News

व्याघ्र कपट हे पांघरलेले
वनीचे जंबुक पार करा…

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात, भारतीय लष्करात नोकरी मिळवण्यासाठी लष्कराची फसवणूक केल्याची प्रचंड धक्कादायक घटना समोर आली आहे. “मोईनुद्दीन” नावाच्या मुसलमान तरुणाने सैन्यात भरती होण्यासाठी स्वत:ला मृत घोषित करणारे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. इतकंच नाही तर आपल्या आधार कार्डावरील नाव बदलून मोहिन सिसोदिया असं करून तो सैन्यात भरती झाला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजमेरच्या बंदरसिंद्री पोलिस स्टेशन परिसरातील काकनियावास गावात राहणारा मोईनुद्दीनचा धाकटा भाऊ आसिफ २०१८ मध्ये सैन्यात दाखल झाला होता. मोईनुद्दीनलाही भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते. पण सैन्यात भरती होण्यासाठी त्याचे वय ओलांडले गेले होते. त्यामुळे त्याचे वडील मोहम्मद नूर यांनी सरपंचासोबत त्याचा मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी कट रचला. त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रानुसार आरोपी मोईनुद्दीनचा मृत्यू १८ ऑगस्ट २०१९ रोजी झाला.

यानंतर, मोइनुद्दीनने त्याच्या शेजारच्या नुलू गावातील बाल कृष्ण भारती शाळेत मोहिन सिसोदिया म्हणून ९ वीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्याला मोहिन सिसोदिया म्हणून दाखल करण्यात आले. इथे त्याची जन्मतारीख ६ नोव्हेंबर २००१ होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्याच शाळेतून तो १० वी आणि २०२१ मध्ये १२वी उत्तीर्ण झाला.

१०वीच्या गुणपत्रिकेच्या आधारे आधार कार्डावर मोइनुद्दीनचे नाव बदलून मोहिन सिसोदिया असे करण्यात आले. त्यानंतर आधार कार्डमध्ये नमूद केलेल्या तपशीलांच्या आधारे इतर कागदपत्रांमध्ये नाव बदलण्यात आले. जरी मोइनुद्दीनने त्याच्या आधार कार्डवर त्याचे नाव आणि जन्मतारीख बदलली असली तरी आधार क्रमांक अपरिवर्तित राहिला कारण मोइनुद्दीन त्याचा बायोमेट्रिक्स डेटा बनवू शकला नाही, जो आधार डेटाबेसमध्ये आधीच नोंदविला गेला होता.

या प्रकरणात मोईनुद्दीनच्या धाकट्या भावाची भूमिकाही संशयास्पद आहे. अजमेरमध्ये ११ जुलै ते २ ऑगस्ट २०२२ या कालावधीत सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. २४ मे ते २७ जून २०२२ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते. मोईनुद्दीनने बनावट कागदपत्रांचा वापर करून सैन्य भरतीसाठी अर्ज केला होता. २०१८ पासून, त्याचा धाकटा भाऊ आसिफ राजपुताना रायफल्सच्या बटालियन क्रमांक २४ मध्ये जयपूरला सेवेत आहे. मोईनुद्दीनचा धाकटा भाऊ आसिफ याने लष्कराच्या रिलेशनशिप कोट्यात आपला लहान भाऊ म्हणून मोईनुद्दीनची शिफारस केली. आसिफच्या शिफारशीनुसार मोईनुद्दीन भारतीय सैन्यात दाखल झाला आणि प्रशिक्षण घेत होता. मोईनुद्दीनची फसवणूक मात्र रुजू होण्यापूर्वीच उघड झाली होती.

सध्याच्या भरतीच्या नियमांनुसार, सेवारत सैन्यातील कर्मचारी रक्ताच्या भावाची शिफारस करू शकतात. युनिट हेडक्वार्टर कोटा (UHQ) भरती अंतर्गत इतर प्राधान्य श्रेणींमध्ये विधवा पुत्र (SOW), सेवा देणारे सैनिक (SOS), आणि माजी सैनिकांचे पुत्र (SOEX) यांचा समावेश आहे.

फसवणूक अशी उघडकीस आली…

मोईनुद्दीन प्रशिक्षण घेत असताना, साळी गावातील रहिवासी गफूर खान यांनी लष्कराला मोईनुद्दीनच्या फसवणुकीची माहिती पत्राद्वारे लष्कराला दिली. गफूर खानच्या माहितीच्या आधारे तपास केल्यावर मोईनुद्दीनने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. परिणामी, मोईनुद्दीनला बडतर्फ करण्यात आले आहे आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने अजमेर पोलिसांना दिलेल्या पत्राच्या आधारे त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

एकूण प्रकरण पाहता मोईनुद्दीन, त्याचा भाऊ आसिफ, वडील मोहम्मद नूर आणि गावचे सरपंच उघडपणे सामील आहेत. या षड्यंत्रात आणखी कोण कोण सामील आहेत ते योग्य दिशेने पोलीस तपास झाल्यास उजेडात येईल.

यानिमित्ताने आधार कार्ड व त्यावर आधारित बाकी सगळी बनावट कागदपत्रे किती बेमालुमपणे बनवता येतात हे उघड झाले. भविष्यात येणारी NRC योजना लागू करताना या बनावट कागदपत्रांची नीट छाननी करावी लागेल कारण मुळात आधार कार्ड बनावट कागदपत्रांवर बनवण्यात आले असेल तर त्याचीही पडताळणी करणे अनिवार्य ठरेल. तरच NRC प्रभावीपणे लागू होईल. या प्रकरणातील सरपंचासारखे धर्मप्रेमापोटी अथवा अगदी मामुली वैयक्तिक लाभासाठी विकले जाणारे किती लोकप्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी अशी खोटी कागदपत्रे बनवून देत असतील ते कठोरपणे शोधून काढावे लागेल. अन्यथा देशातील बांगलादेशी घुसखोर मुसलमान व रोहिंग्या यांना शोधून काढणे जिकरीचे ठरेल.

सर्वात मोठी चिंताजनक बाब म्हणजे या चांडाळ चौकडीने भारतीय लष्कराला फसवले आहे. हा अत्यंत गंभीर मामला आहे. असे अजून किती मोईनुद्दीन भारतीय लष्करात घुसले असतील ते तातडीने शोधून काढले पाहिजे. हे एखादे देशव्यापी संघटित षडयंत्र अर्थात लष्कर भरती जिहाद तर चालू नाही आहे ना याचा गांभीर्याने शोध घेतला पाहिजे अन्यथा हा राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका ठरेल.

अर्थात हे षड्यंत्र उघडकीला आणणारे गफुर खान नावाचे सद्गृहस्थ आहेत. श्रीमान गफूर खान यांचे देशप्रेम उफाळून आले की वैयक्तिक दुष्मनीचा हिशोब चुकते करण्याच्या उद्देशाने केलेला हा गौप्यस्फोट होता हे मात्र कळायला मार्ग नाही. काहीही असो, आपण समजतो तसा मुसलमान समाज एकसंध नाही. याचा पूर्ण फायदा आपल्या गुप्तचर यंत्रणा आणि सरकारने उचलला पाहिजे. शेवटी काट्यानेच काटा काढावा लागतो.

आज जगाची लोकसंख्या सुमारे ७०० कोटी आहे. मात्र कोणत्याही दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे सारखे नाहीत. एवढेच नव्हे तर यापूर्वी जन्माला आलेल्या व यापुढे जन्माला येणाऱ्या कोणत्याही दोन व्यक्तींचे बोटांचे ठसे सारखे नसतील. सर्व शक्तिमान श्री परमेश्वराच्या या अलौकिक देणगीमुळे आणि जोडीला बायोमेट्रिक तंत्रज्ञानामुळे हे षडयंत्र उघडकीला आले. याबद्दल त्या सर्व शक्तिमान श्री परमेश्वराचे व आधुनिक विज्ञानाचे आभारच मानले पाहिजेत.

Back to top button