BusinessECONOMYNews

…राज करेगा ‘रुपैय्या’

शीर्षक वाचून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरंय..

जवळपास ३५ देशांनी भारतासमवेत असलेला आपला द्विपक्षीय व्यापार रुपयामध्ये करण्यावर सहमती दर्शवली आहे.

डॉलरचे नखरे आपल्याला माहीतच आहे.डॉलरची (dollar) वाढ म्हणजे रुपयाची घसरण आणि रुपयाची घसरण आपल्याला आजच्या घडीला परवडू शकत नाही. आणखी घसरण झाल्यामुळे, नुसत्या डॉलरच्या चढा-ओढीमुळे आपल प्रचंड नुकसान होतं. डॉलरच्या चढ्या भावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील आयात आपल्याला महाग होऊन बसते. आजच्या घडीला एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारातील आपली आयात ७६% टक्के व निर्यात २४% आहे. रुपयाची घसरण झाल्यास त्याचा प्रचंड फटका आपल्याला बसेल. शिवाय प्रत्येक देशात डॉलर सर्वमान्य असल्यामुळे डॉलरची मागणी किंवा किंमत कायमच वाढलेली असते.

रशिया- युक्रेन (russia-ukraine) युद्धामुळे डॉलरचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापार करणे कठीण होऊन बसले आहे. डॉलर महाग झाल्याने पहिला झटका कच्च्या तेलाला बसतो. आपण कच्चे तेल खूप मोठ्या प्रमाणावर आयात करत असल्याने आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागते आणि त्याचा दुसरा परिणाम म्हणजे देशात महागाई वाढण्यास सुरुवात होते. म्हणूनच रुपयामध्ये मध्ये व्यवहार करावा असा भारताचा कायमच आग्रह राहिला आहे; त्याला आता जग प्रतिसाद देताना दिसतंय.

येणाऱ्या काळात डॉलरचे महत्व आपोआप कमी होऊन रुपया, युवान, युरो, पाउंड यासारखी चलने (currency) आपले महत्त्व वाढवणार आहेत.

रुपी ट्रेड सेटलमेंट मेकॅनिझम म्हणजे काय ?

आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी ‘नोस्ट्रो’ ( Nostro )आणि ‘वोस्ट्रो’ ( Vostro ) अशी अकाऊंट वापरली जातात. यात एक ऑथोराइज्ड डिलर बँक असते आणि या बँकेमध्ये ‘नोस्ट्रो’ आणि ‘वोस्ट्रो’ अकाऊंट परदेशी बँकांकडून काढले जातात.जेव्हा परदेशी बँक ऑथोराइज्ड डिलर बँकेत परदेशी चलनात व्यवहार करण्यासाठी अकाऊंट उघडते, त्याला ‘नोस्ट्रो अकाऊंट’ म्हणतात. जेव्हा परदेशी बँक ऑथोराइज्ड डिलर बँकेत स्वदेशी चलनात व्यवहार करण्यासाठी अकाऊंट उघडते, त्याला ‘वोस्ट्रो अकाऊंट’ म्हणतात.
 
उदा. समजा भारताची ऑथोराइज्ड डिलर बँक ‘एसबीआय’ आहे, असे मानले आणि भारतात ‘एसबीआय’मध्ये एखाद्या इराणच्या बँकेने परदेशी चलनात म्हणजे डॉलर, युरोमध्ये व्यवहार कारणासाठी अकाऊंट उघडले, तर त्याला ‘नोस्ट्रो अकाऊंट’ म्हणतात. पण, जेव्हा हिच इराणची बँक भारतातील ‘एसबीआय’मध्येे फक्त रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी अकाऊंट उघडते, तेव्हा त्याला ‘वोस्ट्रो अकाऊंट’ म्हणतात. म्हणजेच आयात- निर्यातीचे व्यवहार पूर्णपणे रुपयामध्ये करण्यावर भारत सरकारने भर दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आणि केंद्र सरकारने रुपयाला केंद्रस्थानी ठेवून घेतलेला हा निर्णय नक्कीच प्रशंसनीय आहे.

रिझर्व बँकेने रुपी ट्रेड सेटलमेंट मेकॅनिझम ( Rupee Trade Settlement Mechanism) जुलैमध्ये सुरू केले होते खास करून रशियासाठी कारण रशियावर अमेरिकेने निर्बंध घातले असल्याने डॉलर मध्ये व्यवहार होऊ नव्हता. म्हणून रशिया सोबत आपण रुपी ट्रेड सेटलमेंट मेकॅनिझमला सुरुवात केली. या मेकॅनिझममुळे आता आपण फक्त रशिया सोबतच नाही तर सार्क, आफ्रिकन युनियन, युरोपीय युनियन ,ऑस्ट्रेलिया, कॅरिबियन देश अश्या तिसऱ्या जगातील समजल्या जाणाऱ्या देशां समवेत देखील रुपयात व्यवहार करू शकतो. आजच्या घडीला रशिया, श्रीलंका, नेपाळ, भूतान, युनायटेड अरब अमिरात, नायजेरिया या देशात समवेत आपण रुपयातच व्यवहार करीत आहोत. त्यामुळे आपले चलन आंतरराष्ट्रीय होण्यास सुरुवात देखील झाली आहे.

ताजकिस्तान, क्युबा, बुल्गेरिया ,हंगरी, लक्झमबर्ग, सुदान, रवांडा, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना…या देशांसमवेत भारताची बोलणी सुरु आहेत. भारत सरकारचा असा प्रयत्न आहे की, ज्यांच्याकडे ज्या देशांकडे डॉलरचा तुटवडा आहे, त्या देशांसाठी भारत विशेष प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्यापारातील वित्तीय तूट (deficit) भरून काढण्यास मदतच होईल. शिवाय यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला एक सशक्त अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जाईल.

सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

IMF ने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात भारताला या वर्षी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणूनही वर्णन केले आहे. पहिल्या तिमाहीत (Q1) भारताचा जीडीपी विकास दर १३.५ टक्के राहिला आहे. पहिल्या तिमाहीत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या जीडीपी वाढीच्या दराशी तुलना केल्यास भारत खूप पुढे असल्याचे दिसते. भारतीय अर्थव्यवस्था सध्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या वेगाने ब्रिटनला मागे टाकून जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे १० वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जगात ११व्या क्रमांकावर होती. भारतीय स्टेट बँकेच्या संशोधनानुसार २०२८ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगातील ३ री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे.यासाठी रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार होणं अत्यंत आवश्यक आहे ..

डिजिटल रुपया, जीएसटीत ( GST ) असलेली सुसूत्रता, यूपीआयने केलेली क्रांती, मोठ्या प्रमाणात डिजिटल साक्षरता, वाढलेली निर्यात, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, पीएम गती शक्ती योजना, व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत यासारख्या अनेक महत्वाकांक्षी योजनांमुळे भारतीय रुपया आणि रुपयाची किंमत वाढणारच आहे यात शंका नाही..

देशाच्या तरुण वर्गाकडे पाहून असे वाटते की, येथून पुढचा काळ हा भारतासाठी ‘सुवर्णकाळ‘ असेल आणि भारतीय उद्योग हे जागतिक पटलावर मोठी आघाडी घेतील व भारतराष्ट्र आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने देश अग्रेसर होईल.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात “रुपया” झेप घेऊन आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे.

म्हणतात ना :- पैसा वो भाषा बोलता है, जो पूरी दुनियां समझती है !!

तू चल पुढं तुला रं गड्या भीती कशाची…

नि पर्वा बी कुनाची…

https://www.businessinsider.in/finance/news/why-rbi-wants-international-trade-settlement-in-rupees/articleshow/92850515.cms

Back to top button