ChristianityNews

“मणिपुर हिंसाचार – चर्चचे रक्तरंजित स्वार्थकारण, अर्थकारण आणि राजकारण” !

मणिपूर(manipur) सध्या हिंसाचाराच्या (manipur violence) वणव्यात जळतो आहे. मणिपुरी वैष्णव हिंदू असलेल्या मैतेई समुदायाला (५३% लोकसंख्या) अनुसूचित जनजातीच्या दर्जा अर्थात ट्रायबल स्टेटस मिळावा म्हणून गेली कित्येक वर्षे राज्यात आंदोलने आणि कायदेशीर चळवळी सुरु आहेत. अन्य दोन समुदाय तांगखुल आणि अन्य नागा उपजाती (२४% लोकसंख्या) आणि कुकी-झोमी (कुकी-चिन-मिझो जातीय गट) (१६% लोकसंख्या) या दोन ख्रिश्चन बहुल जाती आधीच ट्रायबल गटात मोडतात, त्यामुळे मैतेई वैष्णव हिंदू समुदायाला ट्रायबल स्टेटस (एसटी स्टेटस) देण्याला चर्च प्रणित सगळ्या ख्रिश्चन समुदायांचा पराकोटीचा विरोध आहे.

वैष्णव मैतेई हिंदू –

मणिपुरी वैष्णव हिंदूंची (vaishnav panth) अन्य हिंदूंप्रमाणेच शेकडो-हजारो वर्षांची उन्नत संस्कृती आहे. कृष्णभक्तीच्या अवतीभोवती फिरणारी हि अतिशय प्रगल्भ, प्रगत अशी जात आहे. आणि ब्रिटिश शासन समर्थित चर्चच्या २०० वर्षांच्या सगळ्या गुंडागर्दीला मैतेई हिंदू पुरून उरले आहेत. त्यांनी २० वर्षांपूर्वी स्वतःच्या भाषेला स्वतःची लिपी तयार करून ती आता दैनंदिन वापरात आणलेली आहे. नसानसात भिनलेली कृष्णभक्ती, गावागावात रुजलेली क्रीडासंस्कृती आणि हाडाची लढाऊ वृत्ती यामुळे अख्ख्या पुर्वांचलात मणिपुरी हिंदू उठून दिसतात. भारतीय क्रीडा इतिहासात या चिमुकल्या राज्याने आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत हजारो पट अधिक पदके आजपर्यंत मिळवलेली आहेत.

अशा मैतेई हिंदूंना ट्रायबल स्टेटस मिळून त्यांनी आपल्या आरक्षणात वाटेकरी होऊ नये आणि आरक्षणापासून वंचित मैतेई हिंदू आपल्या धर्मांतरणाच्या जाळ्यात अलगद ओढले जावेत यासाठी चर्च प्रणित संघटना सतत मैतेई हिंदूंना ट्रायबल स्टेटस मिळू नये म्हणून अविरत प्रयत्न करत असतात. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मणिपूर संस्थान भारतात विलीन होताना मैतेईना ट्रायबल स्टेटस होता पण चर्चच्या दबावात येऊन तत्कालीन केंद्र सरकारने तो दर्जा काढून घेऊन फक्त कुकी-नागांना ट्रायबल स्टेटस कायम ठेवला होता.

न्यायालयाचा आदेश –

मैतेई हिंदूंना शेड्युल्ड ट्राईब(scheduled tribes) गटात समाविष्ट करण्यासंदर्भात दाखल २०१२ सालातल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान इंफाळ उच्च न्यायालयाने मणिपूर राज्य सरकारला आदेश दिला कि राज्य सरकारने २९ मे पर्यंत केंद्रीय जनजाती मंत्रालयाला मैतेई समुदायाला ट्रायबल गटात समाविष्ट करण्यासंबंधी आपल्या शिफारसी सादर कराव्यात. या आदेशाने चर्च प्रचंड अस्वस्थ झालं. या आदेशाविरोधात बुधवारी ३ मे ला मणिपूरच्या सर्व १० ट्रायबल बहुल जिल्ह्यात “ट्रायबल सॉलिडॅरिटी मार्च” आयोजित केले होते.

मागच्या आठवड्यात मणिपुरी मुख्यमंत्री बिरेन सिंग (Biren Singh) यांच्या चुराचांदपूर दौऱ्याच्या आधी ट्रायबल फोरमने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त बांधलेलं स्टेज आणि अन्य इमारती जाळून खाक केल्या. शिवाय जिल्ह्यात “टोटल शटडाऊन” ची घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकार, रिझर्व्ह फॉरेस्ट भागातून झालेली अतिक्रमणे बळाचा वापर करून मोकळी करत आहे कारण यात म्यानमारच्या चिन समुदायाचे अतिरेकी गट, मणिपुरी कुकींच्या नावाखाली आपले अड्डे स्थापन करत आहेत. याच्या माध्यमातून चिन आणि कुकी अतिरेकी या जंगली भागात गांजा, अफू आदी अमली पदार्थांचा व्यापार आणि अख्ख्या भारतात तस्करी करतात. सध्या मणिपूर आणि मिझोराम( mizoram) भारतातल्या अमली पदार्थ व्यापाराची मुख्य उगमस्थाने म्हणून पुढे येण्यामागे हि कारणे आहेत.
म्यानमारच्या सैनिकी सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष करणारे ख्रिश्चन अतिरेकी गट, म्यानमार सैन्याच्या दाबातून मोकळा श्वास घेण्यासाठी मणिपुरी कुकी भागात घुसू नयेत म्हणून राज्य सरकार हि मोहीम राबवत आहे, त्याच्या विरोधात चर्च आपली नेहमीची तंत्रे वापरून आगीत तेल ओतत आहे.

मार्च महिन्यात राज्य सरकारची त्रिपक्षीय युद्धबंदीतून माघार –

कुकी- झोमी गटातून राज्य विधानसभेत १० आमदार आहेत यापैकी काही सत्ताधारी भाजपचेही आमदार आहेत. तरीही कुकी लोकांची कुकी नॅशनल आर्मी आणि झोमींची झोमी लिबरेशन आर्मी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या दशकभर जुन्या त्रिपक्षीय युद्धबंदीतून राज्य सरकारने मार्चमध्ये माघार घेतल्याने तणाव वाढत जात होता. इंफाळ उच्च न्यायालयाच्या आदेशाने यात अजून एका कारणाची भर पडली आणि हिंसाचार सुरु झाला.

षडयंत्र चर्चचं आणि झळ सामान्य नागरिकांना –

चर्चने (christian missionaries) म्यानमार चिन वांशिक अतिरेकी संघटनांच्या ड्रग आणि शस्त्र व्यापाराच्या हितासाठी आणि मणिपुरी मैतेईना ट्रायबल स्टेटस मिळू नये म्हणून हा हिंसाचार भडकावला. सुरुवातीला ट्रायबल बहुल हिल्स जिल्ह्यातून मैतेई हिंदूंना अचूक हल्ल्यांच्या टार्गेटवर आणून प्रचंड मनुष्यहानी आणि स्थावर मालमत्तेची हानी सहन करावी लागली. त्याची आग लगेच मैतेई हिंदू बहुल इंफाळ व्हॅलीत पोचली आणि तिथून कुकी वस्त्या बघता बघता उध्वस्त झाल्या. आजपर्यंत ४०,००० पेक्षा जास्त नागरिक विस्थापित आहेत आणि जम्मू काश्मीरच्या बाहेर झालेली सर्वाधिक सैन्य तैनाती गेल्या ४ दिवसात मणिपूरला झाली आहे. मुंबई, झारखंड, पंजाब, दिल्ली, आसाम इत्यादी ठिकाणाहून वायुसेनेच्या विमानांनी युद्धपातळीवर सैन्य आणि अर्धसैनिक दलांच्या १२० पेक्षा जास्त बटालियन्स मणिपूरला नेल्या आहेत आणि अजूनही नव्या बटालियन्स रोज तिथे तैनात केल्या जात आहेत.

चर्चच्या उलट्या बोंबा –

आधी आग लावायची आणि मग आपण पीडित आहोत अशी बोंब मारायची हि चर्च आणि बदमाश ख्रिश्चन नेतृत्वाची जुनी सवय आहे.

जेव्हा हिल्स जिल्यांमध्ये मैतेई हिंदू जळत, विस्थापित होत होते, तेव्हा चर्च याला “एथनिक कॉन्फ्लिक्ट” म्हणजे वांशिक संघर्ष म्हणत होतं आणि जेव्हा मैतेई हिंदूंनी इंफाळ व्हॅलीत चर्च आणि ख्रिश्चन समुदायाला सव्याज परतफेड केली, तेव्हा आता “ट्रायबल चर्चेस फोरम मणिपूर”, “कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया”, “काउन्सिल ऑफ बाप्टिस्ट चर्चेस इन नॉर्थ ईस्ट इंडिया” हे सगळे एरवी आपापसात उरावर बसणारे ख्रिश्चन फोरम्स “ख्रिश्चन परसिक्युशन” अर्थात ख्रिश्चन समुदायावर मणिपूरमध्ये सामूहिक अत्याचार होत आहेत म्हणून आरडाओरडा करत आहेत. लवकरच यात जागतिक ख्रिश्चन समुदाय उडी घेऊन अभियान सुरु करेल.

चर्च अजेंडा उघड करण्याची गरज –

बुद्धिस्ट राजवटीविरोधात लढणाऱ्या म्यानमारी चिन वांशिक ख्रिश्चन अतिरेकी संघटना, त्यांचा मणिपूरमधील अवैध ड्रग्ज व्यापार, संपूर्ण भारतात मिझो-मणिपुरी- म्यानमारी ख्रिश्चन अतिरेकी संघटनांनी विणलेलं ड्रग व्यापाराचं मजबूत जाळं यांचं संरक्षण करणे आणि मैतेई वैष्णव हिंदूंना ट्रायबल स्टेटस नाकारून कोपऱ्यात गाठून त्यांचं धर्मांतरण करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणं यासाठी हा भीषण रक्तरंजित खेळ चर्च खेळत आहे. उर्वरित भारतात शिक्षण, आरोग्य, मानवता यांचे पांढरे बुरखे घालून फिरणारे फादर, सिस्टर्स अव्वल दर्जाचे काळे, उलट्या काळजाचे, समाजविघातक गुन्हेगार आहेत. शस्त्र, ड्रग तस्करी आणि फुटीरतावादी अतिरेकी गटांना भारतीय सैन्यापासून वाचवण्यासाठी मानवाधिकार उल्लंघनाच्या नावाखाली ढाल पुरवणं आणि गरीब हिंदूंचं धर्मांतरण करणं हे त्यांचे खरे उद्योग आहेत. भारतीयांनी या बाबतीत सावध राहून यांचा अजेंडा मिळेल त्या माध्यमातून जगासमोर आणला पाहिजे!

लेखक :- विनय जोशी
(ICRR- Radical Ideologies)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02ynp8tynkcCbf4Ff9E3UDnLsyEhpUj1JbEyGbhkZ16XhdwmoRyZfwBZfNFsswEsuSl&id=593503448&mibextid=Nif5oz

Back to top button