ECONOMYHinduismNews

धास्ती Hindu rate of growth ची…

When men are employed they are best contented :- Urjit patel

भारतीय रिझर्व्ह बँकेचे(RBI) माजी गव्हर्नर तथा खान मार्केट गॅंग,तथाकथित लिबरल राष्ट्रविरोधी शक्तींच्या गळ्यातले ताईत श्री श्री रघुराम राजन (Raghuram rajan)यांची कीर्ती आपणास माहिती आहेच. भारतात सगळं कस वाईटच सुरु आहे, देश रसातळाला चाललाय याचा टाहो,हंबरडा भारताबाहेर मोठ्या त्वेषाने कोकलणारे म्हणून राजन कायमच चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी हिंदू ग्रोथ ऑफ रेट ( Hindu Growth Rate ) बाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारत धोकादायक पातळीच्या अगदी जवळ पोहोचला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

देशाच्या आर्थिक वाढीसाठी Hindu rate of growth प्रमुख समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणतात, खाजगी क्षेत्रातील मर्यादित गुंतवणूक, उच्च व्याजदर आणि भारताच्या विकासाची संथ गती ही यामागची प्रमुख कारणे आहेत.मला सतत असा प्रश्न पडतोय की यांना प्रतिष्ठित रिजर्व्ह बँकेचा गव्हर्नर केलं कोणी ? कारण कोरोना नंतर भारत जगात सगळ्यात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था आहे हे या कथाकथित “सेकुलर” माणसाला कोणी सांगितले नाही की काय ?

आपल्या सगळ्यांना ‘हिंदू’ शब्दात कोणत्याही प्रकारची वृद्धी होत असेल, तर आनंदच होईल. संबंध राष्ट्राचेही आज तेच मानस आहे. मात्र, रघुराम राजन यांना भीती का वाटते ते आधी समजून घेतले पाहिजे:-

मुळातच Hindu rate of growth म्हणजे काय ?

दिल्ली विद्यापीठातले अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक राज कृष्णा यांनी १९७८ साली ही संज्ञा वापरात आणली. ‘GDP’ वाढीचा मंदावलेला दर अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हे शब्द वापरात आणले. त्याकाळात म्हणजे १९५० ते १९८० च्या सुमारास भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत बिकट स्थितीत होती. या काळात आपला ‘GDP’ चा दर अवघा ३ ते ३.५ इतकाच होता. हा दर साधारणत: वाईट किंवा काहीच फरक न पडणारा मानला जातो मात्र त्याचे भयंकर परिणाम देश म्हणून भोगावे लागतात.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ,देशाच्या अर्थव्यवस्थेच्या या संथ गतीला शब्दात व्यक्त करण्यासाठी हिंदू ग्रोथ रेट (Hindu rate of growth) हा शब्द वापरला गेला. आताही हा शब्द देशाच्या कमी विकास दराचे वर्णन करण्यासाठीच वापरला जातो.

राजन यांनी हे बिनडोकपणाचे विधान ज्या आधारावर केले आहे, ते आधी समजून घेऊया., राजन यांनी भारताचे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचे ‘GDP’ च्या दराचे आकडे सादर केले, जे ४.४ टक्के होते. मुळात ‘GDP’ चा दर वार्षिक असतो. अर्थशास्त्राच्या पदवीधर विद्यार्थ्यालादेखील हे माहीत असते. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा दर १३.२ टक्के इतका होता. दुसर्‍या तिमाहीत हा दर ६.३ टक्के इतका होता व शेवटच्या तिमाहीत दर चार टक्क्यांच्या आसपास राहिला, असा अंदाज आहे. म्हणजे या आकड्यांची सरासरी काढली तर ती थोडे फार मागेपुढे झाले तरी सात टक्के इतकीच राहील. हा वेग जगातील सगळ्यात गतिमान मानला पाहिजे. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषा’च्या (IMF) अहवालानुसार, चीनचा ‘जीडीपी’ दर पुढील वर्षासाठी ४.४ तर थायलंडचा ३.७ टक्के इतका असेल, अमेरिकेचा तर चक्क २. १ इतकाच असणार असे भाकीत केले आहे.

मुळात भारतीय अर्थव्यवस्था एका रोचक वळणावर आली आहे. हे स्वत:च्या गतीने स्वत:साठी ऊर्जा निर्माण करणार्‍या संकल्पनेतल्या गाडीसारखे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुस्थितीचे निकष विषद करणार्‍या अजूनही काही गोष्टी आहेत. यात ‘gross capital formation’ म्हणजेच सकल भांडवलनिर्मितीच्या आकडेवारीकडे पाहिले पाहिजे. २०१८-१९ पासून २०२३ पर्यंत आज हा आकडा ३२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. हा आजतागायतचा सर्वांत जास्त दर आहे. ही वाढ रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या विद्यमान वृद्धीची आहे.

२०२१-२२ या वर्षात भारतीयांची सकल बचत २५ टक्के होती, आज ती ३० टक्क्या पेक्षा जास्त झाली आहे. ‘incremental capital ratio’ ही संज्ञाही भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत समजून घेतली पाहिजे. याचा अर्थ आपला उत्पादन खर्च प्रभावी झाला आहे. जी वस्तू उत्पादित करायला आपल्याला पाच रुपये लागत होते, ती आज तीन रुपयात तयार होते.

मात्र, हे सारे आकडे साक्षात ब्रह्मदेवाने जरी खाली येऊन सांगितले तरी राजन यांना ते खरे वाटणार नाहीत. याचे कारण त्यांचे सांगितलेले सत्य आणि देशाचे सत्य हे आता निराळे आहे. त्यामुळे सध्या कुडमुड्या आधारावर देशात भीती निर्माण करण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरूच आहेत. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘हा संन्याशी राज्य कसे चालविणार,’ असे म्हणून याच मंडळींनी नाके मुरडली होती. मात्र, त्याच संन्याशाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवरल्या आणि सुशासनाचा वस्तुपाठ निर्माण केला.रघुराम राजन आणि खान मार्केट गॅंगला खरी भीती या ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ची आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्यांचे काहीच देणे घेणे नाही.

Silicon Valley Bank Collapse:– 1 lakh jobs at risk,and more

आता कालचेच उदाहरण बघा ना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक ( Silicon Valley Bank ) ही दिवाळखोरीत निघाली आहे. इतकेच नाहीतर बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर बँकेची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे.अमेरिकेच्या इतिहासातील बँक बुडण्याची ही दुसरी मोठी घटना आहे यामुळे अमेरिकेत बँकिंग व्यवस्था संकटात आल्याचं चित्र निर्माण झालं असून सिलिकॉन व्हॅली बँकेच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात ७० टक्क्यांची घसरण झाली आहे. या घटनेमुळे भारतासह संपूर्ण जगावर काही वित्तीय संकट उभे राहणार नाही. पण राजन यांच्या सारखे कथाकथित स्वतःला विद्वान समजणारे पुन्हा एकदा जगावर मंदीचा धोका निर्माण झाला आहे.असा टाहो फोडायला मोकळे आहेत.

हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण आणि आत्मबलाचे जागरण करून सत्तारूढ झालेला आजचा पंतप्रधान खाली कसा उतरवायचा, हा राजन आणि टूलकिट गँगसमोरचा खरा प्रश्न आहे. हेच राजन यांच्या मुक्ताफळांतून अधोरेखित होते..

बरं झालं, आमच्या पूर्वजांनी हिंदू ग्रोथ रेट निवडला म्हणून आज आम्ही ७५ वर्षे टिकून राहिली आणि आज प्रचंड वेगाने प्रगती करत आहोत. कोरोना काळातील ६५ दिवसांच्या कडक लॉकडाऊन मध्ये १३० कोटीच्या देशात एकही भूकबळी गेला नाही, हा आहे आमचा हिंदू ग्रोथ रेट.

जर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा इस्लामी ग्रोथ रेट आम्ही निवडला असता तर आज आमचे काय हाल झाले असते… याचा विचार रघुराम राजन जरूर करतील अशी भाबडी आशा आहे…

The true tragedy that the poor face is that they do not have enough aspirations. – Gopal krishna gokhale..

https://www.gadgetsnow.com/slideshows/silicon-valley-bank-collapse-1-lakh-jobs-at-risk-why-tech-startups-are-most-hurt-and-more/photolist/98594621.cms

https://www.mahamtb.com/Encyc/2023/3/10/Editorial-on-Raghuram-Rajan-Statement-Hindu-Growth-Rate.html

Back to top button