NewsWorld

“कशी नशिबानं थट्टा आज मांडली”…

आर्थिक संकट रोखण्यासाठी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची लांच्छनास्पद नवी मजबूरी…

“कशी नशिबानं थट्टा आज मांडली” शीर्षक वाचून तुम्हाला देखील पिंजरा चित्रपटातील याच ओळी आठवल्या असतील. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने वॉशिंग्टनमधील आपला एक दूतावास विक्रीसाठी काढला आहे. सदर मालमत्ता वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित व उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या R STREET NW वर स्थित आहे.

मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकार हात-पाय मारताना दिसतेय. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून (IMF) आर्थिक मदत (भीक) मिळवणे हा एक पर्याय असू शकतो परंतु इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने आपल्या आर्थिक संकटावर मत करण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधला आहे आणि तो म्हणजे आपल्या दूतावास (embassy) विकणे. ही यांची अक्कल आणि हतबलता…

का विकावा लागला दूतावास ?

या प्रश्नाचे उत्तर म्हणजे दूतावासातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला देखील पैसे नसणे आणि ही परिस्थिती इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या जगातल्या जवळपास सगळ्याच दूतावासात आहे. काही दूतावासातील अधिकाऱ्यांनी ही माहिती स्वतः ट्विट करून यापूर्वी दिली आहे.

अमेरिकेतील दूतावासाप्रमाणेच आणखी इतर देशांमधील दूतावास देखील नजीकच्या भविष्यकाळात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला विकावे लागणार आहेत हे निश्चित.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातील आर्थिक संकट:-

सोप्या भाषेत सांगायचे तर, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानकडचा पैसा संपला आहे. श्रीलंकेप्रमाणं इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची अर्थव्यवस्था देखील डबघाईला आली आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आता अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी संपूर्णपणे मित्र राष्ट्रांच्या मदतीवर अवलंबून आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान एका बाजूनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या मदतीवर (इस्लाम-की-खैरात) अवलंबून आहे.

श्रीलंकेतील सरकार पडण्यापूर्वी तिथे जशी परिस्थिती होती, जसे की, अन्न, इंधन आणि औषधांची टंचाई, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, विदेशी कर्जावरील व्याज भरण्यात अपयश आणि वाढती महागाई वगैरे तशीच परिस्थिती आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली दिसते. परंतु सध्याच्या घडीला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला त्याच्या परकीय मित्रांकडून होणारा कर्जपुरवठा आणि कर्जदारांकडून मिळालेल्या आपात्कालीन भीकेमुळे हा देश कसाबसा तग धरून आहे.

अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने नुकत्याच केलेल्या व्याजदर वाढीमुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड तणाव आहे.पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन नीचांकी पातळीवर (२३०) पोहोचला आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,चालू आर्थिक वर्षात देशाच्या एकूण कर्जमध्ये १४.८५ ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांची वाढ झाली आहे. देशावरील एकूण कर्ज आणि ५९.६९६ ट्रिलियन पाकिस्तानी रुपये इतकी आहेत, जी आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ४७.८४४ ट्रिलियन पाकिस्तानी रुपये इतकी होती.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर संपूर्णपणे अपयशी ठरला आहे.या कॉरिडॉरमुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची भरभराट तर सोडाच उलटे आणखी कर्ज वाढले आहे.हा एकप्रकारे धोक्याचा इशारा आहे.

आतंकवादाची फॅक्टरी:-

भारताशी असलेल्या वैरामुळे आणि हिंदू द्वेषापोटी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान कोट्यवधी रुपये दरवर्षी आतंकवादावर खर्च करतो, यामुळेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आतंकवादाची फॅक्टरी होऊन बसला आहे. जगात कुठेही आतंकवादी हल्ला झाला तरी त्याच्या तारा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान पर्यंत येऊन जुळतात. आतंकवादाला पोसणे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसाठी ओढवून घेतलेले आर्थिक संकट ठरत आहे.

मोठ्याप्रमाणावर असलेला भ्रष्टाचार:-

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे सरकार आणि लष्करी अधिकारी यांनी संगनमताने पराकोटीचा भ्रष्टाचार माजवला आहे, माजी पंतप्रधान इम्रान खान, नवाज शरीफ, लष्करी हुकुमशहा मुशर्रफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहे. नुकतेच रिटायर्ड झालेले लष्कर प्रमुख बाजवा याची लंडन मधील संपत्ती डोळे दिपवणारी आहे.ज्या देशातील राष्ट्रपतीला मिस्टर १०% असे विशेषण जोडले जाते, तिथे भ्रष्टाचारावर काय बोलावे? पाकिस्तानच्या जवळपास प्रत्येक राज्यकर्त्याची आणि लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची युरोप आणि अमेरिकेत बेसुमार स्थावर जंगम मालमत्ता आहे. मात्र एकजात सगळ्यांचे लाडके ठिकाण “लंडन” (London). विशेष म्हणजे ही बेहिशोबी लूटमार इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या स्थापने पासून आजतागायत अव्याहत सुरू आहे.

तालिबानशी वैर :-

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने आपल्या वर्तवणुकीमुळे आज शेजारील अफगाणिस्तानातील राज्यकर्त्या तालिबानला देखिल डुरांट लाईन वरून आपले शत्रू करून ठेवले आहे. तालिबान आणि पाक सैन्यामध्ये दररोज चकमकी होतायत. तालिबानला देखील कळून चुकले आहे की एकीकडे इस्लामी भाऊ म्हणायचं आणि दुसरीकडे अमेरिकेसोबत मिळून तालिबानचा खात्मा करायचा असा दुहेरी उद्योग पाक लष्कराने सुरु केला होता. तालिबान सोबतच्या वैरामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला त्याच्या पश्चिम सरहद्दीवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागतो आहे. हे आर्थिक दृष्ट्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे कंबरडे मोडणारे ठरत आहे.

एकीकडे आतंकवादाची जागतिक फॅक्टरी म्हणून झालेल्या ओळखीमुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीचे कोसळलेले आसमानी सुलतानी संकट. ह्यावर्षी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास एक तृतीयांश पाकिस्तान पाण्याखाली गेला होता. शेतीचे अपरिमित नुकसान, हजारो जनावरे आणि घरे दारे वाहून जाणे, महामारी, मलेरिया, डेंग्यू आणि… कोरोना यामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धामुळे तेल आणि गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे जगात आणि पर्यायाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अंदाजे सहा महिन्याच्या अवधीत साखरेचे दर जवळपास अडीच पट वाढले आहेत यावरून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधल्या महागाईचा अंदाज यावा. सर्वसामान्य जनतेचे जगणे दुष्कर झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचे भांडवल करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी राज्यकर्ते जगभरात मदतीची भीक मागत हिंडत आहेत आणि मिळेल त्या तुकड्यावर आला दिवस ढकलत आहेत…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा समावेश आता जिबूती, श्रीलंका,आफ्रिका,सोमालिया,बुरुंडी,नायजेरिया या गरीब देशांच्या यादीत झाला आहे.आज ना उद्या, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान चीनची अंकित वसाहत होणार आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान पुन्हा एकदा गुलामीत जाणार हे निश्चित…

वॉशिंग्टनला विकायला काढलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या दुतावासाला भारत सर्वाधिक बोली लावून आपल्या पदरात पाडून घेतोय, हे दृश्य बघायला भारताची जनता आतुर झाली आहे…

https://zeenews.india.com/world/pakistans-unique-strategy-to-curb-economic-crisis-sell-embassy-property-in-america-2549111.html

Back to top button