News

तुर्की… धरणीकंप आणि.. विनाश

तुर्कस्तानात सर्वाधिक हानी, सीरियातही हाहाकार

‘वक्त पर जो काम आए वही दोस्त होता है’:- फिरात सुनेल (तुर्की राजदूत)

आशिया(asia) आणि युरोपचं(europe) प्रवेशद्वार मानला जाणाऱ्या तुर्कीमध्ये भीषण भूकंपाचे एकामागून अनेक धक्के बसले आहे. तुर्की व सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे झालेल्या भुकंपाने मोठा हाहाकार उडाला आहे. आलेला भूकंप हा ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंपाचा हादरा इतका जबरदस्त होता की, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या.

तुर्कीतील( turkey )दहा प्रमुख शहरांना भुकंपाची झळ बसली आहे. कहमानमारश, हैटी, गाजिएनटेप, ओस्मानिये, अदियामान, सनलिऊर्फा, मलेटिया, अदाना, दियारबाकिएर, किलिस या शहरांमध्ये भूकंपाने प्रचंड नुकसान झालं आहे.

‘युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हे’ने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.२ किलोमीटर खोलीवर झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ४ वाजता या परिसरात भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाचे प्रमुख केंद्र हे गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होते. भूकंपाचे धक्के लेबनान आणि सीरियामध्ये देखील मोठ्याप्रमाणावर बसले आहेत.

तुर्कीत झालेल्या शक्तीशाली भूकंपाला (Turkey earthquake) आता ४८ तास उलटले आहेत. तरीही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मृत देहांचा खच आढळत आहे. जगभरातील अनेक देशांनी तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारतासह इतर देशांची मदत पथके तुर्कीत दाखल झाली आहेत, त्यामुळे बचावकार्याला वेग वाढला आहे. सध्याच्या समोर आलेल्या माहितीनुसार तुर्की, सीरिया यो दोन्ही देशात मिळून भूकंपबळींची संख्या १०००० वर गेली आहे. अशी माहिती एपी (The Associated Press) या वृत्तसंस्थेने दिली आहे.

लागोपाठ तीन धक्के

सोमवारी पहाटेपूर्वी साधारणतः तीन वाजण्याच्या आसपास भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यावेळी लोक झोपेत होते. त्यामुळे अनेकांना घरांमधून बाहेर पडण्यासही उसंत मिळाली नाही. उंच इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर राहणाऱया लोकांना घराबाहेर पडताना प्रचंड त्रास झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले. त्यानंतर तीन तासांनी दुसरा मोठा धक्का बसला जो ७.६ रिश्टर क्षमतेचा होता. त्यानंतर तिसरा धक्का काहीसा सौम्य (६ रिष्टर क्षमता) होता. यांमध्ये अनेक सौम्य हादरे बसले असून आणखी एक दोन दिवसांमध्ये पुन्हा भूकंपाची शक्यता आहे.

हजारो नागरिक अद्याप ढिगाऱ्याखालीच

शक्तीशाली भूकंपाचा तडाखा बसलेल्या तुर्की आणि सीरियात अद्याप हजारो नागरिक ढिगान्याखाली अडकले आहेत. कित्येक तासानंतरही मृतदेह मिळत असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीने उपचारासाठी अन्यत्र हलवले जात आहे.

पाऊस, बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे

शक्तिशाली भूकंपानंतर दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियाच्या अनेक भागात बचावकार्य वेगाने सुरू आहे. पण तुर्कीसह अनेक देशात पाऊस आणि बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, तुर्कीतील बचावकार्यात बर्फवृष्टीमुळे प्रचंड अडथळे येत असून. इमारतींच्या ढिगाऱ्याखालून माणसांना जिवंत काढणे कठीण झाले आहे. यातूनही अनेक देशांच्या सहाय्याने येथील मदत यंत्रणा वेगाने बचावकार्य करत आहे. तसेच तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींची संख्या २०००० होण्याची भिती येथील यंत्रणेकडून वर्तवली जात आहे.

मृतांची संख्या ‘आठ’ पटीने वाढू शकते : WHO

दरम्यान तुर्की भूकंपावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले ( WHO )आहे की, ‘अशा भूकंपाच्या घटनांमध्ये सुरुवातीला मृतांची आणि जखमींची संख्या ही कमीच असते. पण कालांतराने ही संख्या वेगाने वाढते. तुर्कांतील भूकंपामुळे बेघर झालेल्यांची परिस्थितीही अशीच आहे. दरम्यान तुर्कीत भूकंपाचे धक्के बसणे सतत सुरूच असून, यामुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील तापमानात देखील प्रचंड बदल जाणवत आहेत. सतत पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडी देखील वाढली आहे. त्यामुळे बेघर झालेल्या लोकांवर व अन्य नागरिकांवर याचा परिणाम होऊन आणखी अडचणी वाढून, मृतांची संख्या आठ पटीने वाढू शकते असे WHO ने म्हटले आहे.

पंतत्रधान मोदींचा संदेश

या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारा संदेश पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर प्रसारित केला आहे. या कठीण स्थितीत भारत आपल्यामागे ठामपणे उभा आहे. भारताकडून सहाय्यता पाठविण्यात येत आहे. आपली हानी सहन करण्याचे बळ परमेश्वर आपल्याला देवो. भारत आपल्याला सहाय्यता करण्यासाठी सदैव सज्ज आहे, असे पंतप्रधान मोदींनी या संदेशात पुढे स्पष्ट केले आहे.

भारताकडून मदतीचा ओघ

तुर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. तुर्की सरकारच्या मदतीने भारताने वैद्यकीय पथकासह ‘एनडीआरएफ’चे पथक भूकंपग्रस्त भागात पाठवले आहेत. भारतातून तेथे दोन बचावपथके पाठवण्यात आली आहेत.

बचाव पथकांसोबत एक डॉक्टरांची टीमदेखील आहे.यामध्ये ८९ सदस्य आहेत. तुर्कस्तानमधील बाधित भागात भारतीय लष्कर फील्ड हॉस्पिटल सुविधा पुरवणार आहे. यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जिकल टीम, जनरल सर्जिकल स्पेशालिस्ट टीम, मेडिकल स्पेशालिस्ट टीम आणि इतर मेडिकल टीम्सचा समावेश आहे. ३० खाटांची वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी टीम क्ष-किरण मशीन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, कार्डियाक मॉनिटर्स आणि संबंधित उपकरणे आतापर्यंत पोहचली आहेत.

धान्य आणि औषधेही भारत पाठविणार आहे, त्यासाठी दोन मालवाहू जहाजे सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच विमानांनी सहाय्यता पाठविण्यात येणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारांशी भारताचा संपर्क असून त्यांच्या आवश्यकता लक्षात घेतल्या जातील. अंकारामधील भारताचा दूतावास तुर्कस्तान सरकारशी चर्चा करीत आहे. सीरियाच्या प्रशासनाशीही सहाय्यतेविषयी आवश्यक ती बोलणी सुरु आहेत.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची आगळीक सुरूच

स्वतःला तुर्कस्तानचा अतिशय जवळचा मित्र म्हणवून घेणार्‍या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्ताने तुर्कीच्या मदतीसाठी भारताने पाठवलेल्या विमानाला एअर स्पेस वापरण्याची परवानगी दिली नाही. मदतकार्यासाठी तुर्कस्तानला जाणार्‍या भारतीय विमानाला हवाई क्षेत्र देण्यास इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने नकार दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या या असंवेदनशीलतेवर, दुटप्पी धोरणावर तुर्की मीडिया संतप्त झाला आहे. 

स्थलांतरितांचे प्रश्न सोडवणार कोण ?

सीरियाच्या गृहयुद्धामुळे विस्थापित होऊन तुर्कस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या असंख्य स्थलांतरितांना या भूकंपाची प्रचंड झळ पोहचली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू या स्थलांतरितांच्या वसाहती असलेल्या भागामध्येच होता. या वसाहतींमधील परिस्थिती हलाखीची असून विस्थापितांना कच्च्या इमारतींमध्ये ठेवण्यात आले होते. या इमारती कोसळल्याने आता त्यांची अवस्था बेघर झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थलांतरितांसाठी अन्न आणि औषधेही अपुरी पडत आहेत. त्यांच्यापैकी किती जणांचा मृत्यू झाला याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या स्थलांतरितांनाही साहाय्यता दिली जात असल्याचे म्हटले जात आहे मात्र त्यात सत्यता नाही.

आधी कल्पना होती ?

असा विनाशकारी भूकंप होणार आहे, याची पूर्वसूचना एका संशोधकाने डिसेंबरमध्येच दिली होती, अशी माहिती तुर्कस्तानच्या सरकारी वृत्तपत्राने दिली आहे. त्याचप्रमाणे प्रँक हुगरबीट या हॉलंडच्या संशोधकानेही असा इशारा चार दिवसांपूर्वी दिला होता. ५ फेब्रुवारीला भूकंप होईल, असे हुगरबीट यांचे म्हणणे होते. ते पुष्कळसे खरे ठरले आहे. त्यांच्या सूचनेनुसार तुर्कस्तान सरकारने काही तयारी केली होती. तथापि, या उत्पाताच्या प्रमाणाचे अनुमान काढता आले नव्हते. त्यामुळे पूर्व तयारी अपुरी पडली असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अर्थात आता जर तर ला काही महत्व नाही, व्हायची ती हानी होऊन गेली आहे.

१९३९ नंतर आता

तुर्कस्तानला १९३९ मध्ये प्रचंड भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी देखील जबर जीवीतहानी झाली होती. एकंदर 33,000 माणसे ठार झाली होती. रिष्टर प्रमाणानुसार हा त्यानंरचा दुसरा इतका मोठा भूकंप आहे. तुर्कस्तान हा देश जगाच्या अतिभूकंपप्रवण भागात असल्याने नेहमी येथे हा धोका असतो. हा भूकंप शहरी भागाच्या जवळ झाल्यानें जीवीत आणि मालमत्ताहानी मोठी झालेली आहे.

आधीच खस्ताहाल अर्थव्यवस्था

भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानचा पाठीराखा बनण्याचा प्रयत्न तुर्की कायमच करत आला आहे .संकटातील इस्लामी देशांवर मदतीची उधळण करणार्‍या पर्यायाने स्वतःला खलिफा म्हणवून घेण्याचे हौस असलेल्या तुर्कीची अर्थव्यवस्था (economy) आता डबघाईला येत असून, त्यांची वाटचाल इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकून सुरू आहे.

एर्दोगन यांचे चुकीचे आर्थिक धोरण आणि अनुदानामुळे तुर्कीचे चलन लीराची किंमत डॉलर्सच्या तुलनेत दिवसेंदिवस घसरतच होती त्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (FATF )या देशाला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसोबत ग्रे लिस्टमध्ये टाकल्यामुळे त्यांच्याकडे गुंतवणूक कमी झाली आहे. लीरामध्ये(तुर्की चलन) सातत्याने घसरण होत चालल्यामुळे तुर्कीच्या केंद्रीय बँकेने दोन आठवड्यांत चारवेळा बाजार हस्तक्षेप करावा लागत होता. डॉलरची किंमत वाढल्याने तुर्कीची आयात-निर्यात आणि परकीय गंगाजळी याच्यावर नकारात्मक परिणाम दिसत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे जनतेला भीषण महागाईचे चटके बसू लागले होते.आणि आता हा विनाशकारी भूकंप तुर्कीला २० वर्षे मागे घेऊन गेला आहे.

तुर्कीचे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान प्रेम

तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांचे पाकिस्तान प्रेम लपून राहिलेले नाही. एर्दोगन( Recep Tayyip Erdoğan)हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि चीनच्या मदतीने स्वत:ला इस्लामिक देशांचे खलिफा असल्याचेच चित्र निर्माण करीत होते. यामुळेच ते सतत भारतविरोधी वक्तव्ये करीत असतात.

काश्मीरमधील ३७० वे कलम हटवल्यानंतर तुर्की आणि मलेशिया या दोनच इस्लामी देशांनी भारताचा निषेध केला होता. तुर्कीने हा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या महासभेत उपस्थित करीत काश्मीरवर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा हक्क असल्याचे सांगितले होते. आर्थिक अरिष्टात सापडलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला मदत करण्याचे वचन त्यांनी इम्रान खान यांना दिले होते. परंतु आता तुर्कीची अर्थव्यवस्थाच मोडकळीस आल्याने तसेच विनाशकारी भूकंपामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली आहे.

इतक्या विनाशकारी संकटात देखील शहबाज शरीफ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे प्रधानमंत्री तुर्कीला भेट द्यायला( भीक मागायला) निघाले होते..पण तुर्कीने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येऊ नये असे स्पष्ट शब्दात सांगितले.

विनाशकारी, संकट काळात देखील भिकारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने गाठली बेशर्मीची हद्द :-

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने मदतीच्या नावाखाली बेशर्मीचा कळस गाठला आहे. कारण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पाकिस्तान तुर्कीच्या मदतीसाठी कटिबद्ध आहोत म्हणून पुढील महिन्यापर्यंत तुर्कीकडून कोणतेही कर्ज मागितले जाणार नाही,” अशी घोषणा केली आहे. शहबाज शरीफ यांनी असेही सांगितले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान कमी खर्चात भूकंपाचा ढिगारा उचलण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी देखील तुर्कस्तानने वाहतूक व्यवस्था आधी चांगली करणे आवश्यक आहे.

अरेरे जो देश संकटाच्या गर्तेत सापडला आहे त्या देशाकडे कर्ज मागावे कसे ? इतका साधा विचार देखील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या कद्रू मनी येऊ नये याचेच आश्यर्य वाटते..

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या या दरिद्री,भिकारी मानसिकतेची संबंध जगाला आता चीड येऊ लागली आहे इतकं मात्र निश्चित …

भारताने सर्वप्रथम मदत कार्य पोहोचवून दाखवून दिले आहे की, भारत आज आंतरराष्ट्रीय, सामरिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारताकडे G -२०, SCO ची अध्यक्षता आहे त्या नात्याने देखील भारत मोठ्या प्रमाणावर तुर्कीची मदत करत आहे आणि करणार आहे.

आता तुर्कीच्या लक्षात आलेच असेल की दोस्त कोण आणि शत्रू कोण.. कारण आता इथून पुढे या विनाशकारी संकटातून जर कोणी तुर्कीला वाचवू शकत असेल तर त्यात आत्मनिर्भर भारतचा सिहांचा वाट असेल हे निश्चित …

या भीषण, विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्या नागरिकांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली…

https://edition.cnn.com/middleeast/live-news/turkey-syria-earthquake-updates-2-9-23-intl/index.html

https://www.bbc.com/news/world-europe-64577371

https://www.thehindu.com/news/cities/chennai/chen-news/operation-dost-indias-sixth-flight-reaches-turkey-with-relief-assistance/article66488359.ece

Back to top button