Opinion

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्ट विचारांच्या ठाम विरोधात होते!

संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ, लेखक – धनंजय कीर

◾️कम्युनिस्टांनी चालवलेल्या कामगार चळवळीविषयी बाबासाहेब म्हणतात,”मी कम्युनिस्टांशी संबंध ठेवणे सुतराम शक्य नाही. मी कम्युनिस्टांचा कट्टर वैरी आहे.” कम्युनिस्ट आपल्या राजकीय ध्येयासाठी कामगारांना राबवित असतात असे त्यांचे स्पष्ट मत होते. (पृष्ठ क्र. ३२८)

◾️आझाद मैदानावर झालेल्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणतात, “आपण कम्युनिजम संबंधी वाचलेल्या पुस्तकांची संख्या सर्व भारतीय कम्युनिस्टांनी त्यासंबंधी वाचलेल्या पुस्तकांपेक्षा जास्त भरेल. कम्युनिस्ट हा कोणत्याही प्रश्नांची व्यावहारिक बाजू कधीच पाहत नाही.” (पृष्ठ ३३३)

◼️’लोकशाही’ आणि ‘साम्यवाद’ एकत्र नांदू शकतील ही विचारसरणी आंबेडकरांच्या मताप्रमाणे एकदम चुकीची होती. कारण साम्यवाद म्हणजे अरण्यातील वणवा आहे. तो त्याच्या मार्गात येणाऱ्या सगळ्यांचा स्वाहा करत जातो. या वनव्याच्या आसमंतात असणाऱ्या देशांना मोठाच धोका निर्माण झाला आहे. (पृष्ठ ५०४)

◼️जे पंचशील बौद्ध धर्माचे महत्वाचे अंग आहे त्या पंचशीलवर माओ चा किंचित तरी विश्वास असता, तर त्याने आपल्या देशात बौद्ध धर्मियांना खचितच वेगळ्या रीतीने वागवले असते. कम्युनिस्ट देशातील राजकारणात पंचशीलला स्थान नाही. (पृष्ठ ५०५)

◼️’मार्क्सवाद’ आणि ‘साम्यवाद’ यांनी जगाचे सर्व धर्म हादरून टाकले आहेत. बुद्ध हाच कार्ल मार्क्स ला पूर्ण उत्तर आहे. ज्या बौद्ध देशांनी साम्यवाद स्वीकार केला आहे, त्यांना साम्यवाद काय हेच कळत नाही. (पृष्ठ ५४५)

◼️’बुद्ध’ आणि ‘मार्क्स’ यांचे ध्येय एकच असले तरी त्यांचे मार्ग भिन्न होते. मार्क्सवाद हा अत्याचारी आहे, तर बुद्धांचा मार्ग अनात्याचारी आहे. मार्क्सचा मार्ग हिंसेवर अधिष्ठित आहे. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ अनुसरल्याशिवाय जगात शांतता नांदने अशक्य आहे. (पृष्ठ ५६४, ५६५)

◼️संपाचे हत्यार फार जपून वापरावे. क्वचित प्रसंगी कामगारांच्या हितासाठी वापरावे. कम्युनिस्ट नेत्यांच्या राजकीय उद्दिष्टांसाठी त्याचा वापर केला जाऊ नये, असे पू. बाबासाहेबांचे म्हणणे होते.

◼️कम्युनिस्टांची कामगार चळवळ ही खरीखुरी कामगार चळवळ नाही. कामगार हितापेक्षा राज्यक्रांतीच्या उद्देशाने ती अधिक प्रेरित झालेली आहे, असे बाबासाहेब म्हणाले. पोटात एक आणि ओठात एक ही त्यांची कार्यपद्धती ते चांगलेच ओळखून होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 70 वर्षांपूर्वी आपल्याला कम्युनीजम आणि माओवादी विचारांचा धोका लक्षात आणून दिला आहे. त्यांचे हित कायम कम्युनिस्ट राष्ट्रांकडे एकवटलेले असते. क्रांती, समानता, स्वातंत्र्य, हक्क, अन्याय अश्या लक्ष्यवेधी शब्दांचा वापर करून ही मंडळी केवळ राजक्षोभ आणि असंतोष निर्माण करण्यासाठी उपयोग करतात. त्यामुळे आपण सुजाण भारतीय नागरिक म्हणून सदैव सावध राहिले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार ‘राष्ट्रसंदेश’ म्हणून कायम लक्षात ठेवले पाहिजे.

(टीप – लेखक धनंजय किर यांचा हा चरित्र ग्रंथ स्वतः पू. बाबासाहेबांनी वाचून त्यास मान्यता दिली आहे.)

Back to top button