HinduismIslamNews

परभणीतील अल्पवयीन शिकलकरींना मारहाण पुर्वनियोजितच……..भविविप.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना

परभणी येथील वराह (डुक्कर) पालन करणाऱ्या शिकलकरी(शिकलगार) शीख( sikh) समाजातील (महाराष्ट्रात हे भटके विमुक्त मध्ये गणले जातात) मुलांना पिंपरी देशमुख येथे शेतात डुक्कर घुसण्याचा फोन आला. मोटरसायकल वरून किरपालसिंग सुरजीतसिंग भोंड , अरुणसिंग जोगिंदरसिंग टाक आणि गोरसिंग उर्फ सचिनसिंग गुरुबच्चनसिंग दुधानी ही साखळा प्लॉट येथील शिकलकरी समाजातील अल्पवयीन मुले परभणीच्या पिंपरी देशमुख या गावी गेले होते. परंतु त्यांना वराह (डुक्कर )सापडले नाहीत. परभणीकडे परत येत असताना, वाटेत उखळद या गावी पाच सहा जणांनी त्यांना अडवले व बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच गावात चोर घुसले आहेत, असे मस्जिदीवरील भोंग्यावरून उद्घोषणा करवून गावाला ही जमा केले.
शिकलकरी समाज शीख असल्याने केस वाढवतात व पगडी घालतात. भोंग्यामुळे जागे झालेल्या गावातील धर्मांध समाजाने त्यांची पगडी काढून केस खेचत त्यांना फरफटत गावभर फिरवले. तसेच त्यांचे पाय बांधून त्यांना अतिशय क्रूरपणे बेदम मारहाण करण्यात आली. लोखंडी रॉड व लाकडाने ही मारहाण करण्यात आली. यात यातील सर्वात छोटा १४ वर्षांचा किरपालसिंग भोंड हा जागीच मरण पावला होता. या मारहाणीची यातील काही मंडळींनी व्हिडिओ क्लिप बनवली व पसरवली. पोलीस वेळेत आल्यामुळे उर्वरित दोघा अल्पवयीन शिकलकरी मुलांचे अरुणसिंग जोगिंदरसिंग टाक व गोरासिंग दुधानी प्राण वाचू शकले. परंतु ते गंभीर जखमी झाले आहेत . परभणीच्या शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारार्थ ठेवण्यात आले आहे. यासंबंधी गुन्ह्याची नोंद देखील रात्री उशिरा करण्यात आली. त्यात माजी सरपंच अक्रम पटेल व पाच सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


ही घटना २७ मे २०२३ रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. भटके मुक्त विकास परिषदेने आपल्या परीने या विषयात लक्ष घातले असता , त्यांच्या लक्षात वेगळ्याच गोष्टी आल्या, ज्या पोलिसांच्या नोंदीत नाहीत. एकतर हा मॉब लिंचिंग प्रकार पुर्वनियोजीत असल्याचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे . धर्मांध समुदायाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या किरपालसिंग भांड (त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे) याच्या आईने “मला न्याय मिळाला पाहिजे” असे सांगितले आहे.
शिकलकरी समाजात अधिक चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील समाजाला वराह( डुक्कर) आवडत नसल्यामुळे शिकलकरी समाजाचा आधीपासूनच राग आहे. शिकलकरी समाज हा वराह पालनाचा व्यवसाय करतो. व वराह( डुक्कर) पकडून देण्याचे काम पण करतो, हे या गावातील या विशिष्ट लोकांना आवडत नसे. डुक्कर न आवडणाऱ्या या समाजाला त्यांच्याबद्दल घृणा असल्याने, त्यांनी ठरवून जाणीवपूर्वक ही मारहाण केली असावी, असे शिकलकरी समाजाने भटके नियुक्त विकास परिषदेच्या नरसिंग झरे , शरद दिवे , गोविंद भंडे या कार्यकर्त्यांना सांगितले व आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन केले.

त्यात या कार्यकर्त्यांना पुढील माहिती अशी मिळाली की, या मुलांना मारहाण करताना त्यांच्या केसांना धरून गावभर फिरण्यात आले , त्यांचे पाय त्यावेळेस बांधलेले स्थितीत होते.शीख असताना त्यांच्या पगडीला हात घातला गेला . मारहाण चालू असताना माजी सरपंच अक्रम पटेल यांनी “मारो सालोंको, बाकी मैं देख लूंगा “असे म्हटल्याचे त्यांचे म्हणणे होते . या मारहाणीत किरपालसिंग भांड वय वर्षे १४ याचा जागीच मृत्यू झाला होता. पण तो मृत झाला की नाटक करतोय, यासाठी धर्मांधांनी त्याच्यावर गरम पाणी टाकून तपासले. तसेच डोळ्यात मिरचीची पुडही टाकली. क्रुरतेचा कळसच या धर्मांधानी गाठला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे उर्वरित दोघांचे प्राण वाचले आहेत. हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच गुन्हेगारांना जबर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन , भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केले.

https://drive.google.com/file/d/1A_ZsHcaL04ShL0A6b-SktyzJJH13aTIU/view?usp=sharing

या संदर्भात न्याय मिळण्यासाठी भटके विमुक्त रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. विविध संघटनांनी या क्रूर हत्याकांडाचा निषेध सरकारकडे नोंदवत , न्यायाची व आर्थिक मोबदल्याची मागणी केली आहे. विविध माध्यमांनी या अमानवीय घटनेची दखल घेतली आहे. शिकलकरी समाज हा महाराष्ट्रात(Maharashtra) भटके विमुक्त असला तरी तो शीख पंथाचा एक भाग आहे. त्यामुळे या प्रकरणात शीख समुदायाने लक्ष घातले आहे. शिखांच्या विविध संघटनांनी याचा निषेध नोंदवला आहे. पंजाबी माध्यमांनी देखील याची दखल घेतली आहे. सोशल मीडियावर या क्रूर, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे.

या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून राज्यभर निवेदन देण्याचे काम सुरू आहे. यात या घटनेचा निषेध करतानाच, ही घटना पूर्वनियोजितपणे कट आखून रचण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी यात करण्यात आली आहे. भटके विमुक्त विकास परिषदेचे प्रांत कार्यवाह नरसिंग झरे, जिल्हा संयोजक गोविंद भंडे, विभाग समन्वयक शरद दिवे यांनी पिडितांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली व भविविप या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे असा दिलासा दिला.

याप्रकरणी सध्या सय्यद एजाज सय्यद इब्राहिम , सय्यद अक्रम सय्यद अगामीया , सय्यद तोहीद सय्यद समंदर, सय्यद फजलू सय्यद अली, शेख जावेद शेख पिरमिया, पाशा खान उर्फ बाबा खान , पी .अफजल खान या आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण नऊ पैकी सात आरोपी पकडले गेले आहेत. माजी सरपंच अक्रम पटेल यांना आधीच अटक झालेली आहे.

सचखंड दरबार हुजूर साहेब नांदेड गुरुद्वारा चे प्रशासक माजी पोलीस संचालक डॉक्टर पसरीच्या यांच्या आदेशानुसार, एका शिष्टमंडळाने परभणी येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले . तसेच या मुलांसाठी गुरुद्वारातर्फे उच्चतम इलाजाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी मोक्का लावण्याची मागणी करतानाच , आर्थिक मदतीचीही त्यांनी मागणी आपल्या निवेदनात केली . पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा, अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन करून महाराष्ट्र बंद करण्याचे आव्हान केले जाईल, असे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. रिपब्लिकन सेना व शिवसेना( शिंदे) यांनी अशाच प्रकारे आपले निवेदन सरकारला सादर केले आहे.

अत्यंत क्रूरपणे अमानवीय पद्धतीने कोणतीही शहानिशा न करता चोरीची आवई उठवून, अल्पवयीन मुलांना कायदा हातात घेत जबर मारहाण करणाऱ्या, या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे .पुरोगामी महाराष्ट्राला ही काळीमा फासणारी घटना आहे .हा पूर्वनियोजित कट असल्याचे शिकलकर समाजाचे म्हणणे आहे. भटके विमुक्त विकास परिषद याचा पाठपुरावा करून, आरोपींना शिक्षा देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे , त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच न्यायास उशीर होत असेल तर भटके विमुक्त विकास परिषद या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच राज्यभर आंदोलन व मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधून घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

https://drive.google.com/drive/folders/1X2D_8JhxrUViJ3d_Skz3oCkAgFfHQGSE

Back to top button