News

भारतीय कलाकृतींची घरवापसी…

भारतातून चोरलेल्या, तस्करीत ३४ कोटी किमतीच्या ३०७ पुरातन वस्तू अमेरिकेने केल्या परत

आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कच्या १५ वर्षांच्या तपासाचा भाग म्हणून चोरलेल्या ३०७ वस्तू अमेरिकेने भारताला परत केल्या आहेत.परत पाठवलेल्या वस्तूंची अंदाजे किंमत ३४ कोटी पेक्षा जास्त आहे, या वस्तू न्यूयॉर्क आर्ट डीलर सुभाष कपूर यांच्याशी निगडीत आहेत, ज्यांच्यावर सध्या भारतात तस्करीच्या गुन्ह्यांसाठी खटला सुरू आहे. डीलर सुभाष कपूर यांना सर्वप्रथम अटक जर्मनीत झाली.त्या नंतर त्याला इंटरपोलने भारताला सुपूर्द केले, त्याच्यावर अमेरिकेत आणि श्रीलंकेत देखील खटला सुरु आहे.

अमेरिकेतील सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार कपूर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मंदिरे आणि पुरातत्व स्थळांमधून लुटलेल्या हजारो कलाकृतींची तस्करी केली. नंतर खोटे दस्तऐवज तयार केले आणि डीलरच्या माध्यमातून न्यूयॉर्क आर्ट गॅलरी आणि इतर ठिकाणी या पुरातन वस्तू विकल्या.

सन २०११ मध्ये, भारतीय अमेरिकन डीलरला जर्मनीमध्ये अटक करण्यात आली आणि आरोपीना भारतात पाठवण्यात आले. पुढच्या वर्षी अमेरिकेने त्याच्यावर चोरी, कट रचणे, फसवणूक करण्याची योजना आखणे आणि चोरीच्या मालमत्तेचा ताबा यासह अनेक गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले.”ऑपरेशन हिडन आयडॉल” तपासात अमेरिकन अधिकाऱ्यांनी कपूर यांच्या तस्करी संबंधातील – अंदाजे १२० कोटी किमतीच्या २५०० हून अधिक कलाकृती जप्त केल्या.

न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासात सोमवारी झालेल्या समारंभात परत देण्यात आलेल्या ३०७ कलाकृतींपैकी, २३५ कलाकृतीं कपूर यांच्या चौकशीचा भाग म्हणून जप्त करण्यात आल्या होत्या.त्यापैकी एक विस्तृतपणे कोरलेली संगमरवरी तोरण/कमान आहे, ज्याला “आर्क परिकार” म्हणतात, जी १२व्या किंवा १३व्या शतकातील आहे आणि त्याची किंमत अंदाजे ७० लाख आहे.तपासकर्त्यांचे असे म्हणणे आहे की कपूर यांनी या कमानीची , “गवतामध्ये किंवा जमिनीवर पडलेल्या” विविध प्रतिमांची छायाचित्रे पहिली होती. 2002 मध्ये भारतातून अमेरिकेत तस्करी करण्यास मदत केली होती.त्यानंतर त्याने ही कलाकृती एका खाजगी संग्रहालयात नेली. ही कमान नंतर येल युनिव्हर्सिटी आर्ट गॅलरीला दान करण्यात आली होती.

अमेरिकेने २०० हून अधिक भारतीय कलाकृती २०१६ मध्ये भारतात परत पाठवल्या. कपूरने आयात केलेल्या शिपमेंटचा एक भाग धार्मिक पुतळे, कांस्य आणि टेराकोटाच्या तुकड्यांसह ७० कोटी पेक्षा जास्त किंमत आहे.या वर्षाच्या सुरुवातीला, न्यूयॉर्कच्या या कार्यालयाने कंबोडियाला लुटलेल्या २४ कलाकृती परत केल्या. कपूर यांच्यावर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळसह आशियातील देशांमधून लुटलेल्या वस्तू चोरल्याचा आरोप आहे.

नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलियाने यादरम्यान कपूरकडून अनेक प्रसंगी मिळवलेल्या वस्तू परत केल्या आहेत, अगदी अलीकडे २०२१ मध्ये जेव्हा त्याने थेट त्याच्या गॅलरीतून खरेदी केलेल्या डझनहून अधिक वस्तू परत केल्या. त्या वेळी, संग्रहालयाचे संचालक, निक मित्झेविच यांनी सांगितले की कपूर यांनी “जगभरातील अनेक ग्राहकांची, आर्ट शॉप्सची फसवणूक केली होती.”

सात वर्षांपूर्वी, ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान, टोनी अबॉट यांनी त्यांचे भारतीय पंतप्रधानांकडे दोन ९०० वर्षे जुन्या कलाकृती भेट म्हणून दिल्या होत्या.

न्यूयॉर्क आर्ट डीलर नायेफ होम्सी यांच्या तपासादरम्यान आणखी एक वस्तू जप्त करण्यात आली होती, तर उर्वरित ६६ वेगवेगळ्या कलाकृती छोट्या तस्करी नेटवर्कशी जोडल्या गेल्या होत्या.

मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अटर्नी अल्विन एल. ब्रॅग, ज्युनियर यांनी एका प्रेस निवेदनात म्हटले आहे की,

” भारतीय लोकांना या कलाकृती परत केल्याचा आम्हाला अभिमान आहे “

District Attorney’s (DA) कार्यालयाच्या पुरातन वस्तू तस्करी युनिट, वकील, अन्वेषक आणि कला तज्ञांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सने डिसेंबर २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून जवळपास २२०० पुरातन वस्तू परत करण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत, २२ देशांना अंदाजे १३२ कोटी किमतीच्या वस्तू परत केल्या आहेत.

न्यूयॉर्क येथील Manhattan District Attorney’s office या कार्यालयाचे आम्ही शतशः ऋणी आहोत त्यांनी प्रयत्नपूर्वक,अभ्यासकरून, चिकाटीने या मूर्ती ,कलाकृती शोधल्या आणि त्या त्या देशांना परत केल्या.

कला म्हणजे कुठलीही गोष्ट विशेष सादरीकरणाने प्रस्तुत करणे, आपल्या मनोभावनांच्या अविष्कारांना त्या सादरीकरणात अंतःकरणपुर्वक ओतणे. तरच ती गोष्ट केवळ आहे तशी न दिसता, त्यापेक्षाही अधिक ऊत्कट वाटते.बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्या गोष्टीमध्ये अधिक काहीतरी जाणवते.

या कलाकृती अमेरिका-भारत परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यास सहाय्यकारक ठरतील यात शंका नाही.

Back to top button