News

मोबाईलचे महाघातक रेडिएशन रोखणार गायीच्या शेणापासून बनवलेल्या चिप

भारतराष्ट्र म्हणजेच धरणीमाता आणि गोमाता याचा अपूर्व संगम आहे.

ऐकून आपणास नवल वाटले असेल की, हे कस शक्य आहे ? हो पण हे खरंय कच्छ मधील संशोधक मनोज पुरुषोत्तमभाई सोळंकी यांनी चक्क यावर पेटंट मिळवले आहे. गायीच्या शेणावर आधारित रेडिएशन आणि एनर्जी मास्किंग चिप (COW DUNG BASED RADIATION AND ENERGY MASKING CHIP) या त्यांच्या शोध प्रबंधाला बौद्धिक संपदा ( Intellectual property India) ने पेटंट दिले आहे. या आधी देखील राष्ट्रीय कामधेनु आयोगाने गायीच्या शेणापासून बनवलेली चिप (Cow Dung Chip) लाँच केली आहे. यावरून हेच सिध्द होते की गाय सुदृढ असो की भाकड गाय ही पूजनीयच आहे.

साक्षात भगवान श्रीकृष्णाने जिची पूजा केली होती,ती कामधेनू अतिशय पवित्र आहे. खरं तर, कृष्ण म्हणजेच “गोविंदा” किंवा “गोपाला” म्हणजे “गाईचा मित्र आणि रक्षक’. नंदी, भगवान शिवाच्या मंदिरात आढळणारा पवित्र बैल, शिवाचे वाहन आहे.गायींचे हिंदूंसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. या देशात भगवंताचे नाव गोपाल होते.

आज देखील ग्रामीण भागात घर फक्त गायीच्याच शेणाने सारवण्याची पद्धत आहे.घरा मध्ये पाणी सांडल्यास मातीचे पापुद्रे निघु नये यासाठी घरे शेणाने सारवत असतं. अजून एक कारण म्हणजे फुफुटा, धूळ होऊ नये म्हणून घर व आंगण सारवल्या जात असे. गायीच्या शेणाने सारवल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते त्यामुळेच बहुदा घातक रेडिएशन रोखले जात असावे किंबहुना रोखले जातेच.रोज सकाळी शेणानी अंगणात सडा (शिंपला) जायचा नंतर रांगोळी, सूर्य नारायणाचे दर्शन होत असे. सणा-समारंभाला नित्यनेमाने सर्व घर सारवल्या जायचे. नविन पिढीतील(ज्यांनी कधी बघितली नाही अशा) मंडळींना शेणाने सारवलेल्या घरातच कसे जेवत असतील हा प्रश्न पडलाच असेल परंतु सांगायचे झाल्यास ती घरे खूप स्वच्छ असतं , मुळात त्या काळी शेणाने सारवलेलं घर म्हणजेच स्वछतेचं प्रतीक असायचं.

गायीला कामधेनू का म्हणतात ?

कामधेनू : काम म्हणजे इच्छा व धेनु म्हणजे गाय ,अर्थात इच्छा पूर्ण करणारी गाय.गोमुत्र आणि गोमय हे भाकड गोवंशापासून मिळणारे मुख्य पदार्थ होय. आयुर्वेदात गोमुत्राचा कर्करोग आणि रक्तपिती या आजारांवर प्रामुख्याने औषध म्हणून वापर होतो. तसेच पांडुरोग तथा अनेमिया, संधीरोग, क्षयरोग या आजारात देखील गोमुत्र इतर औषधांबरोबर घेतल्याने लाभ होतात.केरळ मधील इद्दुकी जिल्ह्यातील थोडूपुझा येथील आयुर्वेदिक इन्स्टिट्युट धन्वंतरी वैद्यशाला चे प्रमुख सतीश नाम्बुर्दी यांच्या अभ्यासानुसार गोमुत्र हे अल्सर, यकृत दोष आणि अस्थमा या आजारांवर देखील उपयुक्त आहे.

आज शेणापासून पुष्कळ प्रॉडक्ट तयार केले जातात जसे की,दिवे, मेणबत्त्या, अगरबत्ती, अगरबत्ती, शुभ लाभ, स्वस्तिक, हार्डबोर्ड, पेंट , कागद, हवन साहित्य, पेपर प्लेट्स गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती… etc

गाय आणि शेती

एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. “ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micro nutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे.

गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.” सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे.आधुनिक शिक्षण घेतलेल्या लिबरल मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गाईच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण मानवजातीचे पोट त्यातून भरते.

गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते. मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. आज भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १ लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची,भीक मागायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या रुपयाचं मूल्य वाढेल.

आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते.एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव मिळतो.अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते.अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंट आहेत.अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा दर लीटरला १२००, ते १३०० डॉलर आहे. याचा अर्थ एका गायीपासून प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. यावरून cow इकोनॉमिकस किती मोठे आणि विशाल आहे याची कल्पना आपल्याला येईल.

गायीची हत्या हा संवैधानिक अपराध आहे, धार्मिक पाप आहे. गोरक्षण, गोसंवर्धन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सरकारचे आहेच. पण नागरिकांचेही आहे.

भारतच्या अणुस्फोटानंतर जगाने भारतावर आर्थिक बंदी लादली. पण भारतावर त्याचा फारसा दुष्परिणाम झाला नाही.२००८ मध्ये आलेली जागतिक मंदी देखील भारताचे काही वाकडे करू शकली नाही.कारण आपली अर्थव्यवस्था ही शेती म्हणजेच गोवंशावर आधारित आहे.पाश्चिमात्य देशांनी,हितशत्रूंनी, धर्मांध शक्तींनी याचा विशेष अभ्यास केला व भारताची बलस्थाने हेरली व ती नष्ट करण्याचा विशेष कार्यक्रम मोठया बजेटसह आखला आहे.

  1. पारंपरिक शेती,
  2. कुटुंब व्यवस्था,
  3. भारतीय नीतिमूल्ये,

या तीन गोष्टी नष्ट केल्याशिवाय भारत कधीच पुरता संपणार नाही. गोधन संपवणे, भारतीय बियाणे संपवणे, तथाकथित विचारवंत, मीडिया मार्फत कुटुंब व्यवस्था नितिमूल्ये संपवणे हा योजनापूर्वक कार्यक्रम सुरु आहे. गाईंची कत्तल हां त्यातलाच एक भाग.हे फार मोठे षडयंत्र आहे.सर्वानी समजून घेतले तरच आपला निभाव लागेल.

Back to top button