News

शेवटी ‘तबरेज’.. तरबेज मुंबई पोलिसांच्या तावडीत

१८ वर्षे लपून राहिला तबरेज पण मुंबई पोलीस शोधण्यात तरबेज.

१९९३ च्या मुंबईत उसळलेल्या(mumbai riots) जातीय दंगलींच्या नुसत्या आठवणींनी देखील आपल्या अंगावर आजही काटा उभा राहतो.

अंदाजे ९०० बळी घेणारी आणि ३,००० जणांना घायाळ करणाऱ्या त्या दंगलीने मुंबईकरांच्या आत्म्यावर कायमचा ओरखडा उमटवला आहे.या दंगलीतील एका प्रकरणात ९ आरोपींवर खटला दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपी क्रमांक ८, तबरेज अजीम खान; (tabrez) २००४ साली न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यापासून गेली १८ वर्षे फरार होता. न्यायालयाने त्याला “वॉन्टेड” म्हणून घोषित केले होते.

आज त्याला मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी गोरेगाव बस स्थानकाजवळ सापळा रचून शिताफीने अटक केली. खबरीकडून त्याच्या वास्तव्याची खबर मिळाल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी अनेक दिवस त्याच्यावर पाळत ठेवली ठेवली होती. शेवटी आज दिंडोशी पोलिसांनी तबरेजवर (tabrez) झडप घातली आणि त्याला जेरबंद केला. विशेष म्हणजे, गेला काही काळ तबरेज इस्टेट एजंट म्हणून काम करत होता.

मुंबई पोलीस हे स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हुशार पोलीस म्हणून ओळखले जातात, त्या मुंबई पोलिसांना १८ वर्षे गुंगारा देणे हे एकट्या तबरेजचे कसब असूच शकत नाही.

१८ वर्षात त्याने विविध नावांनी, अनेक ठिकाणी वास्तव्य केले असणार हे उघड आहे. मात्र तो पकडला गेलाय मुंबईत. गेली काही वर्षे तो इस्टेट एजंटचे काम करतोय. याचा अर्थ तो त्याच परिसरात रहात असला पाहिजे तसेच त्याचे बँकेतही खाते असले पाहिजे. राहण्यासाठी मालकीचे किंवा भाड्याचे घर आणि बँकेत खाते; हे आधार कार्ड व पॅन कार्ड शिवाय मिळूच शकत नाही. तबरेजकडे ही दोन्ही ओळखपत्रे असलीच पाहिजेत. अर्थात ती त्याने वेगळ्या नावाने घेतली असणार हे उघड आहे. मग त्याला त्या ओळखपत्रांसाठी लागणारी खोटे कागदपत्रे कोणी बनवून दिली?

इस्टेट एजंट म्हणजे मोबाईल फोन अत्यावश्यक. मोबाईल फोन हा दुसऱ्याच्या नावाने सिमकार्ड घेऊन वापरता येतो असे गृहीत धरले तरी त्याला मोबाईलचे सिम कार्ड कोणी मिळवून दिले? की याच खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्याने ते सिमकार्ड घेतले?

आपली मूळ ओळख लपवण्यासाठी तबरेजने चेहऱ्याची एखादी प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती का? याचीही कसून चौकशी झाली पाहिजे. जर अशी प्लास्टिक सर्जरी त्याने करून घेतली असेल तर त्या सर्जनचा आणि इस्पितळाचा देखील सखोल तपास होणे आवश्यक आहे.

या १८ वर्षांच्या काळात छुपेपणाने का होईना पण तबरेज आपले कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि घनिष्ठ मित्र यांच्या नक्कीच संपर्कात असला पाहिजे. यातील किमान काही जणांना तरी या काळातील तरबेजचा ठावठिकाणा माहीत असला पाहिजे. तेही तबरेज एवढेच देशद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आहेत

गेली १८ वर्षे तबरेज कुठे होता? त्याला कोणी आसरा दिला? किमान तो फरार झाल्यानंतर खोटी कागदपत्रे बनवून ओळखपत्र घेईपर्यंत तरी त्याला ओळखीच्यांनीच आसरा दिला असणार. ज्या मुंबईत त्याने दंगली घडवून आणल्या( mumbai riots)त्याच मुंबईत राजरोसपणे व्यवसाय करण्यासाठी नुसते धाडस पुरेसे नाही, तबरेजला त्याची मूळ ओळख लपविण्यासाठी पुरेसे संरक्षण देखील लाभलेले असले पाहिजे. या व्यवसायात शिरकाव करून घ्यायला तसेच त्याचे बस्तान बसेपर्यंत, त्याला कोणी सहाय्य केले? एजंट म्हणजे विशाल जनसंपर्काचे काम असते. यात कोणी ना कोणी त्याला ओळखण्याचा धोका होताच.
तर मग हे धाडस त्याला झालेच कसे? अर्थात तबरेजला पाठीशी घालणारी एक अज्ञात विघातक शक्ती (ecosystem)या देशात कार्यरत असलीच पाहिजे.

https://www.abplive.com/videos/states/kanpur-police-arrested-4-bangladeshi-nationals-with-fake-passports-2279759

देशद्रोह्यांना पाठीशी घालणारी एक व्यापक विघातक शक्ती म्हणजेच देशद्रोह्यांची इको सिस्टीम (eco system) या देशात काम करते आहे, हे तबरेज प्रकरणातून उघड झाले आहे. ही इकोसिस्टीम देशात घुसखोरी केलेल्या कोट्यावधी बांगलादेशी मुसलमानांना व रोहिंग्यांनादेखील आश्रय देत असावी हे उघड आहे. प्रत्येक घुसखोराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र ही कागदपत्रे असतातच किंबहुना ही सगळी कागदपत्रे त्यांना घुसखोरी करण्यापूर्वीच पुरवली जात असावीत, अशीही शंका घ्यायला वाव आहे.

दोन दिवसापूर्वीच कानपूरला उत्तर प्रदेश पोलिसांनी ४ बांगलादेशीयांना अटक केली आहे. त्यांच्याकडे बाकी ओळखपत्रांबरोबर भारताचे पासपोर्ट देखील आढळले आहेत. या बांगलादेशयांना पासपोर्टसाठी शिफारस पत्रे समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोळंकी व नगरसेवक मन्नू रहमान यांनी दिली आहेत, असा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा आहे. या पासपोर्टवर त्यांनी बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया व नेपाळची परदेशवारी केल्याचे धक्कादायक सत्य उघड झाले आहे. यावरून या इको सिस्टीमच्या भयंकर दाहकतेची कल्पना यावी.

तबरेजदेखील या १८ वर्षात असाच बांगलादेश, पाकिस्तान किंवा नेपाळ अशी परदेश वारी करून आला आहे का? खोट्या पासपोर्टवर किंवा अनधिकृत रित्या सरहद्द ओलांडून. या चौकशीत एक व्यापक देशांतर्गत व सीमापार देखील देशद्रोही इको सिस्टीम पोलिसांच्या हाती लागू शकते.

तबरेज प्रकरणात देखील या इको सिस्टीममध्ये वजनदार राजकीय मंडळींचा सहभाग असू शकतो. आता हे प्रकरण पोलिसांकडून गुप्तचर विभागा (crime branch) कडे हस्तांतरित झाल्यामुळे, मुंबईचा गुप्तचर विभाग या इको सिस्टीमची पाळेमुळे खणून काढेल अशी खात्री आहे.

या १८ वर्षांच्या प्रत्येक दिवसाचा हिशोब तरबेजकडून घेतला गेला पाहिजे. जेणेकरून हे देशद्रोही षड्यंत्राचे सबंध जाळे उद्ध्वस्त करता येईल.

मुंबई पोलिसांच्या कस्टडीत, पोलिसी खाक्या दाखवल्यावर भले भले सराईत गुंड देखील पोपटासारखे बोलू लागतात. तो फिर तबरेज किस खेत की मूली है।

मात्र तबरेजच्या निमित्ताने, या इकोसिस्टीमच्या देशव्यापी षडयंत्राची पाळेमुळे खणून काढण्यासाठी देशपातळीवर एक व्यापक अभियान राबविणे आवश्यक आहे.

Back to top button