InternationalIslamNewsWorld

आ बिलावल! बताता हूँ, असली कसाई कौन है ?..

अपयशी राष्ट्र,इस्लामी दहशतवादाचे केंद्रबिंदू ठरलेल्या इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला अक्कल येणार तरी कधी ?

“ओसामा बिन लादेन मेला आहे पण ‘गुजरातचा कसाई’ मात्र अजून जिवंत आहे,आणि आता तो भारताचा पंतप्रधान आहे.तो पंतप्रधान होईपर्यंत त्याला अमेरिकेत येण्यास देखील बंदी होती.” असे फुत्कार पाक विदेश मंत्री बिलावल भुट्टो ने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काढले आहेत.

इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे नाव घेतले की (नाव घेण्याची देखील इच्छा नाही ),आपल्या डोळ्यासमोर इस्लामी कट्टरता, जिहाद, फिदायीन हल्लेखोर आणि दहशतवादाचे चित्र उभे राहते.पाकिस्तानने काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठीच दहशतवादाला सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यातूनच ओसामा बिन लादेनसारखा दहशतवादी तयार झाला. त्याने अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर दहशतवादी हल्ला केला. विशेष म्हणजे, दहशतवादाविरोधात अमेरिकेला मदत करत असल्याचे नाटक करतानाच इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने ओसामा बिन लादेनलाही आपल्या देशात आश्रय दिला. त्याची सर्वप्रकारची बडदास्त ठेवली,याच जोडीला पाकिस्तानने हाफिज सईद, अयमान अल जवाहिरी आणि इतरही अनेक क्रुरकर्मा दहशतवाद्यांना पोसण्याचे काम केले.तो इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान भारताला उपदेश देण्याच्या पात्रतेचा कधीपासून झाला ?

इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची सध्याची लायकी फक्त कटोरा घेऊन देशोदेशांपुढे,विविध जागतिक संस्थांपुढे भीक मागण्याचीच आहे.

इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान म्हणजे दहशतवादाचा केंद्रबिंदू

जग पाककडे ‘दहशतवादाचा केंद्रबिंदू म्हणून पाहते. त्याने चांगला शेजारी बनण्याचा प्रयत्न करावा, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले. ‘जे लोक आपल्या घरामागील अंगणात ( backyard) साप पाळतात, ते साप त्यांनाच ते चावतात, या क्लिंटन यांच्या सल्ल्याचीही जयशंकर यांनी आठवण करून दिली.

पाकची लायकी दिसली

बिलावल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदविला. भारताने त्यांच्या वक्तव्याला ‘असंस्कृत’ म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, या टिप्पण्यांमधून पाकिस्तानची लायकी किती आहे. ते भारताविरुद्ध विष ओकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे दिसून येते.
बिलावल भुट्टो तू विसरला का जेव्हा पाकिस्तान सरकारने बांग्लादेशात हिंदूंची कत्तल केली होती; दुर्दैवाने आजपर्यंत पाकिस्तानच्या अल्पसंख्याकांबद्दलच्या दृष्टिकोनात बदल झालेला नाही आणि आज ते भारतावर आरोप करीत आहेत.

एस. जयशंकर काय म्हणाले

बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यावर एस. जयशंकर म्हणाले की, “जो देश ओसामा बिन लादेनचा पाहुणचार करत होता, ज्या देशाने आपल्या शेजारी देशाच्या संसदेवर हल्ला केला, तो देश संयुक्त राष्ट्रांसारख्या शक्तीशाली मंचावर उपदेश देण्याच्या योग्यतेचा नाही.” यासोबतच त्यांनी संयुक्त राष्ट्रांत नकाराधिकाराचा वापर करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बचाव करणार्‍या चीनलाही फटकारले. ते म्हणाले की, संबंध जग दहशतवादाविरोधात संघर्ष करत आहे आणि अशा काळात चीन दहशतवादी हल्ले करणार्‍या, षड्यंत्र रचणार्‍यांना योग्य ठरवत आहे, त्यांना वाचवण्यासाठी जागतिक मंचाचा दुरुपयोग करत आहे.आज अवघे जग दहशतवादाविरोधात एकजूट होत आहे. दहशतवादाचा खात्मा कसा करता येईल, यावर विचारविनिमय केला जात आहे, धोरण आखले जात आहे. अशा परिस्थितीत चीनसारखा देश मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असूनही दहशतवाद्यांना, दहशतवादाला पाठीशी घालत असेल तर ते खपवून घ्यायला नको.”

५१ वर्षांपूर्वी भारताने जगाचा नकाशा बदलला होता…

बिलावल ने ही घाणेरडी गरळ ओकायचा मुहूर्त मात्र साफ चुकला आहे,कारण आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी भारताने जगाचा नकाशा बदलला होता…पाकिस्तानने भारतासमोर सपशेल शरणागती पत्कारली. १३ दिवस चाललेल्या या युद्धामुळे इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सैन्याने पूर्ण आत्मसमर्पण केले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. पाकिस्तानने सुमारे ९३ हजार सैनिकांसह भारतासमोर आत्मसमर्पण केले.हा भारताचा सर्वात मोठा विजय होता आणि यानंतर भारत जगात एक महाशक्ती म्हणून उदयास आला.

१६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेश नावाचे एक नवीन राष्ट्र जन्माला आले.हे युद्ध भारतासाठी ऐतिहासिक युद्ध मानले जाते म्हणूनच १६ डिसेंबर हा दिवस ‘विजय दिवस म्हणून देशभरात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

सुरक्षा परिषदेत:- काश्मीर

इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने जम्मू-काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव लागू करावा असे म्हटले आहे.तसेच, काश्मीर या आमच्या भागात शांतता कधी नांदेल ? असाही प्रश्न केला. पण, मुळात जम्मू-काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करायची असेल, तर इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने आधी त्याने कब्जा केलेल्या भूमीवरून सर्वप्रकारची माघार घेणे गरजेचे आहे. त्यावर मात्र इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान कधी बोलत नाही.

सारे काही भारताने करावे, अशी अपेक्षा मात्र तो भिकारी देश करत असतो.पुढे त्याने काश्मीरला आपले क्षेत्रही म्हटले. पण, भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीर पाकिस्तानचे कधी झाले?

महाराजा हरीसिंग यांनी जम्मू-काश्मीर भारतात विलीन केले होते, पाकिस्तानमध्ये नव्हे. उलट पाकिस्तानने मुस्लीम बहुसंख्येच्या आधारे तिथे टोळीवाल्यांना घुसवले अन् जम्मू-काश्मीरचा काही भाग बळकावला. त्याने केलेली ही कृती अनधिकृत असून आता ती दुरूस्त करण्याची वेळ आलेली आहे.

आज भारताकडे G-२० ची अध्यक्षता आहे,संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम भारत आज करत आहे.आणि तुम्ही मात्र संपूर्ण जगात कट्टर जिहादी इस्लाम पसरवत आहात.

भारताच्या वाटेला जायचा विचार सुद्धा इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने सोडून द्यावा, नाहीतर हा नवा सामर्थवान भारत तुम्हाला कुठल्या जहन्नुममध्ये गाडेल कळणार देखील नाही.

भुट्टो भुतावळीच्या खानदानात जन्माला आलेल्या बिलावलला खरा कसाई शोधायचा असल्यास त्याने आमच्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत अथवा सूचनांप्रमाणे खरा कसाई शोधून काढावा.

१- १४ ऑगस्ट १९४७ म्हणजे इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये २० टक्के हिंदू समुदाय राहत होता आज तो २ टक्के देखील नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी गुजरात प्रांतात मुसलमान लोकांची लोकसंख्या सुमारे ९ टक्के होती ती आज सुमार १२ टक्के आहे.तर मग असली कसाई कौन बिलावल ?

२-सुमारे ६ लाख हिंदू आमच्या हिंदू बंधू -भगिनींच्या प्रेतांवर इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान उभे राहिले आहे,तर मग असली कसाई कौन बे बिलावल ?

३- चल आपण एकत्र बांगलादेशला जाऊ आणि बांगलादेशच्या जनतेला विचारू असली कसाई कौन ? ते जे काही उत्तर देतील ते आम्ही मान्य करू तु ही करशील ना बिलावल ?

४- चल आपण एकत्र बलुचिस्तानला जाऊ आणि बलुचिस्तानच्या जनतेला विचारू असली कसाई कौन ? ते जे काही उत्तर देतील ते आम्ही मान्य करू तु ही करशील ना बिलावल ?

५- लाहोरच्या अहमदिया जनतेला आपण एकत्र जाऊन विचारू असली कसाई कौन ? ते जे काही उत्तर देतील ते आम्ही मान्य करू तु ही करशील ना बिलावल ?

६-ज्या सिंध प्रांतावर तुझ्या भुट्टो भुतावळीने हुकूमत गाजवली,अनिर्बंध सत्ता उपभोगली त्या कराची आणि हैदराबादच्या मुहाजिराना आपण एकत्र जाऊन विचारू असली कसाई कौन ?ते जे काही उत्तर देतील ते आम्ही मान्य करू तु ही करशील ना बिलावल ?

बिलावल आता तुझ्या लक्षात आलेच असेल की असली कसाई कौन ? नाहीतर आज ना उद्या तुला पटवून द्यायला भारतीय जनता आणि भारतीय सेना आतुर आहे..

Back to top button