News

मुस्लिम विधवेशी विवाह करण्याची काफीराला सजा… दलित वाल्मिकी तरुणाची जबरदस्तीने सुंता

पुण्याच्या दौंड पोलिस हद्दीमध्ये १६ डिसेंबर २०२२ रोजी एक तक्रार नोंदविण्यात आली आहे. यामध्ये पिडीत असलेल्या वाल्मिकी समाजाच्या तरुणाने आपली जबरदस्तीने सुंता करण्यात आल्याचे म्हंटले आहे. आपल्या तक्रारीत या पीडित दलित तरुणाने नोंदवले आहे की , आसिफ शेख आणि कुमेल कुरैशी उर्फ हाजी साब यांनी एका डॉक्टरच्या साथीने आपली जबरदस्तीने सुंता केली.
याची पार्श्वभूमी सांगताना दलित वाल्मिकी तरुण म्हणाला की , मुळचा तो माढा , सोलापूर येथील रहिवासी आहे . त्याने २०१८ साली दोन मुलींची आई असलेल्या एका मुस्लिम विधवेशी विवाह केला, त्यांचा संसार सुरळीत चालू होता .२०२० साली कामात शोधात दौंड, पुणे येथे हे कुटुंब आले. त्यांनी येथील कुंभारगल्लीत भाड्याने घर घेतले .रोजंदारी करत दीड वर्ष त्यांचा संसार व्यवस्थित सुरू होता.

https://www.lokmat.com/aurangabad/convert-religion-for-marriage-interfaith-lover-is-brutally-tortured-by-his-girlfriend-a320/

ते राहत असणाऱ्या कुंभारगल्लीतील आसिफ शेखने या दलित वाल्मिकी तरुणाच्या मुस्लिम पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली . वाईट नजरेने तिच्याकडे पाहत होता , तसेच हिंदूशी लग्न केल्याबद्दल तिला हिणवत होता. त्यामुळे चिडून या दलित वाल्मिकी तरुणाने आसिफला याचा जाब विचारला. आसिफ ने हिंदू काफिर म्हणून त्याला शिवी दिली आणि मुस्लिम हो नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. मुस्लिम हो किंवा पत्नीला सोडून दे असा पर्याय दिला.

आसिफ शेख ने कुमेल कुरैशी जो हाजी साब म्हणून परिचित आहे , त्याला आता आपल्या सोबतीला घेतले आणि दोघे मिळून त्याच्या मुस्लिम पत्नीला त्रास देऊ लागले . हिंदू तरुणाशी लग्न केल्याबद्दल ते तिला कोसत होते ,तेही त्यांच्याच घरात घुसून. कुमेल कुरैशी म्हणजेच हाजी साब याचे दौंडच्या कब्रस्तान मध्ये कार्यालय आहे. तेथे बोलवून त्याने पिडित दलित तरुणाच्या मुस्लिम पत्नी व तिच्या दोन मुलींना तीन तास बेदम मारहाण केली .लग्न तोडण्याचा बोलीवर सोडले, त्या प्रचंड भयभीत झाल्या होत्या.

ऑप इंडिया ने दावा केला आहे की , त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिप आहे . त्यामध्ये पिडीत हिंदू तरुणाच्या मुस्लिम पत्नीने, आपल्याला कसे धमकावले व त्याला मुस्लिम कर नाहीतर सोडून दे तसेच तुझे मुस्लिम तरुणाशी लग्न लावून देतो, असे धमकावले होते. परंतु तिने मी त्याला धर्मांतर करण्यास सांगणार नाही .हवं तर मी हिंदू होईन , असे क्लिप मध्ये सांगितले आहे.

आसिफ शेख आणि हाजी साब हे १४ अॉक्टोबर २०२२ रोजी एका मुस्लिम डॉक्टरला घेऊन , पिडीत दलित तरुणाच्या घरात घुसले व त्याच्या पत्नी व मुलींना घराबाहेर काढले. आसिफ शेख ने तरुणाचे हात पकडले व हाजी साब याने पॅन्ट काढली. मुस्लिम डॉक्टरने धारदार शस्त्राने सुंता केली , त्यावेळी हाजी साब काहीतरी इस्लामी वाक्य पुटपुटत होता . या सर्व प्रकारच्या वेळी पिडीत दलित तरुण त्यांच्याकडे विनवण्या करीत होता. पण त्या नराधमांनी त्याचे काही चालू दिले नाही , ते म्हणत राहिले देखते है तु इस्लाम कैसे नही कबुलेगा.

आपली तक्रार नोंदवताना दलित वाल्मिकी तरुणाने नमूद केले आहे की, त्याचे आधार कार्ड व रेशन कार्डही त्यांनी काढून घेतले , तसेच सुंता करतानाची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे भयभीत झालेले हे कुटुंब , पुन्हा आपल्या गावी माढा सोलापूर येथे निघून गेले . नंतर त्यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची दौंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.पोलिसांनी कुमेल कुरैशी उर्फ हाजी साब व आसिफ शेख यांच्यासहित आणखी एकावर भारतीय दंड संहितेच्या( IPC) कलम २९५-अ , २९८, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ५४ बरोबरच दलित अत्याचार कायद्यांतर्गत ( SC/ST act) तक्रार दाखल केली आहे. अधिक पोलीस तपास चालू आहे.

या नुकत्याच झालेल्या घटनेनुसार असे लक्षात येते की , काही महिन्यापूर्वी औरंगाबाद येथेही दीपक सोनवणे या इंजिनिअर असलेल्या दलित तरुणावर अशाच प्रकारे त्याच्या मुस्लिम प्रेयसी व तिच्या कुटुंबीयांनी अत्याचार केलेले आहेत . अहमदनगर येथील एका घटनेतही एका भिल्ल तरुणावर अशाच प्रकारे अत्याचार करण्यात आले. या उघडकीस आलेल्या काही मोजक्या घटना आहेत . परंतु अशा अनेक दबलेल्या घटना समाजात असू शकतील . एकूणच या सगळ्याचा विचार केला तर लव्ह जिहाद हे फक्त हिंदू मुलींचं होत असं नाही, तर हिंदू तरुणांच्या बाबतीतही हे होताना आढळत आहे.
त्यामुळेच लव्ह जिहाद कायद्याची अधिक कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे व हिंदू मुलीच नाही तर हिंदू पुरुषांच्या बाबतीतही या कायद्यात तरतूद केली पाहिजे. अशा अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा कायद्याने देण्यात यावी.

हिंदी चिनी भाई भाई सारखीच जय भीम जय मीम ही अत्यंत फसवी घोषणा आहे. त्यांच्यासाठी मुस्लिमेतर सर्वच काफीर आहेत . हिंदू दलित, वनवासी , बौद्ध , जैन , शीख सर्वच त्यांच्यासाठी काफीर आहेत , कारण ते सर्व त्यांच्या लेखी हिंदूच आहेत. जय भीम जय मीम म्हणजे मेंढीचे कातडे पांघरुन लबाड लांडगाच लचके तोडण्यासाठी संधीची वाट पहात आहे.

या धर्मांध मुस्लिमांमुळे पिडीत हिंदू तरुण व तरुणींच्या मागे संपूर्ण हिंदू समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

Back to top button