IslamNewsWorld

अमंग द मॉस्क्स : भाग ३

ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास..

ब्रॅडफर्ड (bradford)

त्यानंतर लेखक ब्रॅडफर्ड या शहरात येऊन पोचतो. ब्रॅडफर्डमधल्या मशिदींचा अधिकृत आकडा हा १०३ आहे. तेथील उपाहारगृहं, क्लब्ज, बार, डिस्को आता बंद झाली आहेत. १९९१ आणि २००१ साली शहरात झालेल्या कुप्रसिद्ध दंगलींनंतर शहरातील BMW चं मोठं शोरूम बंद झालं. इतकंच नव्हे तर कुठलाही मोठा कारचा ब्रँड आता त्या शहरात प्रवेश करत नाही. खुद्द पोलीस स्टेशनच्या बाहेर सुस्वागतम/welcome च्या ऐवजी ‘खुशामदीद‘ लिहिलेले उर्दू फलक लागलेले आहेत.

वर्किंग मेन्स क्लब च्या जागी आता लाला’ज वेडिंग हॉल आलाय तर मेलबर्न पबची जागा एशियन फर्निचर शॉपने घेतली आहे. एका जुन्या पबच्या जागी शहाजलाल लतिफीया मशीद आहे तर अन्य एका पबच्या जागी अल-खिद्र कार्पेट्स चं दुकान उघडण्यात आलंय. मेन्स क्लबच्या जागी आता नौशाही जवीया मशीद आहे तर डॉल्स अँड डान्सिंग क्लब च्या ठिकाणी धांगरी शरीफ मशीद उभं राहिलंय.

या सगळ्या मशिदींमध्ये काश्मीर, पॅलेस्टाइनमध्ये मुस्लिमांवर होत असलेले तथाकथित अत्याचार सांगून तरुणांची माथी भडकावण्याची कामं नित्यनियमाने सुरु आहेत. किताब-अत तवहीद हे खुद्द सौदी सरकारने बंदी घातलेलं इस्लाम आणि सलाफीविषयक जहाल पुस्तक इथल्या मशिदींमध्ये राजरोसपणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

गरीब कुटुंबियांना सरकारतर्फे दिला जाणारा गरिबी भत्ता हा त्या कुटुंबातील मुलांपर्यंत पोचत नाही. हे सरकारी पैसे काश्मीरमध्ये पाठवून काश्मीरमध्ये एक तर नवीन दुकानं उघडली जातात किंवा टॅक्सीज घेतल्या जातात. इथल्या मुलांचे खाण्यापिण्याचे, कपड्यांचे हाल मात्र होतंच राहतात. अपंग मुलांसाठी देण्यात येणार सरकारी भत्त्याचाही इथले इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी लोक असाच गैरवापर करतात. इथल्या अनाथ, अपंग मुलासाठी देण्यात आलेले सगळे पैसे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवले जातात.

२०१६ मध्ये सलमान रश्दी यांचं पुस्तक ब्रॅडफर्डच्या रस्त्यावर जाळण्यात आलं. त्याविरुद्ध लेख लिहून आवाज उठवणाऱ्या ‘ड्रमंड रोड स्कुल’ या शाळेचे मुख्याध्यापक श्री हनीफर्ड यांना तडकाफडकीने नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. ब्रॅडफर्डचा तत्कालीन महापौराचं नाव ‘मोहम्मद अजीब’ होतं हा खचितच योगायोग नसावा. त्या शाळेला भेट देण्याच्या निमित्ताने तिथे पोचलेल्या लेखकाला अत्यंत धक्कादायक अनुभव आले.

‘ड्रमंड रोड स्कुल’ चं आता IQRA असं नामांतर झालं आहे असं लेखकाला कळलं. दर्शनी खिडकीवर ‘Free Palestine’ असं लिहिलं असलेल्या त्या शाळेच्या शेजारी आता काश्मिरी हॉल असून दुसऱ्या बाजूला पाकिस्तनी स्टोर आहे. शाळेच्या समोर मशीद बिलाल मदरसा असून मागच्या बाजूला अल मरकज उल इस्लामी ही शाळा सुरु झाली आहे.

IQRA हा उर्दू शब्द असून कुराणात त्याचा उल्लेख आहे. त्याचा अर्थ ‘वाच‘ असा असून ही मोहम्मद पैगंबरांना कुराण वाचण्याची करण्यात आलेली आज्ञा आहे हे जेव्हा लेखक आपल्याला सांगतो तेव्हा खरा धक्का बसतो. ‘ड्रमंड रोड स्कुल’ चं IQRA असं नामकरण का झालं असावं याचं उत्तर थेट शाळेकडूनच जाणून घेण्याचं लेखक ठरवतो. दुसऱ्या दिवशी शाळेच्या दूरधवनी क्रमांकावर फोन करून “शाळेचं नामकरण IQRA असं उर्दू भाषेत का झालं?” असा थेट प्रश्न केल्यावर मिळणारं उत्तर अजूनच चक्रावून टाकणारं असतं. शाळेच्या मते IQRA हा उर्दू शब्द नसून ते Improvement, Quality, Respect and Achievement याचं लघुरूप आहे. “उर्दू IQRA शब्दाशी याचा काहीच संबंध नाही का?” अशी थेट पुन्हा एकवार विचारणा केल्यावर शाळेचं उत्तर असतं की “ही इस्लामी शाळा नसली तरी इथे शिकणारे अधिकतर विद्यार्थी हे मुस्लिम आहेत. त्यामुळे IQRA या शब्दाचा दोनपैकी कुठलाही अर्थ आपण घेऊ शकतो.” !!!

लेखक :- हेरंब ओक

(क्रमशः)

Back to top button