BusinessECONOMYNews

लघु उद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन

लघु उद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन दि.16/09/2022 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सुमारे 800 उद्योजक उपस्थित राहणार आहेत.सदर मेळाव्याचे उदघाटन केंद्रीय अर्थमंत्री मा.निर्मलाजी सितारामन ( भारत सरकार) व केंद्रीय लघुउद्योग मंत्री मा. नारायण राणे (भारत सरकार)यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.भागवतजी कराड, महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणीस, याची विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती राहणार आहे.

सदर मेळाव्यात Importance of Product Branding & Marketing in MSME ,Opportunities in Agriculture & Food Processing ,MSME Finance व Opportunities in Exports या संदर्भात उद्योजकांना मार्गदर्शन होणार आहे. मेळाव्यात अ.भा.लघु उद्योग भारती पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात उद्योजकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन, महाराष्ट्र लघु उद्योग भारतीचे रविंद्र वैद्य (अध्यक्ष ),भूषण मर्दे(सचिव),मिलिंद पोहनेरकर (प्रचार प्रमुख) यांनी केले आहे.

संपर्क: 9422202497 Email : milindp2014@gmail.com


Back to top button