NaxalismNews

नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ४

नक्षलवादी चळवळीचा विस्तार:-

चारू मुजुमदार यांच्या मृत्युनंतर काही काळ महादेव मुखर्जी ज्यांनी चळवळीवर नियंत्रण प्रस्थापित केले. परंतु कालांतराने नक्षलवादी चळवळ आंध्र, बिहार, पं. बंगाल, पंजाब, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र या राज्यात अगदी लहान लहान गटात विखुरल्या गेली तेव्हा २० एप्रिल १९८० ला कोंडापल्ली सितारामय्या यांच्या नेतृत्वाखाली “Communist Party of India Manast-Leninist peoples war group’ (पिपल्स वॉर ग्रुप) या संघटनेची स्थापना झाली. बिहारमध्ये The Maoist Communist Centre (MCC) अमूल्य सेन, कानी चटर्जी, प्रशांत बोस यांनी तर पंजाबमध्ये शमशेर सिंग शेरी यांनी २००३ पर्यंत त्या त्या राज्यात स्वतंत्र नेतृत्व केले.

‘दंडकारण्य’

एकीकृत नक्षल संघटन ‘दंडकारण्य’ एक आंतरराज्यीय नक्षली प्रभाव क्षेत्र

भारतातील मध्यवर्ती भागात विविध राज्यांना लागून दंडकारण्याचा प्रदेश ६,३०,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्या प्रदेशाची १८०० कि. मी.लांबी, ३५० कि.मी. रुंदी असलेला हा नक्षली ‘रेड कॉरिडॉर’ ‘नेपाळपासून केरळपर्यंत’ (पशुपती ते बालाजी) पसरलेला आहे. या दंडकारण्य प्रदेशाचा मध्यभाग बहुतांश महाराष्ट्र, ओडीसा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांच्या सीमाबद्ध आहे. पटकोनामध्येच आहेत. रेड कॉरिडोरच्या संपूर्ण प्रदेशात आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. या भागामध्ये ब्रिटिश काळापासून लोकसंवाद, नागरी सुविधा झाल्या नसल्याचे दिसून येते. असा १०,००० चौरस किमीचा ‘अबुझमाडौंचा परिसर त्यांचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्र ते झारखंड या सहा राज्यांच्या सीमारेषांच्या षट्कोन जुळलेल्या अरण्याला नक्षलवादी ‘दंडकारण्य प्रदेश’ संबोधतात. पशुपती ते बालाजी या दंडकारण्य प्रदेशात नक्षलवादी चळवळीने आपला प्रभाव निर्माण केला होता.

भारतात नक्षलवादी चळवळीने आपले विस्तार क्षेत्र वाढवत असतांना जनाधार प्राप्त करण्यासाठी त्या त्या राज्यातील स्थानिक समस्या कोणत्या आहे त्याला प्राधान्य देऊन नक्षलवादी चळवळीची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न केला. पं.बंगाल, आंध्रप्रदेशातील जमीनदारीचा प्रश्न, बिहारमध्ये अनुसूचित जातीजमाती व सवर्णाचा प्रश्न, महाराष्ट्रात तेंदूपत्ता व बांबू संकलनाचा प्रश्न, मध्यप्रदेश-छत्तीसगडमध्ये जल- जंगल-जमीन या प्रश्नाबाबत आदिवासी व स्थानिक जनतेला आपलेसे करून त्यांचा विश्वास संपादन करत चळवळीची व्यापकता वाढवित्ती. परंतु स्थानिक प्रश्नाला न्याय मिळाल्यानंतर नक्षलींनी आपले प्रभाव क्षेत्र कायम ठेवण्यासाठी त्यांच्या हितसंबंधाच्या विरुद्ध जणाऱ्या स्थानिक आदिवासींची हत्या सुरु केली. जेणेकरून त्या भागातील जनतेमध्ये नक्षल चळवळीला विरोध निर्माण होणार नाही.

ज्या सामाजिक आर्थिक कल्याणाच्या आधारावर नक्षल चळवळ उभी केली त्या नक्षली चळवळीला ‘ना राहिला विचार, ना राहिली विचारधारा’ फक्त करोडो रुपये खंडणी वसूल करून एक भांडवलवादी चळवळ निर्माण झाली आहे. जी चळवळ भांडवलवादाच्या विरोधात आवाज उठवत होती ती नक्षली चळवळ आज आदिवासींचे शोषक म्हणून उभी राहिली आहे. त्या आदिवासी जनतेचे स्वातंत्र्य हिरावून आपल्या ‘जनताना सरकार’ (पर्यायी शासन) जन मिलीशियाच्या माध्यमातून समांतर सरकार स्थापन केले.

एप्रिल २०१८ च्या केंद्रीय गुप्तचर अहवालानुसार भारतातील सात राज्ये अतिसंवेदनशील असून त्यात बिहारमधील औरंगाबाद, गया, जमुई, सिताभरी, सिमांधामध्ये विशाखापट्टम, छत्तीसगड, राजस्थान बस्तर, बिजापूर, दन्तेवाडा, फनेर, राजनांदगांव, सरगुजा, कोटभर नारायणपूर, तेलंगाणामधील बामश्री, कोडागुडम, ओरिसामधील मलखनगिरी, कोटपुरी, झारखंडमधील रांची, हजारीबाग, लोहानंदा, पालाम, बतरा, गरबा, सिमदेगा, लतेचरा, गिरीधह कोडरमा, बोकारो, धनबाद, पूर्व सिंगभू, पश्चिम सिंगभूम केली, रामगड, साटीकेला तर महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात आपला प्रभाव निर्माण केला आहे.

नक्षलवादी चळवळ आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटन संबंध :

भारतात वाढलेली नक्षलवादी चळवळ ही देशभरात १२ घटक राज्यात आहे. ती नेपाळ, बांग्लादेश, म्यानमार, पाकिस्तान व श्रीलंकेतसुद्धा पसरली आहेत. ‘नक्षलवाद्यांना परदेशी शस्त्रास्त्रांची मदत मिळत असून हे हिमनगाचे केवळ टोक असल्याचे’ ठाम विधान २०१० मध्ये केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील ज्यांनी केले आहे. नक्षलवाद्यांचे देशातील विविध दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे पुढे आले.

उदा. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर- ए-तोयबा, नेपाळमधील माओवाद्यांशी संबंध आहेत. तसेच तामिलनाडू मधील एलटीटीईशी असणारे संबंध, सिमी, लष्कर-ए- तोयबा (एलईटी), हुजी यांच्यात गठबंधन (टायअप) बंदी असलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) यांच्याबरोबर नक्षलवाद्यांनी संबंध प्रस्थापित केले असून त्यांचा पाया दक्षिण भारतात मजबूत करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आरआयएमचे (रिव्होल्युशनरी इंटरनॅशनल मुव्हमेंट) सदस्य- आरआयएम ही संघटना जगातील नक्षलवादी गटांना प्रोत्साहन देते व मदत करते. भारतातील नक्षलवाद्यांनी फिलिपिन्सच्या लेफ्ट विंग एक्स्ट्रिमिस्टबरोबर आणि त्यांच्याद्वारे दक्षिणपूर्व आशियातील इतर गटांबरोबर संबंध वाढविले आहेत.

( क्रमशः )

Back to top button