CultureNewsSpecial Day

एक अमूल्य मत असेही…

आमच्या मालकीची सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपले मत…

लोकशाहीमध्ये(democracy day) मतदान(voting) हा नागरिकांचा अत्यावश्यक हक्क आणि जबाबदारी देखील आहे.

जागोजागी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र लावले जातात आणि त्या मतदान केंद्रांवर आजूबाजूचे अनेक लोकं येऊन मतदान करत असतात, पण तुम्हाला हे माहिती आहे का की निवडणूक आयोग(election commition) फक्त एका मतदारासाठी म्हणून एक मतदान केंद्र उघडतं. होय! वाचून आपल्याला वाचून आश्चर्य वाटले असेल कारण एका बाजूला मतदानासाठी लागणाऱ्या रांगा आणि दुसरीकडे फक्त एका माणसाचे मत घेण्यासाठी जमलेले मतदान अधिकारी..

हे मतदान केंद्र गुजरातच्या गीरच्या जंगलात दरवर्षी बनवले जाते,अन् यासाठी तब्बल ५ अधिकारी सकाळपासून मतदान होई पर्यंत हजर असतात. सगळे मिळून त्या एका व्यक्तीची वाट बघत असतात.

मतदान करणं हे प्रत्येक भारतीयाचं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. दरवर्षी २५ जानेवारीला मतदारांचे हक्क आणि मतदानाच्या जनजागृतीसाठी भारतात “नॅशनल वोटर्स डे” (National Voter Day)अर्थात मतदार दिवस साजरा केला जातो.

कोण आहेत हे मतदार ?

गुजरातमध्ये(gujrat) राहणारे मतदार भरतदास चंदनदास. भरतदास हे एका मंदिराचे पुजारी होते. त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने आतापर्यंत स्वतंत्र मतदान केंद्र उभारले आहे. जुनागढच्या गीर जंगलात बनेज नावाच्या एका मंदिरात ते राहत होते. मात्र, त्यांचे १ नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले.

२०१९ च्या निवडणुकीत महंत भरतदास दर्शनदास यांच्यासाठी निवडणूक आयोगाने(election commition) स्वतंत्र मतदान केंद्र उभारले होते. तसे, २००२ पासून प्रत्येक निवडणुकीत निवडणूक पंच ५ जणांची टीम पाठवत त्यांच्यासाठी खास बूथची व्यवस्था करत असे. त्या भागात भरतदास हे एकमेव मतदार होते..

मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो !

मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया !

हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.

काही लोक निवडणुकीच्या दिवशी मतदान करत नाहीत आणि त्यानंतर ते सरकारच्या धोरणांबद्दल तक्रार करतात. बर्‍याच लोकशाही देशांमध्ये ५०% ते ६०% मतदानाचे प्रमाण आहे जे खूपच कमी आहे आणि याचा अर्थ असा आहे की जर मतदान सुमारे ८०% ते ९०% असेल तर निवडणुकीचे निकाल वेगळे असू शकतात. लोकांच्या मताच्या रूपात सामर्थ्य आहे आणि त्यांनी ते वापरायला हवे.

सुदृढ लोकशाही राखण्यासाठी मतदान आवश्यक आहे. हा एक मूलभूत अधिकार आहे जो प्रतिनिधित्व सुनिश्चित करतो, जबाबदारीला प्रोत्साहन देतो, सहभागास प्रोत्साहन देतो आणि धोरणाला आकार देतो. मतदानाचा हक्क बजावणे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

आपण मतदान केले नाही तर, आपल्याला तक्रार करण्याचा अधिकार नाही..,

मतदान हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. हे नागरिकांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणार्‍या निर्णयांमध्ये आवाज उठवण्याची परवानगी देते, सरकार लोकांचे प्रतिनिधी आहे याची खात्री देते, नागरिकांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्यांचे संरक्षण करते आणि नागरिकांना त्यांच्या देशाच्या दिशेने बोलण्याची परवानगी देते. त्यामुळे सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून आपण प्रतिज्ञा घेऊया.. ” माझे अमूल्य मत वाया जाऊ देणार नाही,लोकशाहीला बळकटी देण्यासाठी मी माझ्या मतदानाचा हक्क बजावणार आणि इतरांनाही उद्युक्त करणार…”

https://www.facebook.com/VSKKokan

https://www.aajtak.in/elections/gujarat-assembly-elections/story/commission-will-set-up-one-polling-station-in-gir-forest-for-gujarat-election-ntc-1567942-2022-11-03

https://www.jansatta.com/elections/polling-booth-in-gir-forest-has-been-set-up-for-1-voter-bharatdas-bapu-in-junagadh-gujarat-jspe/989717/

Back to top button