HinduismNewsSpecial Day

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेली संस्थात्मक कार्ये

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला..

वेदांचे अभिमानी,सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आरक्षणाचे जनक असलेले छत्रपती शाहू महाराज मातृह्रदयी शासक होते. सामाजिक न्याय,जलसिंचन,कृषी,उद्योग क्षेत्रातील त्यांनी केलेले प्रयोग आजही प्रेरणादायी आहे. महाराजांनी करवीर संस्थानात संपूर्ण गोहत्याबंदी केली.वेदपठनाचा आधिकार सर्व हिंदुमात्रांना मिळवुन दिला. महाराज स्वत: आर्य समाजाच्या विचारांनी प्रभावित झालेले होते,त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वतीचा “सत्यार्थप्रकाश” हा ग्रंथ त्यांनी सरकारी आधिकार्यांना अनिवार्य केला होता. क्षात्रजगद्गुरु धर्मपीठाची स्थापना केली आणि सर्व जातींसाठी वैदीक पुरोहीत वर्ग सुरू केले.

राजर्षी शाहू महाराज (rajarshi shahu maharaj) हे कृतीशील सुधारक होते. गंगाराम कांबळे या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला त्यांनी चहाचे दुकान टाकायला मदत केली,एवढेच नाही तर स्वत: महाराज तिथे चहा घेत असत. अस्पृश्यतेमुळे हिंदु समाजाचे विघटन झाले,त्यामुळे अशा समाजघातक गोष्टी बंद व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले.


*२ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांचे राज्यारोहण झाले.
*१८९४ साली त्यांनी समाजातून तलाठ्यांच्या नेमणुकांना सुरुवात केली.
*१८९५ साली कोल्हापुरी ते “शाहूपुरी” गुळाची बाजारपेठ सुरू केली.
*१८९६ साली सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी “राजाराम” हे वसतिगृह सुरू केले.
*१८९७ साली “व्हिक्टोरिया लेप्रसी” या हॉस्पिटलची स्थापना केली.
*१९०१ साली “व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग” ची स्थापना केली.
*१९०२ साली सरकारी नोकऱ्यांत मागासवर्गासाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.
*१९०७ साली सहकारी तत्त्वावर कापड गिरणीची उभारणी केली.
*१९०७ साली अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी “मिस क्लार्क बोर्डिंग” वसतिगृह उभारले.
*१९०९ साली राधानगरी धरण बांधले
*१९१३ साली कोल्हापुर संस्थानातील सर्व खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्या.
*१९१६ साली डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली.
*१९१७ साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
*१९१७ साली विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.
*१९१८ साली अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने जमिनी केल्या तसेच वेठबिगारी बंद केली.
*१९१८ साली आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
*१९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
*१९१८ साली कुलकर्णी वतने रद्द करून पगारी तलाठी नेमणूक सुरू केली.
*१९१९ साली बलुतेदारी पद्धत बंद करून दंडाची तरतूद केली.
*१९१९ साली स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला.
*१९२० साली माणगाव येथे त्यांनी अस्पृश्यांची परिषद भरवली.
*१९२० साली घटस्फोटाचा कायदा केला, देवदासी प्रथा कायद्याने बंद केली.
*१९२० साली ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला होता. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, तसेच स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.

राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सरकारने २६ जून हा दिवस “सामाजिक न्याय दिवस” म्हणून घोषित केला आहे.

राजश्री छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

Back to top button