News

जन आक्रोश मोर्चा का ?…. पुन्हा कुणी ‘रूपाली’ होऊ नये म्हणून !

रूपाली चंदनशिवेच्या(rupali chandanshive) हत्येने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

रूपाली(rupali) चंदनशिवे या २१ वर्षांच्या मुलीची तिचा पती इक्बाल मोहम्मद शेख याने गळा चिरून हत्या केली. दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या रूपालीच्या हत्येने ‘लव्ह जिहाद’(love jihad) आणि ‘तन सर से जुदा’च्या विकृत मानसिकतेचे भीषण सत्य पुन्हा समोर आले आहे.

रूपालीची काय चूक होती? की तिने वयाने दुप्पट असलेल्या इक्बाल मोहम्मद शेखवर आंधळं प्रेम आणि तितकाच आंधळा विश्वास ठेवला, ही चूक?

की तिने भ्रम बाळगला की, इक्बाल आपल्या प्रेमासाठी पागल आहे तो आपल्यावर प्रेम करतो, ही तिची चूक?
 
आपण इक्बालच्या मुलाची आई आहोत, इक्बाल कसाही असला तरी आपल्याला जीवे मारणार नाही, हा खोटा विश्वास तिने इक्बालवर ठेवला, ही तिची चूक?

जाणून घेऊया रुपालीची कैफियत..

नागवाडी-चेंबूरच नव्हे, तर राज्याच्या, देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागांतही वसलेल्या अशा कित्येक वस्त्यांमध्ये अशा किती तरी ‘रूपाली’ आहेत, ज्यांना भ्रम असतो की, त्यांचा ‘इक्बाल’ त्यांच्या प्रेमासाठी ठार वेडा आहे, त्यांच्यावर खरे प्रेम करतो आणि त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. हा भ्रम कधी संपेल? रूपाली जाळ्यात फसताच इक्बालने रूपालीवर त्याच्या संस्कृतीचे नियम, रितीरिवाज थोपवायला सुरुवात केली होती. रूपालीसाठी त्याने काहीएक सोडले नव्हते, तर रूपालीने मात्र त्याच्यासाठी सगळेच मागे सोडावे, यासाठी त्याने अखेर तिचा जीवही घेतला.
 
तिच्या बहिणींच्या सांगण्यानुसार, २०१९ साली रूपाली १६ वर्षांची होती. त्यावेळी इक्बालच्या सोबत ती घरातून निघून गेली. इक्बाल हा तिच्यापेक्षा वयाने दुप्पट. त्याची आधी दोन लग्न झालेली. पहिल्या पत्नीला मूल होत नाही म्हणून त्याने मारून झोडून तिला सोडून दिले होते, तर दुसर्‍या पत्नीला एक मुलगी होती. गरीब घरच्या सुंदर रूपालीवर नराधामाची नजर पडली.माझी इतकी संपत्ती आहे, तितकी संपत्ती आहे, या भाईशी संबंध आहेत, त्या भाईशी संबंध (भाई म्हणजे इथे गुंड!) आहेत असे तो नेहमीच म्हणे. त्याचे राहणीमान अगदी ‘टापटीप.’ बोलण्यात खास चित्रपटातल्या खाना”वळी” मंडळींची लकब.
 
 तर अशा या इक्बालने रूपालीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून भुलवले. जेव्हा तिच्या बहिणीला रूपाली आणि इक्बालच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळले, तेव्हा तिने रूपालीला खूप समजावले. तेव्हा रूपाली म्हणे म्हणाली होती की, “इक्बाल माझ्यासाठी खूप पागल आहे, वेडा आहे. तो माझ्यासाठी काहीही करू शकतो.

याच विश्वासात रूपाली इक्बालसोबत पळून गेली. वेडं वय. त्यात समजही कमी. जगाचा-माणसांचा अनुभव नाही. तिच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनच्या चकराही मारल्या. पण, तिच्या पालकांनी सांगितले की, त्यावेळी पोलीस त्यांना म्हणाले, “ती तिच्या मर्जीने गेली. ती आता येत नाही.” पोलिसांनी साधी फिर्यादही घेतली नाही. रूपालीचे पालक हतबल होऊन परतले. पुढे रूपाली आणि इक्बाल सहा महिने एकत्र राहिले. त्यानंतर त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईकही सोबत राहायला आले.
 
इक्बालने तर रूपालीचे नावही बदलले. तिचे नाव ‘झारा’ ठेवले. याचाच अर्थ इक्बालने काहीही सोडले नव्हते, जे काही सोडावे लागले ते रूपालीलाच!

“रूपाली मुस्लिमांसारखी हिंदी बोलत नाही, मुस्लिम रितीरिवाज पाळत नाही, मुख्यतः बुरखा(burkha) घालत नाही म्हणून तिची सासू तिचा छळ करी. त्यातच रूपालीला मुलगा झाला.त्यामुळे मुलगा झाल्यावर इक्बालचा जाच वाढला. तो तिला क्रूरपणे मारहाण करू लागला. आपल्यासाठी वेडा असणारा आणि पूर्वी आपले सगळेच म्हणणे ऐकणारा हाच इक्बाल का? असा प्रश्न रूपालीला पडला. कारण, रूपाली तिच्या माहेरी खुल्या संस्कारात वाढलेली. राहणीमानही आधुनिक. अचानक बंदिस्त जगणे आणि बुरखा परिधान करणे तिला जड जाऊ लागले. दोन पत्नींचे जीवन आपल्या मर्जीने खराब केलेल्या इक्बालसाठी हे पचणे अवघडच होते की, एक गरीब घरची, वयाने अर्धी असलेली मुलगी त्याच्या धर्माचे नियम पाळायला नकार देते? तो तिला भरपूर मारहाण करू लागला. सासू आणि घरातले लोकही तिला मारहाण करू लागले.
 
एकदा तर रस्त्यातच इक्बालने रूपालीला गुराढोरासारखे मारायला सुरुवात केली. हे रूपालीच्या बहिणीने पाहिले.रूपालीला घेऊन ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये रूपालीशी गोड बोलून इक्बाल तिला घेऊन पुन्हा घरी आला.पण, रूपालीचा नरकवास संपला नाही.
 
रूपालीने पोलिसात तक्रार केली आणि जानेवारी २०२२ मध्ये पोलिसात अदखलपात्र गुन्हा म्हणून इक्बालवर गुन्हाही दाखल झाला. यानंतर रूपाली मुलाला घेऊन इक्बालपासून वेगळी राहू लागली. “मुलाचा ताबा मला दे, आमच्या मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे राहा.” पण, रूपाली या सगळ्याला तयार नव्हती. ती म्हणे “मुलाचा हिस्सा दे, मीच त्याला वाढवेन.” याच रागातून त्याने तिची हत्या केली. कसायाने मुक्या प्राण्यांचा गळा चिरावा तसा त्याने तिचा गळा चिरला. त्याने चाकूने हल्ला केला तेव्हा काही लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, चाकू नाचवत त्याने सगळ्यांना धमकावले. तिच्यावर खुनी हल्ला करून तो नंतर पळून गेला. पोलिसांनी त्याला पकडले. पण, त्या निष्पाप मुलीचा जीव हकनाक गेला होता.
 
या घटनेबद्दल वाटत राहते की, “रूपाली अल्पवयीन असताना ती इक्बालबरोबर गेली. अल्पवयीन असतानाच तिला बाळ झाले. तिचे तथाकथित धर्मपरिवर्तनही करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टींवर त्याचवेळी कायदेशीर कारवाई झाली असती तर?

किंवा इक्बालबरोबर गेल्यावर आपल्याला पुढे काय भोगावे लागेल, याबाबतची जागृती रूपालीला असती तर?

अर्थात.. आता या जर तर ला काडीचीही किंमत नाही.. पण, रूपालीसारख्या कितीतरी मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरत आहेत. त्या बहुसंख्य मुलींच्या आयुष्याची जी परवड होते, त्यांना जो नरकवास भोगावा लागतो, तो वर्णन करणे देखील कठीण..

लव्ह जिहादच्या या सुनियोजित षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी, लव्ह जिहाद विरोधी कडक कायदे करायला संबंधित यंत्रणांना भाग पाडण्यासाठी आणि निद्रिस्त हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी रविवार, २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क, दादर येथे मुंबईकरांच्या जनआक्रोश मोर्चासाठी आपण जमतो आहोत… तिथून हा मोर्चा प्रभादेवीच्या कामगार मैदानावर पोहोचेल व विसर्जित होईल.

मुंबईच्या सुसंघटित हिंदू समाजाचा लव्ह जिहाद(love jihad) विरोधी आक्रोश संबंधित यंत्रणांच्या आणि षडयंत्रकाऱ्यांच्या कानापर्यंत पोचू दे तर खरा..

मी जातोय… तुम्ही येताय ना?…

https://www.mahamtb.com/Encyc/2022/10/1/Article-on-Rupali-Chandanshive.html

Back to top button