News

मुंबईतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेल्या लॅण्डजिहाद विरुद्ध सकल हिंदू समाज रस्त्यावर

सबंधित भ्रष्ट BMC अधिकाऱ्यांना तत्काळ बरखास्त करण्याची तसेच Legal Enquiry ची मागणी..

लॅण्डजिहाद हा गझवाए हिंदचाच(ghazwa e hind)भाग आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.

लव्ह जिहाद ,लॅण्डजिहादा(land jihad) विरुद्ध सकल हिंदू (HINDU) समाज जागृत होतोय..

अटलजींच्याच शब्दात सांगायचे झाले तर:-

यह बुझने वाली आग नहीं, रग-रग में उसे समाए हूं।
यदि कभी अचानक फूट पड़े विप्लव लेकर तो क्या विस्मय?
हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!

घाटकोपर (GHATKOPAR) येथील असल्फा व्हीलेज (asalpha village) या भागात ग्रीन झोन म्हणून आरक्षित असलेल्या ३ हजार चौ.फू.भुखंडावर बेकायदा मशीद उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणी स्थानिक हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मागील दोन वर्षांपासून येथील हिंदू धर्मीय या अवैध बांधकामाच्या विरोधात लढा देत आहेत, रविवार, १५ जानेवारी रोजी अखेर स्थानिक हिंदू धर्मीय रहिवाशांनी या ठिकाणी जोरदार निदर्शने केली. मानवी साखळी तयार करून आपला निषेध नोंदवला.त्यावेळी आमदार नितेश राणे या आंदोलनात सहभागी झाले होते.

कोरोनाकाळातच या अवैध बांधकामाला सुरुवात झाली होती.याचा त्रास स्थानिक भारत सोसायटी रहिवासी संघातील नागरिकांना जाणवू लागला. त्याची रितसर तक्रार त्यांनी पोलिसांना आणि महानगरपालिका एल वॉर्ड (BMC) येथे डिसेंबर २०२० साली प्रथम केली होती. पण त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले असावे.

कारण म्हणजे एकूणच पालिकेच्या प्रशासनाचा कारभार हा सावळागोंधळाचा आणि भ्रष्टाचारासाठी (corruption) कुप्रसिद्ध आहेच. त्यामुळेच धनाढ्य संस्थांना त्यांना सहजपणे आपलं करणं सोपं झालंय , त्यात इथे तर मदरसा मस्जिद यांना आखाती देशांतून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होत असतेच. त्यामुळे या अनधिकृत मदरशाच्या बांधकामासाठी जे पुर्णतः बेकायदेशीर आहे ,कायदा पुर्णपणे वाकवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना आधी वाकवले गेले असणारच , कारण त्याशिवाय हे शक्यच नाही. कारण ही अवैध मस्जिद (encroachment)बांधण्यात येणारा घाटकोपर पश्चिम अस्लफा येथील भुखंड मुंबईच्या DP plan नुसार हरित पट्टा म्हणून राखीव(आरक्षित ) भुखंड आहे .

नेहमीप्रमाणेच एल वॉर्ड(L WARD ) महानगरपालिका अधिका-यांनी रहिवाशांच्या तक्रारीची दखलच घेतली नाही कारण त्यांचे हात ओले करण्यात आले असणारच. चिरीमिरीमुळे अधिका-यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे , असा स्थानिक नागरिकांनी आरोप केलेला आहेच. या डोळेझाकीमुळे येथे आता तीन मजल्यापर्यंत RCC बांधकाम झालेले आहे. वेळीच पावले उचलली असती तर हे रोखता आले असते पण सगळ्यांची तोंड बंद करण्यात लॅण्डमाफिया यशस्वी झाले आहेत.

भारत सोसायटी रहिवासी संघातील महिला , लहान मुलांसाठी या बांधकामामुळे ( ज्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच छोटा झाला आहे) त्रास सहन करावा लागतो आहे. दिवसभर वस्ती बाहेरचे मुस्लिम तरुण मदरशात येऊ लागली आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर सकाळ हिंदू समाज एकवटताना दिसतोय.

नोव्हेंबर २०२२ पासून भारत सोसायटी रहिवासी संघ आणि आजुबाजुच्या इतर सोसायटीच्या तक्रारी पुन्हा पोलिस आणि महानगरपालिका यांना देण्यात आल्या आणि त्याचा सातत्याने भारत सोसायटी रहिवासी संघातील नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर हे बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु मदरसा मस्जिद अरबिया सिराजुल उलुम ने कोर्टात धाव घेऊन कोर्टाची दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करत काही काळासाठी स्थगिती मिळवली आहे.त्याविरुध्द भारत सोसायटी रहिवासी संघ आणि आजुबाजुच्या सोसायटीच्या नागरिकांनी आपला लढा सुरूच ठेवला आहे.आता स्थानिक हिंदू समाज आता रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी रविवारी, १५ जानेवारी रोजी मोठा मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला.

या आंदोलनाचे महत्वाचे कारण म्हणजे उघड उघड नियमांची पायमल्ली करत सरकारी जमीन मदरसा (madarsa) मस्जिदसाठी आंदण देण्याइतपत लालची भ्रष्ट अधिकाऱ्यांची मजल आता पोहोचली आहे. सामान्य भाबड्या नागरिकांना एक वीट रचनेही मुश्किल करुन टाकणा-या महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी, घाटकोपरच्या अस्लफा गावातील जंगलेश्वर महादेव मंदिर मार्गावरील सुभाषनगर येथील भारत सोसायटी रहिवासी संघाजवळचा राखीव भुखंड मदरसा मस्जिद अरबिया सिराजुल उलुम च्या घश्यात घातला आहे.

अशा मोक्याच्या जागा हेरून त्या बळकावून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या साथीने हळूहळू शहरांना मुस्लिम वस्ती आणि मस्जिद मदरश्यांनी विळखा घातला जातो. हे सर्व लॅण्डजिहादचे षडयंत्र आहे,हे आता हिंदू समाजाने पुरते ओळखले आहे.

डोळसपणे बघितल्यावर आपल्या आजूबाजूला देखील अशाप्रकारे लॅण्डजिहाद आढळून येईल, त्याविषयी व्यक्त होणे , एकजूटीने आवाज उठवणे काळाची गरज आहे.

घाटकोपर येथील असल्फा व्हीलेज या भागात ग्रीन झोन म्हणून राखीव असलेल्या ३ हजार चौ.फू.भुखंडावर धर्मांधांनी बांधलेली बेकायदा मशीद जमीनदोस्त झालीच पाहिजे. राज्य सरकार आणि महापालिकेने ही अवैध मशीद जमीनदोस्त करण्याची कारवाई तात्काळ करावी अन्यथा हिंदू समाजाला तिसरा डोळा उघडण्यास भाग पडेल..

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की:-

होश हवास रखो कायम वरना अनर्थ हो जाएगा।
टुकड़ों में बट गया देश तो हिंद कहां कहलायेगा।

Back to top button