News

“डरी हुई कौम”चा भररस्त्यात नंगानाच

नुकताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला एक व्हिडीओ बघण्यात आला. त्यामध्ये एक मुस्लिम तरुण दोन तरूणींना बाईकवर बसवून अत्यंत धोकादायक पद्धतीने स्टंट (dangerous Stunt) करताना दिसत आहे. या बाइकस्वाराला रविवारी अटक करण्यात आली आहे. पोलिस अजूनही व्हिडिओतील दोन मुलींचा शोध घेत आहेत.

मुश्ताक अन्सारी या सोशल मीडिया युजरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या स्टंटचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. मुंबईच्या रस्त्यावर कोणत्याही संरक्षक उपकरणाशिवाय (Helmet) अत्यंत धोकादायक स्टंट करणाऱ्या बाइकर्सचे अनेक व्हिडिओ अन्सारींनी आपल्या “पॉटहोल वॉरियर फाउंडेशन” (Pothole Warriors Foundation) या ट्विटर हँडल वर टाकले आहेत. त्यांनी हा धक्कादायक व्हिडीओ मुंबई वाहतूक पोलिसांना टॅग केल्यानंतर, हा व्हिडिओ व्हायरल झाला .

त्यानंतर, वाहतूक पोलिसांनी बीकेसी (BKC) पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे), ३३६ (मानवी जीवन किंवा इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे) आणि ११४ (प्रवृत्त करणे) अन्वये तिघांवर गुन्हा दाखल केला.

झोन ८ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, “फैय्याज अहमद अजीमुल्ला कादरी” (२४, रा. वडाळा) असे या बाईकस्वाराचे नाव आहे. “त्याच्यावर यापूर्वी देखील वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात तसेच अँटॉप हिल ( antop hill) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना हवा असल्याने तो कायम पत्ता बदलत राहिला. आम्ही त्याचा साकीनाका येथील सध्याच्या पत्त्यावर शोध घेतला आणि त्याला तेथून अटक केली,” असे त्यांनी सांगितले.

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या हिस्ट्रीशीटरला; या एका स्टंटमुळे पोलीस कोठडीची हवा खावी लागली. अन्यथा प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. मात्र ज्या शिताफीने मुंबई पोलिसांनी(MUMBAI POLICE) त्याचा बाईक नंबर व्हिडिओवरून शोधून काढून आरोपीला सापळा रचून अटक केली त्याबद्दल मुंबई पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

एकीकडे स्वतःला “डरी हुई कौम” म्हणायचे, दुसरीकडे मध्यरात्री भररस्त्यात असा नंगानाच घालायचा हा अधिकार तुम्हाला दिला कोणी ?

मुळात आम्ही देशाचा कायदा मानत नाही ही उद्दामपणाची मानसिकता या स्टंटच्या मागे आहे. कायद्याने फार फार तर काय कारवाई होईल? हेल्मेट न घातल्याबद्दल व ट्रिपल सीट गाडी चालवल्याबद्दल दंड होईल. इतकेच ना? भरून टाकतो दंड पण देशाचा कायदा मानणार नाही. दंड भरला की परत एकदा असा स्टंट करायला आपण मोकळे, ही या “डरी हुई कौम”ची खतरनाक मानसिकता आहे. मात्र कायम हातावर तुरी देऊन पळणाऱ्या या हिस्ट्री शीटरला मुंबई पोलीस कायमची अद्दल घडवतील असा विश्वास आहे.

त्याच्याबरोबर त्या दुचाकीवर स्टंटमध्ये सहभागी असलेल्या दोन्ही तरुणींना देखील मुंबई पोलिसांनी शोधून काढावे व त्या पुन्हा असा स्टंट करायला धजावणार नाही अशी कायमची अद्दल घडवावी.

आज देशात मोठ्याप्रमाणात रस्त्यांचे जाळे उभारणीचे काम सुरु आहे. आधी रस्ता नाही म्हणून कोकलायचे, नंतर रस्ता बांधल्यावर त्यावर “डरी हुई कौम” ने नंगानाच घालायचा आणि दुर्दैवाने हे स्टंटबाज अन्य वाहने अथवा पादचाऱ्यांना जाऊन धडकल्यास होणाऱ्या वित्तहानी आणि मनुष्यहानीला सरकार जबाबदार… वाह रे सेक्युलॅरिज्म (secularism)!!

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो :- रोड पर मस्ती जान नहीं सस्ती

Back to top button