News

चीन-पाक मैत्रीची तिरडी उचलायला सज्ज:- दौलत बेग ओल्डी

यूपीएच्या सरकारच्या भोंगळ संरक्षण धोरणाला दौलत बेग ओल्डी एअर बेसवर तिलांजली..

कलम ३७०ची काळी रात्र मागे सरून विकासाची पहाट आता उजाडली आहे…

{केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे शुक्रवारी लडाख दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील एकूण ७५ प्रकल्पांचं लोकार्पण केलं. संबंधित सर्व प्रकल्प ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (Border Roads Organisation) अर्थात ‘बीआरओ’ने (BRO) उभारले आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील दहशतवादाबाबत मोठं विधान केलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मागील अनेक दशकांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांचा विकास न होणं, हे येथील दहशतवाद वाढण्यामागील एक महत्त्वाचं कारण होतं, असे त्यांनी म्हटलं आहे.बीआरओकडून उभारण्यात आलेल्या ७५ प्रकल्पांमध्ये ४५ पूल, २७ रस्ते, दोन हेलिपॅड आणि एक कार्बन-न्यूट्रल हॅबिटॅटचा समावेश आहे. हे प्रकल्प सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले आहेत. यातील २० प्रकल्प हे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत. तर लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी १८ प्रकल्प, उत्तराखंडमध्ये पाच आणि सिक्कीम, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये एकूण १४ प्रकल्प आहेत.}

स्वातंत्र्योत्तर दशकांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा विकास झाला नाही, हे काश्मीरमध्ये दहशतवाद वाढण्यामागील एक कारण आहे. येथील अंतर्गत संघर्षामुळे पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली. ज्याचा परिणाम जम्मू-काश्मीर आणि लडाखसह संपूर्ण देशावर झाला. आता सरकारच्या प्रयत्नांमुळे या प्रदेशात शांतता नांदत असून प्रगतीची नवी पहाट पाहायला मिळत आहे. आता तर आयफेल टॉवर पेखा उंच चिनाब ब्रिज, IIT ,IIM, श्रीनगर मधला आशियातला सगळ्यात मोठा मॉल या आणि या सारख्या मूलभूत सोयी आणि शाश्वत विकासावर सरकार प्रयत्नशील आहे.

चीनच्या उरात धडकी भरवणारी जगातील सर्वात उंचावर असलेली हवाई पट्टी म्हणजेच दौलत बेग ओल्डी

दौलत बेग ओल्डीचा हा युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जाणारा परिसर श्योक खोरे आणि दारबूक या परिसराला या १६००० फूटांवरील रस्त्याने जोडण्यात आले आहे. १६००० फूटांवर निर्मिती करण्यात आलेल्या या रस्त्याचे नाव DSDBO या नावाने ओळखले जाते. डीएसडीबीओ म्हणजे दारबूक श्योक दौलत बेग ओल्डी. इतक्या उंचीवर तयार करण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यामुळे लेह आणि काराकोरम हे प्रदेशही जोडले गेले आहेत.

दौलत बेग ओल्डी ही हवाई पट्टी चीन-पाक मैत्रीची तिरडी उचलायला पुरेशी आहे कारण त्या परिसरातुन सरळ काराकोरम खिंड दिसते. त्यातूनच चीन पाकिस्तानला जोडणारा काराकोरम महामार्ग (karakoram highway) जातो.साधी बोफोर्स तोफ देखील हा महामार्ग उध्वस्थ करू शकते.म्हणूनच भारताच्या दृष्टीने दौलत बेग ओल्डीचे सामरिक महत्व फार मोठे आहे. काराकोरम महामार्ग हा POK मधून जातो, त्यामुळे तो पूर्णपणे अनधिकृत आहे. POK भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यात कोणाचीही ढवळाढवळ आजचा नवा भारत खपवून घेणार नाही हे निश्चित..

१९६२ मध्ये तयार करण्यात आली होती हवाई पट्टी

सन १९६२ मध्ये भारत आणि तीन युद्धाच्या दरम्यान दौलत बेग ओल्डीची हवाई पट्टीची निर्मिती करण्यात आली. या हवाई पट्टीवर काही वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या सुपर हरक्युलस विमाने उतरण्यात आली होती. या व्यतिरिक्त येथे अनेक मोठी लढाऊ विमानांचे लँडिग देखील झालेले आहे. अशात या जगातील सर्वात उंचावर असलेल्या या एअरस्ट्रीपवर लँडिंग आणि ऑपरेशनच्या जुन्या अनुभवामुळे हवाईदलाला युद्धाच्या वेळी मोठा फायदा मिळू शकतो.

परंतु बिनडोक, नेभळट , शेपूट घालणारे संरक्षण धोरण सरकार राबवत होते. तात्कालिक संरक्षण मंत्री ए के एण्टनी संसदेत बोलत होते. विषय होता सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांचा. ते म्हणाले, सीमेवरील पायाभूत सुविधांच्या बाबतीत चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. त्यांनी निर्माण केलेले पायाभूत सुविधांचे जाळे आपल्या तुलनेच खूपच चांगल्या दर्जाचे आहे. परंतु सीमा भागात पायाभूत सुविधांचा विकास न करणे हा उत्तम बचाव आहे, असे धोरण आपण राबवले आहे. अविकसित पायाभूत सुविधा असलेली सीमा ही विकसित असलेल्या सीमेपेक्षा खूप सुरक्षित आहे. त्यामुळे अनेक वर्षे आपण सीमाभागात एअर फिल्ड, रस्ते आणि पूलांची निर्मितीच केलेली नाही.

एक हवाई पट्टी तयार करण्यासाठी वायूसेनेला आकाश-पातळ एक करावे लागले, सेनेला सरकार सोबत प्रचंड डोकेफोड करावी लागली शेवटी सरकारला अंधारात ठेवून हवाई पट्टी बांधावी लागली काय म्हणावे या सरकारी धोरणाला ?

शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणाऱ्या छत्रपती,महाराणांचा देश आहे हा, याचा सोईस्कर विसर आपल्या सरकारला पडला होता. लष्करी दृष्ट्या महत्वाच्या परिसराचा विकास तर सोडा आपण सांभाळू ही शकलो नाही म्हणूनच चीन ची आपल्या हद्दीत यायची हिम्मत झाली त्याला कडवे प्रत्युत्तर आपल्या वीर सैनिकांनी दिले.पण प्रश्न असा आहे की ही वेळच का यावी ?

हा रस्ता होण्या आधी या एअरबेसवर पोहोचण्यासाठी कित्येक दिवस पायपीट करावी लागायची. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे इथली वाट फार बिकट होती. कारण पायवाटा कच्च्या होत्या. आता सरकारने दरबुक श्योक ते दौलत बेग ओल्डी असा सुसज्ज रस्ता बांधला. याच रस्त्यावर श्योक येथे १२० मीटर लांबीचा लष्करी वाहनांना पेलू शकेल असा मजबूत पूलही आता बांधला आहे.

सध्याच्या घडीला सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत आहे.यासाठी बीआरओचं करावं तितकं कौतुक कमी आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि बीआरओच्या कामगिरीला संस्थात्मक स्‍वरूप देवून ते सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी लेह येथे एक संग्रहालय उभारण्‍यात येत आहे. हे संग्रहालय समाजासाठी प्रेरणा स्त्रोत असेल. या संग्रहालयाची इमारतही त्रिमितीय प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बांधण्‍यात येणार आहे. या संग्रहालयाचे काम पूर्ण झाल्यावर ती जगामध्‍ये सर्वात उंच त्रिमितीय इमारत असणार आहे.

राष्ट्रीय विचारांनी प्रेरित सरकारने आधीच्या सरकारचे भिकार धोरण मोडीत काढून केवळ सीमाभाग सुसज्ज केला नाही तर संरक्षण क्षेत्र निर्यात प्रधान,आत्मनिर्भर करण्याचा चंगही बांधला आहे. देशात पैसे नसल्यामुळे राफेल आणू शकत नाही, असे सांगणारा ए.के.एण्टनी नावाचा संरक्षण मंत्रीही या देशाने पाहीला आणि लष्कराला पायाभूत सुविधांपासून शस्त्रांपर्यंत काहीही कमी पडू देत नाही असा प्रधानसेवकही देश पाहतो आहे.

भारत माता की जय ….

Back to top button