‘महाकाल’मधून थाली मागवली. यातल्या ‘महाकाल’ या संदर्भावर महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. महाकाल मंदिरातील अशी कोणतीही थाळी देशातच नाही तर उज्जैनमध्येही दिली जात नसल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे होते.

आक्षेप काय?

महाकालेश्वर मंदिरासमोरील परिसरातच भाविकांना मोफत थाळी दिली जाते. परंतु जाहिरातीमुळे भाविकांमध्ये संभ्रम होत आहे. कंपनीने आपल्या फायद्यासाठी महाकालेश्वर मंदिराचे नाव घेऊन संभ्रम पसरवला आहे. हिंदू सहिष्ण असल्यामुळे तीव्र विरोध करीत नाहीत, अन्य धर्माबद्दलची जाहिरात असती तर एवढय़ात झोमॅटोला आग लागली असती.

आमच्या शांततेचा कोणीही अंत पाहू नये. हिंदूंची शांतता त्यांच्या बुद्धिमत्तेतून आलेली आहे. फतवे न काढता देशील आपले प्रचंड नुकसान होऊ शकते हे आता या कंपन्यांनी आपल्या डोसक्यात फिट्ट केले पाहिजे अन्यथा #bycottzomato

नेटकऱ्यांचे विशेष कौतुक करावेच लागेल त्यांच्या सजगतेमुळे ही जाहिरात समाजापुढे आली. आज हिंदू मोठ्या प्रमाणात रियाक्ट व्हायला लागला आहे,त्याची अनुभूती तनिष्क असो किंवा लाल सिंग चड्डा याना बसलेल्या आर्थिक तोट्यातुन दिसून येईल. संबंध समाज ज्यावेळी एकत्र होतो त्यावेळी बदल घडायला वेळ लागत नाही.

कायमच आपले देवी देवता अपमानित होत आले आहेत. जोपर्यंत आपण एकत्र होऊन प्रतिकार करत नाही तोपर्यंत आपण अपमानित होतच राहणार. हिंदुद्वेषी कंपन्यांचे आर्थिक नुकसान हाच त्यांना वठणीवर आणायचा सोपा मार्ग आहे.

Back to top button