NaxalismNews

नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ५

नक्षलवादी चळवळीची संघटनात्मक रचना..

नक्षलवादी संघटनेची रचना केंद्रीय स्तरापासून तर स्थानिक स्तरापर्यंत निर्माण करण्यात आली असल्याचे वर्गीकरणावरून दिसून येते.

-नक्षलवादी चळवळीची संघटनात्मक बांधणी

नक्षलवादी चळवळीच्या संघटनात्मक बांधणीमध्ये केंद्रीय समिती, केंद्रीय विभागीय समिती, विशेष परिक्षेत्र समिती किंवा राज्य समिती सब झोनल ब्युरो, डिव्हिजन कमिटी, एरिया कमिटी यांची स्थापना १९९४ ला करण्यात आली. एरिया कमिटीवर डिव्हिजन कमिटीचे ‘संघम’ म्हणतात. नियंत्रण असते.

पॉलिट ब्युरो :-

पॉलिट ब्युरोमध्ये वेगवेगळ्या विभागाला प्रतिनिधित्त्व देण्यात आलेले आहे. जसे पूर्व विभाग-उत्तर विभाग- मध्य विभाग-दक्षिण- पश्चिम विभाग (प्रत्येक विभागाखाली ४-५ राज्ये असू शकतात.) देशातील १७-२० राज्य विभाग असून त्या राज्य विभागांच्या हाताखाली प्रचार विभाग, शस्त्र तयार करणारे, खंडणी वसूल करणारे, गुप्तहेर महिला, बाल विभाग काम करतात. नक्षलवाद्यांचे विचारवंत, नेतृत्व आणि शस्त्रधान्यांवर नियंत्रण ठेवणारा विभाग कार्यरत असतो.

-नक्षलवादी चळवळीची सेंटर मिलिटरीची पायाभूत बांधणी:-

नक्षलवादी चळवळीच्या सेंटर मिलिटरीच्या रचनेनुसार पायाभूत बांधणीचा आधार हा ग्रामीण भाग आहे. तेव्हा आपल्या चळवळीचा पाया स्थानिकस्तरापासून, पक्का करण्याचे कार्य नक्षलवादी संघटना करतांना दिसून येते. सर्वात स्थानिकस्तरावर कार्य करणाऱ्या समूहाला ‘संघम‘ म्हणतात.

संघम नक्षली :

‘दलम’ला मदत करणारा स्थानिक गट ‘संघम’ असतो. संघम म्हणजे गावात राहणारा ‘हेर’ होय. हा संघमचा गट गावात कोण येतो, कोण जातो, पोलीस केव्हा येत आहे, कोणी नवीन व्यक्ती गावात आला का? कोणाकडे आला असेल याची सर्व माहिती नक्षलवाद्यांना पोहचविण्याचे कार्य ‘संघम‘ चे सदस्य करतात.

नक्षलवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रात ‘संघमचे कार्यकर्ता’ विखुरलेले आहेत. कारण नक्षलवाद्यांचा पोलिसांना विरोध आहे. गावाचा ‘गायता‘ (पोलीस पाटील) हा शासनाचा माणूस झाल्यामुळे त्याला शासकीय कर्मचाऱ्यांना मदत द्यावी लागते उदा. पोलीस, गार्ड, ग्रामसेवक, तलाठी, त्यामुळे पोलीस पाटलाला नक्षलवादी विरोध करतात. कारण प्रस्थापित लोकशाही व्यवस्थेला नक्षलवाद्यांचा विरोध आहे. तेव्हा आता गावाचा कारभार आमचे माणसे पाहतील आणि न्यायनिवाडा करण्याचे काम ‘संघम‘ करतील, असा प्रचार ते गावागावात करतात. गावातील कोणताही संघर्ष पोलिसाऐवजी गावातील पंचायत (संघम ) च्या माध्यमातून सोडविला पाहिजे, असे नक्षलवादी गावकऱ्यांना सुचवितात.

-नक्षली संघम पेक्षा वरच्या स्तरावर कार्य करणारा गट म्हणजे दलम :-

दलम

दलम म्हणजे संघमने पुरविलेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करणारा शस्त्रसज्ज आणि गणवेशात वावरणारा सदस्य म्हणजे दलमचा कार्यकर्ता होय. नक्षलवाद्यांच्या प्रत्येक दलममध्ये एक कमांडर असतो, एक डेप्युटी कमांडर व एक पोलिटीकल प्रपोगंडीस्ट असतो. त्यांच्या आज्ञेचे पालन विनातक्रार करणे प्रत्येक दलमच्या सभासदाकडून अपेक्षित असते, दलम कमांडरला आपल्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळणे बंधनकारक असते. धोरणात्मक निर्णय दलममध्ये घेतले जात नाही. धोरणात्मक निर्णय केंद्रीय समिती घेते. धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी दलमकडून अपेक्षित असते. दलमची संख्या कमी जास्त होऊशकते. जर नक्षलवाद्यांची संख्या (माणसे) जास्त झाली तर दलमची संख्या वाढते. दलमची संख्या सर्वांवर बंधनकारक असतात. निश्चित नसते. आपल्या सोयीनुसार दलमची संख्या कमी जास्त होते,

सद्य स्थितीत नक्षलवादी चळवळीत ५५-६०% सहभाग महिलांचा आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध झाली आहे. चळवळीत महिलांचे लैंगिक शोषण होते. असे आत्मसम्पित नक्षलवादी महिलांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

दलममध्ये भरती होण्यासाठी ज्याच्याकडे दोन मुले किंवा मुली असेल तेव्हा दोनपैकी एकाला स्वतंत्र आंदोलनासाठी आम्हाला द्या अशी मागणी नक्षलवादी करतात.

प्लाटून नक्षली :

दलमचा वरचा गट प्लाटून असतो. दलमकडून बातम्या प्लाटूनपर्यंत पोहचवितात. प्लाटूनकडे दलमच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे असतात. प्लाटूनमधील सदस्य बटुकधारी असतात. जंगलात लपून चालणे, बचाव करतांना पळून जाणे, अचानक हल्ला करणे, अचानक पोलिसांचा हल्ला झाला तर त्याला तोंड देणे, हल्ल्याचा सामना करणे, चकमकी घडवून आणणे इ. कार्य प्लाटूनकडून केले जाते.. कंपनी नक्षली : प्लाटूनच्या वर ‘कंपनी’ असते. हा गट कारवाई सोपवितो.. करतो. मोठी मोहीम करायची असेल तर, पाच-सहा प्लाटूनचे गट एकत्र येऊन तयार झालेली ‘कंपनी’ कार्यवाही करते. कपनी कार्यवाहीचे वेळी ११५०-२०० नक्षलवादी असतात. कंपनी नेहमी मोठी कारवाई करते. म्हणजेच पोलिसीवर मोठी फायरिंग, बॉम्बस्फोट, सुरुंग स्फोट, वाहनाचे अपहरण आदी कार्यवाही कंपनी करते..

नक्षली विभागीय समिती :

विभागीय समितीच्या सहामाही बैठकीनंतर एखादी नवी माहिती मिळाली, तर मोठी हिंसक कारवाई शक्य होत असेल तर तातडीने सर्वांना निरोप देऊन एकत्र बोलाविले जाते. मात्र कोणताही निर्णय घेण्या आधी राज्य समितीची संमती मिळवावी लागते. हे निरोप देण्याचे काम अनेकदा खबरे करतात. विश्वास खबरे नसतील तर दलम सदस्यच साध्या वेषात जाऊन निरोप देतात. विशिष्ट काळ व वेळेत कोणते दलम कुठे असतील यांची माहिती सर्व दलमला असते. २००८ पर्यंत एकाच जंगलात असलेल्या दोन दलमला एकमेकांशी संपर्क साधण्याची परवानगी नव्हती, आता ती देण्यात आली आहे. याबाबत निर्णय व त्यासंबंधीचा कार्यक्रम बैठकीमध्येच ठरविण्यात येतो. त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नसतो.

विभागीय समितीचे आदेश-

संघटनात्मक बांधणी व इतर संबंधित चर्चा करण्यासाठी विभागीय समितीची दर सहा महिन्यांत बैठक होत असते. त्यासाठी सर्व दलम हजर असतात. या विभागीय समितीच्या बैठकीमध्ये पुढील सहा चर्चा करून निर्णय घेत असते. या बैठकीत नक्षलवादी चळवळीला मदत करणाऱ्याविषयी चर्चा केली जाते. जे चळवळीला मदत करत नाही त्या गावांची व व्यक्तीची यादी तयार केली जाते.

या विभागीय बैठकीमध्ये कोणाला कोणत्या दलमने मारायचे हे सुध्दा बैठकीत ठरले जाते. ठार करण्याची वेळ निश्चित केली जात नाही. सहा महिन्यामध्ये प्रत्येक दलमला ५ ते १० नक्षलवाद्यांच्या भाषेत “वर्गशत्रू’ व्यक्तींना ठार करण्याचे लक्ष्य दिले जाते. हे ठार मारण्याचे काम नव्याने दाखल झालेल्या सदस्यांकडून करवून घेण्यात येतात. कारण त्याला ठार मारण्याचा अनुभव या घटनेमुळे प्राप्त होत असतो, अशी विभागीय सचिवांची धारणा आहे. विभागीय बैठकीमध्ये दलम चळवळीला साधनसामुग्री व शस्त्रसाठा यांचा आढावा घेतला जातो. दलम कमांडर खंडणीद्वारे गोळा केलेले पैसे विभागीय समितीकडे पाठवले जातात.

(क्रमशः)

Back to top button