EnvironmentNewsRSSकोकण प्रान्त

स्वच्छता ही सेवा…

Swachhta Hi Seva

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PMNarendraModi) यांच्या संकल्पनेतून “स्वछता ही सेवा” हा उपक्रम दरवर्षी ‘महात्मा गांधीजींच्या जयंती’ला स्मृति प्रित्यर्थ राबविला जातो. दरवर्षी स्वच्छतेतून देशसेवा करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम, या वर्षी १ ऑक्टोबर रविवारी घेण्यात आला.

देशभर “स्वच्छता ही सेवा” असा संदेश देत महाराष्ट्र राज्यात, “एकत्रितपणे १ तास स्वछता करण्यासाठी श्रमदान करा” असे आवाहन करण्यात आले.

मुंबई (BMC) महानगर पालिकेने स्वच्छता कार्यक्रमांसाठी मुंबईतल्या १७८ ठिकाणी आज रोजी मोहीम राबवली. मोठ्या संख्येने नागरिकांनी श्रमदान करावे असे आवाहन देखील करण्यात आले होते.

या १७८ पैकी १ मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर श्रमदानातून स्वच्छतेचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुंबई महानगर पालिकेने (MUMBAI) “ चला सारे एकत्र येऊया, आपली मुंबई स्वच्छ करूया” अशी आवाहन करणारी टॅगलाईन ठरवली होती.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री श्री एकनाथी शिंदे जी, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, कलाकार मंडळींमध्ये सुबोध भावे, पद्मिनी कोल्हापुरी, निल नितीन मुकेश,जुही चावला तर भारताच्या सागरी सुरक्षा दलातून ‘वेस्टर्न नेव्हल कमांड’चे वाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी या सर्वानी उपस्थिती लावली. राज्यपाल,मुख्यमंत्रीसमवेत सर्व सेलब्रिटींनी हातात झाडू घेऊन श्रमदान केले.

या स्वछता श्रमदानात तटरक्षक दल, सागरी सुरक्षा दल ( नेव्ही) आणि नेव्हल सिल्व्हीलियन्स ने मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला. तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात उपक्रमाविषयी, “ सामान्य नागरिकांनी विशेषकरुन तरुण पिढीने आणि शालेय विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सहभागाने आम्हांला भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे असे वाटते. गांधीजींच्या स्मृतीप्रित्यर्थ या मोहिमेतून गांधिजींना आमच्याकडून ही आदरांजलीच आहे.”

गिरगाव चौपाटीच्या मोहिमेत, अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान , नागरिक शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, एन सी सी विद्यार्थी, रिक्षा चालक मालक संघटन, महानगरपालिकेचे कर्मचारी व सफाई कर्मचारी,शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), सागरी मंच, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कर्मचारी अशा सर्व संघटनांनी आणि रहिवाश्यांच्या १ तास श्रमदान करुन गिरगाव चौपाटीचा भाग स्वच्छ केला. सर्व संघटनांची मिळून १२००च्या वर संख्या हजर होती.

अनंत चतुर्थीच्या गणेश विसर्जनांनंतर चौपाट्यांची स्वच्छता हा महानगर प्रशासनासाठी कळीचा प्रश्न बनलेला असतो. दरम्यान देशव्यापी “ स्वच्छता ही सेवा “ अशी श्रमदानाची चळवळ चालू झाल्याने मोठे काम चुटकीसरशी पार पडताना दिसले. गणेश विसर्जनांनंतर चौपाटीवर, सुतळी, हार, डेकोरेशन, थर्माकोल, प्लास्टिक, काचा, गोण्या, रब्बर असा कचरा पसरला होता. मोठ्या संख्येत कागद, कचरा छोट्या स्वरूपात विखुरलेला होता.

अशीच स्वच्छता सागरी सीमा मंचाने तटरक्षक दलाच्या सोबतीने अक्सा बीच वर देखील केली,अक्सा बीच वर सागरी सीमा मंच आणि आरएसएस यांचे २५० च्या वर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

चौपाटीच्या स्वच्छता कार्यक्रमाविषयी, “आम्ही दरवर्षी सागरी सीमे लगतच्या रहिवाश्यांना सोबत घेऊन अनंत चतुर्थीनंतर चौपाट्यांची स्वच्छता करतो. लोक जिथे राहतात तिथे श्रमदानाने नंदनवन घडवता येते हा या उपक्रमाचा गाभा आहे. नुसता प्लास्टिकचा वापर बंद केला तरी चौपाट्या आणि समुद्र मोठ्या प्रमाणात स्वच्छ होईल. केवळ चौपाटीवर स्वच्छता केल्याने समुद्राचे प्रदूषण मिटणार नाही हे खरे असले तरी, श्रमदानातून लोकांचा पर्यावरण आणि स्वछता याविषयीचा दृष्टिकोन बदलताना मी पहिला आहे. याचा खूप सकारात्मक परिणाम मिळतो. चौपाट्यांची स्वच्छता होते हा साईड इफ्फेक्ट म्हणता येईल.” असे सागरी सीमा मंच, कोकण प्रांतच्या चंद्रकांत गिरी यांनी प्रतिपादन केले.

Back to top button