News

Commonwealth Games 2022 : मीराबाई चानूची ‘गोल्डन’ कामगिरी,

मीराबाई चानूने(Mirabai Chanu)भारताला राष्ट्रकुल 2022 चे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाई चानूची ‘गोल्डन’ कामगिरी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे. त्याने एकूण 201 किलो वजन उचलून विक्रमी सुवर्णपदक जिंकले. चानूने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले आणि खेळाचा विक्रमही केला. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने राष्ट्रकुल आणि स्नॅचमध्ये हा खेळ विक्रम केला. (India’s first gold medal in Birmingham)

चानूने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम केला.

मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक-2022 मध्ये 49 किलो वजनी गटात भारताला पहिले रौप्य पदक जिंकून दिले. त्यांच्या आधी कर्णम मल्लेश्वरी यांनी 2000 मध्ये ही कामगिरी केली आहे. गोल्ड कोस्ट येथे 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. 2014 मध्ये झालेल्या या खेळांमध्ये तिला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. याशिवाय चानूने 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

मीराबाई चानूचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. ती मणिपूरची राजधानी इंफाळमधील नॉन्गपोक काकचिंग गावातून आली. तिचं हे गाव तिच्या अकादमीपासून 25 किलोमीटर अंतरावर होतं आणि अशा परिस्थितीत ती रोज ट्रकचालकांसोबत सराव करायला येत होती.

Back to top button