News

आता राजपथ होणार ‘कर्तव्यपथ’

Rajpath & Central Vista : नाव बदलल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण परिसर आता ‘कर्तव्य पथ’ म्हणून ओळखला जाणार आहे.

आत्मनिर्भर व्ह्यायचे असेल तर स्व ची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे.जसे छत्रपतींनी फारसी भाषेचा राज्यकारभारात वापर कमी करून मराठी भाषेचे पुनरुत्थान केले. संपूर्ण देशात सुरु असलेले पुनःजागरण हे त्याचेच प्रतीक आहेत.उत्तरप्रदेशात फ़ेजाबाद चे ‘अयोध्या,’महाराष्ट्रातील औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ ही काही उदाहरणे आपली प्राचीन ,सनातन संस्कृती निर्देशित करतात. म्हणतात ना “जो इतिहासाला विसरतो इतिहास त्याला विसरतो”

७ सप्टेंबरला नवी दिल्ली महापालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राजपथ आणि सेंट्रल विस्टा लॉन्स या भागाला ‘कर्तव्यपथ’ असे नाव दिले जाऊ शकते. इंडिया गेटवरील नेताजींचा पुतळा ते राष्ट्रपती भवन हा रस्ता राजपथ या नावाने ओळखला जातो. दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन संचलन याच रस्त्यावर होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात या मार्गाचे नाव ‘किंग्जवे’ असे होते. स्वातंत्र्यानंतर त्याचाच अनुवाद करून राजपथ करण्यात आले.

सरकारने यापूर्वी २०१६ मध्ये पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘रेस कोर्स रोड’चे नाव बदलून ‘लोक कल्याण मार्ग’ असे केले होते. अकबर रोड, तुघलक रोड ही नावे गुलामगिरीचे प्रतिक असून ती बदलण्याची देखील मागणी सातत्याने जनतेतून केली जाते.

राजपथाचा इतिहास

राजपथ मार्ग हा ब्रिटीश राजा जॉर्ज पंचम यांच्याशी संबंधित आहे. एवढेच नाही तर इंडिया गेटवर ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत, तिथे फार पूर्वी किंग जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. विशेष म्हणजे, बोस यांनी राजा जॉर्ज पंचम विरुद्ध संघर्ष केला होता. १९११ मध्ये किंग जॉर्ज पंचम दिल्ली भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ त्या काळात या रस्त्याला ‘किंग्ज वे’ असे नाव देण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतरच सेंट्रल व्हिस्टाचे नाव ‘राजपथ’ असे ठेवण्यात आले. ज्याला आता ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखले जाईल.

राजधानीतील प्रमुख रस्त्यांच्या नावाचा इतिहास

राजधानीतील रस्त्यांच्या नामांतराच्या संदर्भात अल्बुकर्क रोडचे नाव बदलण्यात आले. महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ अल्बुकर्क रोडवरील बिर्ला हाऊसमध्ये घालवला, म्हणून त्यांच्या हत्येनंतर लगेचच या रस्त्याला ‘३० जानेवारी मार्ग’ असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर आठ वर्षांनी १९५५ मध्ये ‘किंग्स-वे राजपथ’ आणि ‘क्वीन्स-वे जनपथ’ बनले. अंतरिम सरकार स्थापन झाल्यावर २ सप्टेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरुंना राहण्यासाठी बंगला मिळालेल्या यॉर्क रोडचे मोतीलाल नेहरु मार्ग असे नामकरण करण्यात आले. डॉ राजेंद्र प्रसाद क्वीन्स व्हिक्टोरिया रोडवरील एका बंगल्यात राहत होते, म्हणून त्या रस्त्याला डॉ राजेंद्र प्रसाद हे नाव दिले. देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांचे निवासस्थान किंग एडवर्ड रोडवर होते, त्यानंतर त्यांच्या मृत्यूपश्चात त्याचे नाव ‘मौलाना आझाद रोड’ असे करण्यात आले.

पंतप्रधानांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १५ ऑगस्टच्या भाषणात वसाहतवादी मानसिकतेशी संबंधित चिन्हे रद्द करण्यावर भर दिला होता. त्यांनी २०४७ पर्यंत देशाला स्वावलंबी,आत्मनिर्भर तसेच कर्तव्याच्या महत्त्वावरही भर दिला. त्यामुळेच आता राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्यपथ’ करण्यात येत आहे. भारत राष्ट्र सामर्थ्यवान, शक्तीसंपन्न करण्यावर आपला भर असला पाहिजे.

ब्रिटिशांपासून आपण ७५ वर्षांपूर्वीच स्वातंत्र मिळवले. लाखो देशभक्तांनी आपले रक्त सांडलें तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्य उजाडला. पारतंत्र ते स्वराज्य असा हा कठीण काळ आपण अनुभवला आहे.आता मात्र स्वराज्य ते सुराज्य असा प्रवास आपल्याला करायचा आहे,त्यावर गुलामीची काळी छटा देखील आता नको आहे.

Back to top button