News

बॉलीवुड के भूत बॉयकॉट से भी नहीं मानेंगे…

नुकताच बॉलीवूडचा एक नवीन चित्रपट “भेडिया” आला आहे. या चित्रपटात ठुमकेश्वरी म्हणून एक गाणं आहे. मॅडॉक फिल्मस् या चित्रपटाची निर्मिती कंपनी आहे. श्रद्धा कपूरने या गाण्यात एका नर्तकीचा अभिनय केलेला आहे. बॉलीवूडच्या रिवाजाप्रमाणे आयटेम सॉंगमध्ये असतात तशा या गाण्यात दोन्ही अभिनेत्री कमीत कमी कपड्यात कामुक हावभाव करत नाचताना दाखवल्या आहेत. या नाचातील पुरुष पात्र आणि कोरस या दोन नर्तकींना ठुमकेश्वरी म्हणून संबोधतात …

आणि हेच सगळ्या समस्येचे मूळ आहे.

या आयटेम सॉंगसाठी निवडण्यात आलेला ठुमकेश्वरी हा शब्द ठुमका आणि ईश्वरी या दोन शब्दांचा संयोग आहे. ईश्वरी हे ईश्वर या शब्दाचे स्त्रीलिंग असून एखाद्या देवीचा उल्लेख करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ भुवनेश्वरी, दक्षिणेश्वरी, परमेश्वरी, त्रिपुरेश्वरी, वागेश्वरी इत्यादी. लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आदी देवी मातांचा उल्लेख करताना ईश्वरी हा शब्द प्रकर्षाने वापरला जातो.

बॉलीवूडला मात्र आपल्या आयटेम सॉंगमधील तोकड्या कपड्यात कामुक नृत्य करणाऱ्या नर्तिका ईश्वरी स्वरूप दिसतात.

हिंदू समाजात आज बॉलीवूड बद्दल असलेली घृणा व चीड नेमकी याच कारणामुळे आहे.
सुरवातीपासून ते आजतागायत, हिंदू संस्कृतीला अपमानित व विकृत स्वरूपात दाखवण्याची एकही संधी बॉलीवूडने सोडलेली नाही.

बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपट सृष्टीच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट सृष्टीची सोज्वळता प्रकर्षाने उठून दिसते.

दादासाहेब फाळके यांनी निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता राजा हरिश्चंद्र. त्यानंतर अनेक धार्मिक व सामाजिक विषयांवरील उल्लेखनीय चित्रपट निर्माण झाले. प्रामुख्याने ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या भालजी पेंढारकर यांचा चित्रपट सृष्टीवरील ठसा आगळाच होता. व्ही शांताराम यांचे नाव चित्रपट निर्माते म्हणून अत्यंत आदराने घेतले जाते. दादा कोंडके यांनी आपल्या चित्रपटांमधून रसिकांचे केलेले निर्भेळ मनोरंजन अकल्पनीय आहे. मराठी चित्रपट सृष्टी अगदी आदर्श असेलच असे नाही परंतु ती हिंदू धर्माची, संस्कृतीची, रूढी परंपरांची, प्रतिकांची विटंबना करणारी नाही एवढे मात्र निश्चित. श्यामची आई ते श्वास अशी अनेक उदाहरणे आपल्याला सहज देता येतील.

या उलट बॉलीवूडच्या चित्रपटातील एखाद्या सुसंस्कृत हिंदू परिवारातील महिला देखील शक्यतो कुंकू न लावता दाखवायच्या तर एखाद्या बारक्या गल्लीतला टीनपाट गुंड अगदी घसघशीत उभा भगवा टिळा लावलेला दाखवायचा.

देवळाचा पुजारी हा लालची, लुटारू व बलात्कारी दाखवायचा तर मौलवी आणि फादर हे कनवाळू, परोपकारी व वेळप्रसंगी प्राण देऊन परधर्मीय अर्थात हिंदू स्त्रियांच्या शिलाचे रक्षण करणारे दाखवायचे.

बॉलीवूडच्या चित्रपटातील कोणत्याही भूमिकेतील दगाबाज हा न चुकता हिंदू असतो आणि त्या दगाबाजीचे दुष्परिणाम भोगणारा हा कायमच बिचारा अन्य धर्मीय असतो.

समाजातील विकृती दाखवताना हिंदू समाजाच्या श्रद्धा, रुढी, परंपरा, प्रतीके यांचे विकृतीकरण करायचे, त्यांची टिंगल टवाळी करायची; त्यातून आसुरी आनंद घेणारे जवळपास संपूर्ण बॉलीवूडच विकृत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

सुरुवातीला हे प्रकार हिंदू प्रेक्षकांच्या सहजासहजी लक्षात येत नसत परंतु असे नॅरेटीव्हस् समाजात रुजवायला बराच काळ हा जातोच. कालांतराने बॉलीवूडने रुजवलेले हे हिंदू संस्कृतीच्या तथाकथित हीनतेचे नॅरेटीव्हस् हिंदू समाजात नकळत रुजत गेले. हिंदू प्रेक्षकाला ते कळत नव्हतं असंही नाही परंतु कोणीच त्याबाबत बोलत नव्हते म्हणून हे विकृतीकरण तेजीत होते.

या विकृतीकरणाच्या काळात युसुफ खान आपले खरे नाव लपवून, दिलीप कुमार या टोपण नावाने सुपरहिरो बनला होता… त्या विकृतीकरणाचे नॅरेटीव्हस् हिंदू समाजात पुरेपूर रुजेपर्यंत आम्ही कधी लांब लचक रांगा लावून खानावळीची तिकिटे घ्यायला लागलो ते आम्हालाही कळले नाही.

आज पर्यंत आपली ही संस्कृतिक विटंबना हिंदू समाज पदरमोड करून असल्या विकृत चित्रपटांची तिकिटे खरेदी करून चुपचाप बघत होता आणि आतल्या आत कुढत होता.

वैयक्तिक जीवनात तर बॉलीवूडचे तारे आणि तारका दुतोंडीपणाचा कहर करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर हिंदू समाजाने भक्ती भावाने ओतलेले लोटाभर दूध यांच्या डोळ्यात खुपते मात्र आयुष्यभर हजारो लिटर दूध देणारी गोमाता बकरी ईदच्या दिवशी कापली जाते ते दिसत नाही.

रंगपंचमीला त्यांच्या मते पाण्याचा अपव्यय केला जातो. दिवाळीला फटाके फोडून प्रदूषण होते पण त्यांच्या मते बहुदा ख्रिसमसला व नववर्षाच्या स्वागताला फोडलेले फटाके ऑक्सिजन देत असावेत. नवरात्रीला गरब्याने ध्वनी प्रदूषण होते; मात्र लाऊड स्पीकर वरून दिली जाणारी पाच वेळेची अजान ही बहुदा त्यांच्या कानावर पडतच नाही.

बॉलीवूडचे अंतरंग भगव्याचा द्वेष करणारे आहे, बहुसंख्य प्रेक्षकांच्या संस्कृतीची टवाळी करणाऱ्या आहे. काहीही झाले तरी आपला हिंदू प्रेक्षक पदरमोड करून आपले चित्रपट बघायला येणारच हे बॉलीवूडच्या टवाळखोरांनी गृहीत धरले होते. आपल्याच पैशावर बॉलीवूड नावाच्या भस्मासुराला हिंदू प्रेक्षकांनी पोसले होते आणि हा भस्मासुर आता आमच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला होता.

करीना कपूरने तर प्रेक्षकांना चित्रपट बघायचा असेल तर त्यांनी बघावा, चित्रपट बघण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण द्यायला जात नाही सांगण्या इतका मुजोरपणा दाखवला होता.

बॉलीवूडने हिंदू प्रेक्षकांना गृहीत धरले आणि इथेच त्यांचा घात झाला.

गेल्या दशकभरापासून हिंदू समाजात आलेली जागृती आणि त्याला वणवा पेटवणारी सोशल मीडियाची मिळालेली जोड यामुळे अशा विकृत चित्रपटांवरील बहिष्काराची मोहीम जोर धरू लागली. #Boycott हा हॅशटॅग जनतेची चळवळ बनला.

बॉलीवूडला जबरदस्त दणका देण्याच्या एखाद्या संधीची वाट हिंदू प्रेक्षक बघतच होते आणि ती संधी आमिर खानने उपलब्ध करून दिली.

नर्मदा प्रकल्पाला विरोध करण्यापासून ते सत्यमेव जयते मध्ये हिंदू देवतांची टिंगल टवाळी करण्यापासून व आपल्या बायकोला (२०१४ नंतर अचानक) भारतात असुरक्षित वाटते सांगण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत आगाऊ चोंबडेपणा करणाऱ्या आमिर खानचा lलालसिंग चढ्ढा येऊ घातला होता.

सोशल मीडियावर बॉयकॉट लालसिंग चढ्ढा हा हॅशटॅग आमिर खानचा हा चित्रपट पार भुईसपाट करून गेला. गेली सात आठ दशकांचा, हिंदू प्रेक्षकांचा दबला गेलेला असंतोषाचा ज्वालामुखी यानिमित्ताने उफाळून बाहेर आला होता. शेवटी आमिर खानला निर्मिती क्षेत्रात ब्रेक घ्यावा लागला.

पण बॉलीवूडच्या कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच दिसतंय. किमान लालसिंग चढ्ढापासून धडा घेऊन बॉलीवूड सुधारेल अशी खोटी आशा आम्हाला होती. पण भेडियातील ठुमकेश्वरीने, बॉलीवूडच्या कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तर नळी वाकडी होईल पण शेपूट सरळ होणार नाही, हे दाखवून दिलं आहे.

चित्रपटातील अभिनयाचे करोडोमध्ये मानधन घेणारे हे तारे तारका आपल्या लोकप्रियतेमुळे अनेक उत्पादनांचे ब्रँड अँबेसिडर बनले. केशवर्धक तेलापासून शीतपेयांपर्यंत. बॉलीवूडच्या जोडीला जाहिरातींचा जोडधंदा या तारे तारकांना बेसुमार चरबी चढवणारा ठरला आहे.

बॉलीवूडच्या चित्रपटांवरील बॉयकॉटच्या ब्रह्मास्त्रानेही जर बॉलीवूड सुधारणार नसेल तर या चित्रपट तारे तारकांच्या जाहिरातीतील उत्पादनांवर सरसकट बहिष्कार घालण्याचा हॅशटॅग लवकरच हिंदू समाजाला हाती घ्यावा लागेल असे दिसते आहे.

Back to top button