CultureNewsSpecial Day

निर्दलण्या त्या नरसिंहाचा होऊ दे अवतार..

असत्यावर सत्याचा “विजय” होतोच..

आज “नृसिंह जयंती” (Narsingh,Narasimha jayanti) हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय किंवा असत्यावर सत्याचा विजय या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे.

नृसिंह अवतार हा विष्णूच्या (Bagwan vishnu) दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच जगत्पालक नारायणांनी नृसिंह अवतार घेतला. भगवान नरसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहेत. अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नृसिंह कठोर शिक्षा देतात.वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. आपला भक्त प्रल्हाद याच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर धारण करून राक्षसांचा राजा हिरण्यकशिपू याचा वध केला होता. म्हणूनच या दिवशी नरसिंह जयंती साजरी केली जाते.

कश्यप ऋषींच्या दोन मुलांपैकी एकाचे नाव हिरण्यकश्यपू (hiranyakashipu) होते. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून अनेक वर मागून घेतले होते. हे वरदान होते आपल्या मृत्यूबद्दल. आपल्या मृत्यू माणसाकडून नाही व पशू कडून देखील नाही; दिवसा नाही व रात्री नाही; जमिनीवर नाही व आकाशात नाही; घरात नाही व घराबाहेर नाही; शस्त्राने नाही व अस्त्राने नाही असे वरदान मागितले. ब्रह्माजी “तथास्तु” म्हणाले. हे वरदान प्राप्त करून तो स्वतःला अमर समजू लागला. स्वत:ला देव समजू लागला आणि प्रजेवर अनंत अन्याय करू लागला.

हिरण्यकश्यपूला प्रल्हाद( prahlad) नावाचा मुलगा होता. तो भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. हिरण्यकश्यपूला ही गोष्ट कळताच त्याने प्रल्हादला समजावले. त्याने आपल्या मुलाला सांगितले की मीच देव आहे, त्याने फक्त त्याचीच पूजा करावी. परंतु हिरण्यकश्यपूने वारंवार ताकीद दिल्यानंतरही प्रल्हादने भगवान विष्णूंवरील आपली भक्ती सोडली नाही.

हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला हातात घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले. होलिकाला आशीर्वाद मिळाला होता की अग्नी तिला जाळू शकत नाही.होलिकेला अग्नीचं वरदान असल्याने ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली मात्र प्रल्हादाच्या मुखी विष्णूनाम असल्याने तो महाभयंकर अग्नीतून वाचला आणि होलिका मात्र मरण पावली.

शेवटी क्रोधाने उद्विग्न झालेल्या हिरण्यकश्यपूने आपला मुलगा प्रल्हाद याला एका खांबाला बांधले आणि त्याला मारण्यासाठी तलवार काढली आणि म्हणाला, मला सांग तुझा विष्णू कुठे आहे, या “चराचरात विष्णू “आहे असं प्रल्हाद म्हणाला. या महालातल्या खांबातही विष्णू आहे का? असा प्रश्न हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला केला. त्यावर प्रल्हाद “हो” म्हणताच, हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लाथ मारली.खांबाला लाथ मारताच त्यातून अक्राळ विक्राळ नृसिंह प्रकट झाला. हिरण्यकश्यपूचा मृत्यू माणसाकडून नाही व पशु कडून नाही म्हणून अर्धा मानव व अर्धा सिंह अशा नरसिंहाच्या रूपात परमात्मा प्रकट झाला आणि त्याने आपणच दिलेले बाकीचे वर पाळून दिवसा नाही व रात्री नाही म्हणून संध्याकाळी; घरात नाही व घराबाहेर नाही म्हणून उंबऱ्यावर; आकाशात नाही व जमिनीवर नाही म्हणून आपल्या मांडीवर घेऊन; शास्त्राने नाही व अस्त्राने नाही म्हणून आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला. म्हणून या दिवसाला नृसिंह जयंती असं ओळखलं जातं.

https://hindi.latestly.com/lifestyle/festivals-events/narasimha-jayanti-2023-messages-quotes-whatsaapp-wishes-facebook-greetings-to-celebrate-this-festival-1793246.html

भगवंताच्या या लीलेचे तात्पर्य म्हणजे जो आपल्याला वर देतो तो वेळप्रसंगी, अत्याचारांची परिसीमा होत असेल तर आपण दिलेले सगळे वर पाळून प्राण देखील घेऊ शकतो.

हिरण्यकश्यपू जगी मातले
धर्मावरती घालती घाले
निर्दलण्या त्या नरसिंहाचा
होऊ दे अवतार
हिंदू अस्मिते हिंदू देवते
तव हो जयजयकार।।

संविधानानेही(samvidhan) आपल्याला काही मूलभूत अधिकार अर्थात एका अर्थी वर दिले आहेत. मात्र मानवतावादी, लिब्रान्डु, ह्यूमन राइट्सवाले, जिहादी, नक्षलवादी माओवादी, हिंदूद्वेषी वेळोवेळी संविधानाने दिलेले वर वापरून हिंदू समाजाची प्रचंड कोंडी करतात. भक्त प्रल्हाद जसा हिरण्यकश्यपूच्या जाचाने होरपळून निघाला होता तसेच हे हिंदू समाजाला होरपळून टाकतात. पण या सर्व मंडळींनी निक्षून स्मरणात ठेवावे कि, जेव्हा पापाचा अतिरेक होतो तेव्हा संविधानाने दिलेले वरदान हे तुम्हाला नेस्तनाबूत करायला देखील समर्थ आहे.

मतदान हे संविधानाने दिलेले अमूल्य असे वरदान आहे. आज पर्यंत एकगठ्ठा मतदानाच्या जोरावर तुम्ही हिंदूंचा तेजोभंग केला. आता याच वरदानाचा वापर करून हिंदू समाजाने तुम्हाला नेस्तनाबूत करून टाकले आहे.

शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये अशा उदात्त सिद्धांतावर आधारलेली आपली न्यायव्यवस्था ही संविधानानेच(constitution) दिलेली एक देणगी आहे. मात्र या न्यायव्यवस्थेच्या पदराआड तुम्ही हिंदू समाजाची कायम कोंडी करत आलात त्याच न्यायव्यवस्थेने हिंदू समाजाने दिलेला पुराव्यांचा सन्मान राखून राम जन्मभूमी मंदिराच्या निर्माणाचा मार्ग प्रशस्त केला. त्याच न्यायव्यवस्थेने अफजल गुरू आणि याकूब मेमन या देशद्रोह्यांना फासावर लटकवले.

हत्या करूनही जामिनावर उजळ माथ्याने फिरणाऱ्या आणि नवीन हत्या करण्यासाठी सज्ज झालेल्या नराधम समाजकंटकांसाठी पोलिसांनी शोधून काढलेले न्यायसंगत “एन्काऊंटर“चे हत्यार हे नरसिंहाच्या तीक्ष्ण व अणकुचीदार नखांसारखेच हत्यार आहे. काश्मीर मधील क्रूरकर्मा अतिरेकी बुरहान वाणी असो किंवा वीरप्पन असो… संविधानाच्या बुरख्याआड पापाचा अतिरेक होतो तेव्हा त्याच संविधानाच्या आधारे न्याय संगत एन्काऊंटर देखील अटळ असतात…

लँड माफियांच्या अवैध संपत्तीवर चालणारे “बुलडोझर” हे देखील आधुनिक काळातील नरसिंहाने प्रकट केलेली आपली अणकुचीदार नखेच आहेत…

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की, आधुनिक काळातील देशद्रोही हिरण्यकश्यपुंचा वध करण्यासाठी त्या भगवंताच्या विलोभनीय नृसिंह रूपाची आराधना आवश्यक व समयोचित आहे.

देने वाला जब भी देता
पूरा छप्पर फाड़ के देता
लेने वाला जब भी लेता
पूरी थप्पड मार के लेता…

आणि देने वाला व लेने वाला एकच असतो एवढे ध्यानात असू दे…

Back to top button