National Security

प्रधानमंत्रांचे रक्षण करण्यास सज्ज : स्वदेशी मुधोळ हाऊंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देण्यात येणाऱ्या SPG सुरक्षाव्यवस्थेतील श्वान पथकात आता मुधोळचे श्वान समाविष्ट करण्यात येणार आहे. मुधोळ हाऊंड्स (Mudhol Hounds) नावाने कुत्र्यांची ही जात प्रसिद्ध आहे. मुधोल हाऊंड हे आधीच भारतीय हवाई दल आणि इतर सरकारी विभागात सेवा देत आहेत परंतु पंतप्रधानांच्या सुरक्षा दला (Security Force)त त्यांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुधोळ हाऊंड्सची वैशिष्ट्ये
कर्नाटकातील बागलकोट भागातील मुधोळ परिसरात हा कुत्रा आढळतो. मुधोळ हाउंड हा कुत्रा त्याच्या विशेष कार्यशक्ती आणि शिकार करण्याच्या वृत्तीसाठी ओळखला जातो. हा जर्मन शेफर्ड कुत्र्यांपेक्षा वेगवान कुत्रा मानला जातो. स्वदेशी जातीच्या कुत्र्यांमध्ये मुधोळ हाउंड्स ही सर्वात शिकारी गुणवत्ता, निष्ठावान आणि निरोगी प्रजाती मानली जाते. याच कारणामुळे पहिल्यांदाच देशी जातीच्या कुत्र्याला प्रथम भारतीय हवाई दलात आणि आता SPG पथकात समाविष्ट करण्यात आले आहे.

मुधोळ हाऊंड्स हरणासारखा उंच, काटक असतो. ओळखीशिवाय कुणाचाही स्पर्श सहन करत नाही.चेहराही सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक निमुळता असतो. मुधोळ हाऊंड त्यांच्या उंचीमुळे इतरांपेक्षा वेगळी दिसतात. जे काम जर्मन शेफर्ड कुत्रे 90 सेकंदात पूर्ण करतात, ते काम मुधोळ हाऊंड्स अवघ्या 40 सेकंदात पूर्ण करतात.

इंग्लिश ग्रे हाउंड ला तोडीस तोड म्हणून मुधोळ हाऊंड:
मुधोळ हाऊंड्सने इंग्रजांनाही भुरळ पाडल्याचा इतिहास आहे. इंग्लंडचे पाचवे किंग जॉर्ज भारतात आले तेव्हा जे चार जातीचे श्वान दाखवले होते त्यात मुधोळच्या कुत्र्यांचा समावेश होता. “How beautiful hounds of Mudhol” असं किंग जॉर्जने म्हटल्यापासून या कुत्र्यांना मुधोळ हाऊंड्स असे नाव पडले.

जागतिक स्तरावर जातिवंत कुत्र्यांमध्ये भारतीय मुधोळ हाऊंडचा समावेश केला जातो.फक्त दर्दी लोकांकडे हे श्वान आढळते.गेल्या काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात पहिल्यांदाच एका देशी श्वानाचा म्हणजे मुधोळ हाऊंडचा समावेश करण्यात आला.स्फोटके हुंगण्याची त्यांची क्षमता इतर कुत्र्यांपेक्षा किती तरी पटीने जास्त आहे हे अभ्यासाअंती सिद्ध झाले. शिवाय कोणत्याही वातावरणात सहज जुळवून घेण्याची क्षमता या श्वानात आहे. सहजासहजी ते आजारी पडत नाही.2017 पासून या श्वानांना प्रशिक्षण देऊन लष्करात सामील करण्यात आलं.मराठा पराक्रमाचा वारसा मुधोळ हाऊंडच्या रूपाने भारतीय लष्करात जपला जात आहे.

पंतप्रधानांनी आपल्या यांनी मन की बातमध्ये मुधोल हाऊंड श्वानांचा उल्लेख केला होता. “जर या प्रजातीच्या श्वानांना घरातही पाळलं तर भारतीय श्वानांच्या प्रजातींना प्रोत्साहन मिळेल आणि स्वावलंबी भारत घडवण्यासाठी ते आवश्यक आहे.

कर्नाटकातील मुधोळ मध्ये सरकारने या श्वानांच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर केंद्र चालू केली आहेत.यातून अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे.

भारतात पाश्त्यांचे अंधानुकरण करणारे म्हणतात, विदेशी म्हणजेच उत्तम गुणवत्ता त्यांना स्वदेशी ‘मुधोळ हाऊंड’ एक चपखल चपराक आहे.

Back to top button