OpinionRSS

कुठे नेऊन ठेवलाय… लोकसत्ता माझा

लोकसत्ता संघ विरोधी का..

देशातला हिंदू,हिंदू म्हणून एकत्र येतोय / होतोय हे लोकसत्ताच्या डोळ्यात खुपत तर नाही ना..

ब्राम्हणांनी पापक्षालन करायालाच हवे-सरसंघचालक हा लोकसत्ताची बातमी वाचली.आणि त्यानंतर त्या वक्त्यव्याचा व्हिडीओ देखील बघितला, पण त्यात कुठे ही “ब्राम्हणांनी पापक्षालन” करावे असा शब्द प्रयोग कुठे ही आढळून आला नाही.. निव्वळ थाप मारावी इतका “लोकसत्ता” लहान झालाय का आज… आणि तीही सरसंघचालकांच्या नावाने..

“लोकसत्ता” निश्चितच छोटे वृत्तपत्र नाही(स्वतःस छोटे समजत असतील तर चूक आमची नाही ) त्यांनी अशी लबाडी का करावी ? असा प्रश्न पडला आहे. आता बातमी कशी असते हे तुम्हाला शिकवावेच लागेल..

कोणतेही वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाहीत तर सत्यशोधनाची आणि विश्लेषणाची संपूर्णतया जबाबदारी संपादकाची असते. ‘फॅक्ट्स आर सेक्रेड बट कॉमेंट्स आर फ्रि’ या पॉल स्कॉट (“Comments are free but facts are sacred.” :- C.P. Scott) यांच्या सुप्रसिध्द वचनानुसार घटनेवरील भाष्याचे स्वातंत्र्य संपादकाला अग्रलेखात घेता येते. म्हणूनच वृत्तपत्रात अग्रलेखाचे महत्त्व वादातीत मानले जाते.संपादकांनी विवेकाचा शब्द हरवू नये व त्याने तटस्थपणे रहायला शिकले पाहिजे समाजाच्या वाईट प्रवृत्तीवर संपादकाने नेहमीच लिहावेच त्याचबरोबर चांगल्या गोष्टीही लोकांसमोर आणाव्यात.

महाराष्ट्रात अग्रलेखांची फार मोठी परंपरा आहे.आचार्य अत्रे, अनंत भालेराव, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, निळकंठ खाडिलकर यासारख्या नामवंत संपादकांच्या अग्रलेखांनी मराठी मनाला/ वाचकाला समृद्ध केले आहे.

जाती/ज्ञाती, यावर स्पष्ट बोलायला कोणी मायचा लाल धजावत नाही, म्हणूनच सरसंघचालकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण त्यांनी धमक दाखवली आहे. राष्टीय स्वयंसेवक संघावर आता पर्यंत अनेक चुकीचे,खोटे-नाटे,गलिच्छ आरोप झाले आहेत.त्यांना पुरून संघ आज आपल्या विचारांवर ठामपणे उभा आहे.

मुद्दाम संघाची बातमी देताना कायमच खडसाळपणा का सुचतो ? संघाविषयी बरे-वाईट लिहिणे हा आपला प्रिय छंद तर नाही ना ? कारण याच ऑक्टोबर महिन्यात संघाविषयी समाजात विखार पसरवणाऱ्या पाच बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. संघाविषयी इतका विद्वेष मनात आकस कशासाठी ? हीच का तुमची निपक्ष पत्रकारिता.. तुम्हाला समाजात तेढ निर्माण करायची आहे का ? तुमच्या या बकवास लेखांनी संघ बदनाम होईल असे वाटलेच कसे आपणास. संघ तुम्हाला पुरून/गाडून उरेल यात आमच्या मनात शंका नाही.

तुमची ही गुन्हेगारी मानसिकता ( habitual criminal ) लोकसत्ताला बुडवल्याशिवाय राहणार नाही.

अशी शंका जरूर येते की ” लोकसत्ताने कोणाकडून सुपारी तर घेतली नाही ना ..”

https://www.loksatta.com/nagpur/involvement-freedom-struggle-information-historical-evidence-faced-new-facts-ysh-95-3068161/?utm_source=whatsapp_web&utm_medium=social&utm_campaign=socialsharebuttons

https://www.loksatta.com/politics/rss-chief-mohan-bhagwat-tried-to-recover-the-side-of-rss-by-sidelined-the-dattatreya-hosabale-statement-on-unemployment-issues-print-politics-news-amy-95-3171345/?utm_source=whatsapp_web&utm_medium=social&utm_campaign=socialsharebuttons

https://www.loksatta.com/nagpur/need-policy-for-population-control-says-rss-chief-mohan-bhagwat-in-dussehra-rally-zws-70-3172245/?utm_source=whatsapp_web&utm_medium=social&utm_campaign=socialsharebuttons

https://www.loksatta.com/politics/what-is-the-reason-behind-for-the-march-at-rss-headquarters-print-politics-news-asj-82-3175581/?utm_source=whatsapp_web&utm_medium=social&utm_campaign=socialsharebutton

Back to top button