News

घडवला इतिहास

देशभरात आनंदोत्सवाला सुरुवात

राष्ट्रपती निवडणुकीत द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे.आदिवासी महिला नाचून आनंद साजरा करत आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर पहिल्या आदिवासी महिला विराजमान होत असल्याने देशभरात आनंद साजरा केला जातोय. त्याचाच भाग म्हणून दिल्लीत ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला जातोय.

आज देशाला 15 वे राष्ट्रपती (President) मिळाले आहेत.विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं.आता द्रौपदी मुर्मू यांचा विजय जाला आहे ,आता त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील.

सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती

18 जुलै 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या तर 25 जुलै रोजी त्यांचा शपथविधी होईल. ज्या दिवशी त्या शपथ घेईल त्या दिवशी त्यांचे वय 64 वर्षे 35 दिवस असेल. ज्या देशाच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनतील. आतापर्यंत सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर आहे. जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे वय 64 वर्षे, दोन महिने, 6 दिवस होते.

२५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन व्ही रामण्णा, द्रुपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ देतील.

Back to top button