GamesIslamNews

झाकीर नाईक.. कतार आणि मुस्लिम धर्मप्रसार…

कतारमध्ये(qatar) खेळला जाणारा ‘फिफा विश्वचषक’ वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. मनी लाँण्ड्रिंग, भडकाऊ भाषण आणि दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक(Zakir Naik) कतारमध्ये ‘फिफा विश्वचषका’च्या उद्घाटन सोहळ्याला पोहोचल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय. कतारच्या दोहा येथे होणार्‍या ‘फिफा विश्वचषका’साठी फरार झाकीर नाईकला निमंत्रण दिल्यामुळे कतारवर चहुबाजूंनी टीका झाली. भारतानेही आक्रमक भूमिका घेत आपली नाराजी व्यक्त केली. परंतु, विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी झाकीरला कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण कतारने दिल्याचे कळते. परंतु, झाकीरला ‘फिफा’ विश्वचषकादरम्यान प्रवचन देण्यासाठी कतारने अधिकृतपणे आमंत्रित केल्याचे बोलले जात आहे.

झाकीर दोहामध्येही दिसला असल्याच्या माहितीने भारत आणि कतारमध्ये राजकीय तणाव सुरू झाल्यानंतर कतारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच कतारच्या अधिकृत ‘स्पोर्ट्स चॅनल अलकास’चे टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता अल्हाजरी यांनी झाकीर नाईक विश्वचषकादरम्यान कतारमध्ये आहे आणि संपूर्ण विश्वचषकात अनेक धार्मिक व्याख्याने देणार आहे, असे ट्विट केले आणि वादाला तोंड फुटले. या सगळ्या सुंदोपसुंदीत झाकीर पुन्हा एकदा चर्चेत आला.

कोण आहे हा हिंदूद्वेष्टा झाकीर नाईक:-

झाकीर सध्या मलेशियामध्ये राहत असून १९९०च्या दशकापासून तो आपल्या धार्मिक शिकवणींमुळे भारतात प्रसिद्धीच्या झोतात आला. २०००च्या दशकाच्या सुरुवातीला त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले होते, ज्यामध्ये त्याने अनेक आक्षेपार्ह भाषणे दिली होती. त्याच्या अनुयायांना इतर धर्मांविरोधात भडकवल्याचा आरोपही त्याच्यावर झाला. यानंतर २०१६ मध्ये भारताने त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर (आयआरएफ) बंदी घातल्यानंतर तो २०१६ मध्ये भारत सोडून मलेशियामध्ये राहत आहे. २०२० पासून मलेशियात भाषण करण्यासही बंदी आहे. भारत सातत्याने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करतोय. त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ला २०२१ साली गृहमंत्रालयाने बेकायदेशीर घोषित केले. धर्मांतरण आणि दहशतवादाला प्रोत्साहन तो त्याच्या भाषणातून देत असल्याने भारतासाठी तो ‘मोस्ट वाँटेड’ आरोपी आहे. त्यामुळे भारताने या फरार झाकीरला भारतात आणून त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील प्रतिष्ठित संस्थेच्या मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, कतारने झाकीर नाईकला दावा संबंधित इस्लामिक धार्मिक व्याख्यानासाठी आमंत्रित केले आहे. दावा ही एक इस्लामिक प्रथा आहे ज्यामध्ये गैर-मुस्लिम धर्मांतरित होतात आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले जाते. संघटनेने म्हटले आहे की, फिफा मिविश्वचषकादरम्यान मिशन दावा हे कतारचे अघोषित लक्ष्य असल्याचे दिसते. लाखो चाहते फुटबॉल पाहण्यासाठी कतारला येत आहेत. मिशन दावासाठी कतार ही संधी म्हणून वापरत आहे.झाकीर नाईकवर यापूर्वीच कॅनडा आणि ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याआधी २०१९ मध्ये कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी झाकीर नाईकचे दोहामध्ये जंगी स्वागत केले होते. कतारच्या सरकारी स्पोर्ट्स न्यूज चॅनेलचे अँकर फैसल अलहजरी यांनी ट्विट केले की, उपदेशक शेख झाकीर नाईक विश्वचषकादरम्यान कतारमध्ये आले आहेत. संपूर्ण स्पर्धेत अनेक धार्मिक व्याख्याने देतील. झाकीर नाईकचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये नाईक कतारच्या शेखांसोबत डिनर करताना दिसत आहेत. झाकीर नाईकचे कतारमधील आगमन अनेकांसाठी धक्कादायक आहे तर काहींच्या मते ही सर्व स्क्रिप्ट आधीच लिहण्यात आली होती. कतारचे राजघराणे आणि अल थानी हे गेल्या अनेक दशकांपासून कट्टरपंथी मुस्लिम, जिहादी कमांडर आणि तालिबानी दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी ओळखले जातात.

अमेरिकेवर ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या खालिद शेख मोहम्मदला कतारनेच आश्रय दिला होता. बिगर मुस्लिमांना इस्लाम धर्मात आणण्यात मोठी भूमिका बजावल्याबद्दल झाकीर नाईकचे नाव कतारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे.कतारने फिफा वर्ल्ड कपमध्ये मिशन दावासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्याची योजना आखली आहे. जगभरातील फुटबॉल चाहत्यांपर्यंत इस्लामचा संदेश पोहोचवण्यासाठी कतारी अधिकारी आणि सरकारी अनुदानीत संस्थांनी किमान २ हजार कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय हजारो पुस्तके, पोस्टर्स, पॅम्प्लेटचे वाटप करण्यात येत आहे.

या फूटबॉल वर्ल्ड कपसाठी ६ हजार कामगारांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या परिवाराला मदत देखील कतार ने केली नाही,आणि आता चुकीच्या पद्धतीने धर्मप्रसार चालवला आहे. कतार ने आपल्या मर्यादेत रहावे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये उगाच नाक खुपसू नये.अन्यथा त्याचे भीषण परिणाम भोगण्यास तयार रहावे,हा समर्थ भारत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित..

https://www.outlookindia.com/sports/fifa-world-cup-2022-tainted-by-blood-and-tears-of-workers-families-news-237942

Back to top button