InternationalNewsWorld

लॅटिन अमेरिकेतील रणकंदन

“What difference does it make to the dead, the orphans and the homeless, whether the mad destruction is wrought under the name of totalitarianism or in the holy name of liberty or democracy?” ― Mahatma Gandhi

लोकशाही परंपराचा आदर व्हावा : प्रधानमंत्री

संसदेत तोडफोड, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर हल्ला बोल, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड… ब्राझीलच्या राजकारणानं असं हिंसक वळण घेतलंय.

अमेरिकेत दोन वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प (donald trump)यांच्या पराभवानंतर कॅपिटॉल हिलवर झालेल्या हल्ल्याचीच पुनरावृत्ती आज ब्राझीलमध्ये पहायला मिळाली. २६ जानेवारी २०२१ ला जे दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जो धुडघूस घातला गेला तसाच प्रकार आज ब्राझीलिया पाहावयास मिळाला.८ जानेवालीला ब्राझीलच्या (brazil)राजधानीत संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांचे हजारो समर्थक चालून गेले.काहींनी संसदेत तोडफोड केली तर काहींनी अध्यक्षांच्या खुर्चीवर चढून नव्या राष्ट्राध्यक्षांचा विरोध केला.ब्राझीलच्या पोलीस दलातील अनेक अधिकारी आंदोलकांसोबत सेल्फी काढून घेत होते किंवा त्यांना हिंसाचारास प्रोत्साहन देत होते.नंतर मात्र पोलिसांनी कठोर कारवाई करत १२०० लोकांना अटक केली असून त्यातील ४०० आंदोलकांना अटक केल्यानंतर आंदोलन शांत झाले असले तरी अद्याप मिटले नाहीये.पोलिसांनी आता या घटनेचा उच्चस्तरीय तपास सुरु केला आहे.

ब्राझीलमध्ये हे सगळं का घडतंय?

गेल्या वर्षी अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत तेव्हाचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांचा डाव्या विचारसरणीचे नेते लुईझ इन्शिओ लुला दा सिल्वा यांनी पराभव केला होता. परंतु बोल्सोनारो यांनी अद्यापही जाहीरपणे हा पराभव मान्य केलेला नाही.गेल्याच आठवड्यात लुला यांनी अध्यक्षपदाची शपथ घेत कामकाजाची सूत्रेही हाती घेतली होती. मात्र, रविवारी अचानक बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अध्यक्षीय निवासस्थान या सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये घुसखोरी करत तोडफोड केली.

ब्राझीलमध्ये ३० ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्राध्यक्ष निवडणूक(brazil elections) निकाला जाहीर झाला. बोल्सोनारो यांचा पराभव करत दा लुला सिल्वा है राष्ट्राध्यक्ष झाले.निवडणुकीत पराभूत झालेले ब्राझीलचे माजी अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी आपला पराभव मान्य करायला नकार दिला. सामान्यतः सत्तेचे हस्तांतरण होत असताना विजयी झालेल्या उमेदवाराचे पराभूत उमेदवाराकडून अभिनंदन केले जाणे हा शिष्टाचार आहे. पण बोल्सोनारो यांनी शपथविधीच्या एक दिवस आधी अमेरिकेतील फ्लोरिडाला प्रयाण केले आणि निवडणुकांचा निकाल अपल्याला अमान्य असल्याचे आपल्या समर्थकांना सूचित केले.

निवडणुकीत झालेला पराभव बोल्सोनारो समर्थकांच्या जिव्हारी लागला. निकालानंतर त्यांनी देशातील विविध ठिकाणी आंदोलन करत दा लुला सिल्वा यांचा निषेध केला होता. बोल्सोनारो हे उजव्या विचारसरणीचे तर दा सिल्वा ते कट्टर डावे मानले जातात. बोल्सोनारो यांचे समर्थक सातत्याने दा सिल्वा याचा विरोध करत आले आहेत. रविवारी झालेला हिंसाचारालाही याच राजकीय संघर्षाची किनार आहे.

अध्यक्ष दा लुला सिल्वा यांच्या निषेधार्थ बोल्सोनारो समर्थक रविवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी थेट संसद भवनाकडे कूच केली. येथील सुरक्षा रक्षकांवर हल्ला करत संसदेत प्रवेश केला. संसदेत अध्यक्षांच्या खुर्चीवर भोवती गोळा झालेला जमाव व संसद सभापतीच्या डासरवर चढून माईकशी छेडछाड करणाऱ्या आंदोलकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ब्राझीलमधील लोकशाहीचा इतिहास :-

ब्राझीलमध्ये १९६४ ते १९८५ अशी २१ वर्षं लष्करी राजवट होती. लोकशाही पुर्नप्रस्थापित झाल्यानंतर ब्राझीलच्या राजकारणावर डाव्या – उदारमतवादी पक्षांचा प्रभाव राहिला आहे. आकारमानानुसार ब्राझील भारताच्या अडीच पट मोठा असला तरी त्याची लोकसंख्या पाकिस्तानहून कमी आहे. ब्राझीलचा मोठा हिस्सा ‘अ‍ॅमेझॉन’ खोर्‍यातील घनदाट जंगलांनी व्यापली असून लोकसंख्या साओ पावलो आणि रिओ डे जानेरोसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाली आहे.

गेल्या काही दशकांपासून शेतजमीन तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असून ब्राझील गहू, मांस आणि साखरेचा मोठा निर्यातदार आहे. ब्राझीलची लोकसंख्या मुख्यतः ख्रिस्ती धर्मीय असून सुरुवातीला त्यात रोमन कॅथलिक पंथाचे प्राबल्य असले तरी गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी इवांजेलिकल प्रोटेस्टंट पंथ स्वीकारला आहे. त्यामुळेच ब्राझीलमध्ये पराकोटीची धार्मिक तेढ पसरली आहे.

संबंध जगाला अन्नपुरवठा करणार्‍या या देशात सुमारे लोकसंख्येच्या १५ टक्के म्हणजे तीन कोटींहून अधिक लोकसंख्या गरिबीरेषेखाली जगते. लोकसंख्येतही श्वेतवर्णीय आणि मिश्रवर्णीय लोकसंख्येचे प्रमाण मोठे असून त्याचा परिणाम आपसूकच ब्राझीलच्या राजकारणावर देखील होतात.

दा लुला सिल्वा (lula da silva)

नवनिर्वाचित अध्यक्ष लुला यापूर्वी दोन वेळा म्हणजेच २००६ ते २०१४ पर्यंत ब्राझीलचे अध्यक्ष होते. पराकोटीचे लोकानुनयी राजकारण, समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय कमालीचे लोकप्रिय ठरले असले तरी त्यामुळे ब्राझीलमध्ये आर्थिक बेशिस्त आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला. लुला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले. त्यांच्या उत्तराधिकारी दिल्मा रुसेफ यांनाही अवघ्या दोन वर्षांमध्ये राजीनामा द्यावा लागला.

पराकोटीच्या पर्यावरणवादामुळे आर्थिक विकास खुंटला. त्यामुळे ब्राझीलला आर्थिक काटकसरीचे धोरण अंगीकारावे लागले. त्यामुळे २०१८ साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत लष्करी सेवा बजावलेल्या जाइर बोल्सोनारो यांना दणदणीत विजय मिळाला.

जाइर बोल्सोनारो(bolsonaro)

आर्थिक बेशिस्त आणि उदारमतवादी राजकारणामुळे ब्राझीलची ओळख पुसली जात असल्याचे आवाहन त्यांनी ब्राझीलच्या धार्मिक, ग्रामीण, उच्च मध्यमवर्गीय आणि शेतकर्‍यांना केले.

बोल्सोनारो यांनी अध्यक्ष झाल्यावर एक कणखर नेता अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आर्थिक उदारीकरण, शेतीसाठी जंगलतोड, पोलिसांना व्यापक अधिकार देणे, गर्भपात तसेच समलैंगिक समुदायाला विरोध आणि धार्मिक ख्रिस्ती संघटनांना समर्थन यातून त्यांनी उजव्या लोकानुनयी सरकारचा पर्याय उभा केला. ‘कोविड-१९’ च्या संकटात ब्राझीलचे प्रचंड मोठे नुकसान झाले आणि त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. आंतरराष्ट्रीय माध्यमं तसेच मानवाधिकार संघटनांनीही त्यांना लक्ष्य करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

याच कालावधीत लुला यांची तुरुंगातून सुटका होऊन त्यांच्याविरूद्धचे खटले निकाली निघाले आणि त्यांचा नव्याने निवडणुका लढण्याचा मार्ग मोकळा झाला. लुलांनी २००६ साली अध्यक्षीय निवडणुकीत त्यांच्या स्पर्धक राहिलेल्या गेराल्डो अल्कमिन यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार करून उत्तम बेरजेचे राजकारण केले.

लुला VS बोल्सोनारो.. आणि सत्तासंघर्ष

निवडणूकपूर्व मतदार चाचण्यांमध्ये लुला पहिल्याच फेरीत ५० टक्क्यांहून जास्त मतं मिळवून विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, बोल्सोनारो यांनी ४३ टक्क्यांहून जास्त मतं मिळवत लुलांचा विजय लांबवला. दुसर्‍या फेरीत लुला विजयी झाले असले तरी बोल्सोनारोंनी ४९ टक्क्यांहून जास्त मिळवत विजयातील अंतर मोठ्या प्रमाणावर कमी केले.

बोल्सोनारो यांनी आपल्या पराभवासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न होत असून त्यासाठी निवडणुकांमध्येही धांदली केली जाईल, अशी भीती ते वारंवार व्यक्त करत होते. निकालानंतरही त्यांनी आपला पराभव मान्य करायला नकार दिला असला तरी आपण सत्तांतराच्या आड येणार नाही हे स्पष्ट केले. असे असले तरी त्यांनी स्वहस्ते लुला यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं सोपवण्यास नकार देत शपथविधीच्या एक दिवस आधी अमेरिकेतील फ्लोरिडाला प्रयाण केले.

बोल्सोनारोंच्या मुलाने अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ब्राझीलमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले असताना बोल्सोनारो यांनी हिंसाचाराचा निषेध केला असला तरी कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोल्सोनारोंना रुग्णालयात दाखल करावे लागले. दुसरीकडे लुलांच्या समर्थकांनी बोल्सोनारोंनी आंदोलकांना पुढे करून ब्राझीलमधील लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. बोल्सोनारोंचा व्हिसा रद्द करून त्यांची ब्राझीलला रवानगी करण्याची मागणी लुला समर्थकांनी अमेरिकेकडे केली आहे.

ब्राझीलमधील घटना पुन्हा एकदा स्पष्ट करतात की, गेल्या काही वर्षांत लोकशाही देशांमधील विरोधी पक्षांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पराभूत होणार्‍या सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांना वाटते की, यामागे देशातील माध्यमं, न्यायालयं, निवडणूक आयोग आणि उद्योगांचे तसेच देशाबाहेरील सत्तांचे संगनमत आहे. आपल्या हातातील सत्ता गेल्यास सत्तेवर येणारा विरोधी पक्ष लोकशाहीचे स्तंभ असणार्‍या संस्थांचा दुरुपयोग करून आपल्याला पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही. ब्रेक्झिटनंतरचा ब्रिटन, ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिका,नेतान्याहूंच्या विजयानंतर इस्रायल तसेच लुलांच्या विजयानंतरचा ब्राझील अशी अनेक उदाहरणं देता येतील.

बोल्सोनारो आणि भारत

भारताने २०२० सालच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. या दौर्‍यात भारत आणि ब्राझीलने १५ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. ‘कोविड-१९’ (covid-19 )काळातही भारताने ब्राझीलला मोठ्या प्रमाणावर मदत केली ज्यासाठी बोल्सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देताना संजीवनी घेऊन आलेल्या हनुमानांची आठवण काढली होती. ब्राझीलमधील घटनांबाबत चिंता व्यक्त करताना मोदींनी तिथे लोकशाही परंपरांचे पालन होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

जनतेचा विश्वास डावे विचार कधीच संपादन करू शकले नाही, डावी विचारसरणी आता जगातून लोप पावत चालली आहे. म्हणूनच डाव्यांचा धीर सुटून(मुळातच धीर होता कधी ?) त्यांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला आहे.भारतात देखील ‘अग्नीवर’ विरोधी जाळपोळ तसेच शतकारांच्या आडून केलेली भारत सरकारची कोंडी. यावरून डावांची मानसिकता स्पष्ट दिसून येते.

समर्थ म्हणतात ना:-

सावध चित्ते शोधावे, शोधोनी अचूक वेचावे !
वेचोनी उपयोगावे, ज्ञान काही !!

अखंड सावधान असावे,दुश्चित कदापी नसावे !
तजविजा करीत बैसावे, येकान्त स्थळी !!

https://economictimes.indiatimes.com/news/international/us/brazil-massive-pro-democracy-rallies-held-demanding-action-against-rioters-who-stormed-congress/articleshow/96890680.cms

https://www.thehindu.com/opinion/editorial/a-riot-of-losers-the-hindu-editorial-on-the-violence-of-jair-bolsonaro-supporters-in-brazil/article66361703.ece

Back to top button