HinduismNewsReligion

हिंदू तेजा जाग रे…. भाग २

अगदी वर्षभरापूर्वी ‘द काश्मीर फाईल्स’ (the kashmir files) नावाच्या विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाने भारतीय समाजमन ढवळून काढले. आता मागील महिन्यात ‘द केरळ स्टोरी’(the kerala story) या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. हे दोन्ही चित्रपट भारतीय समाजापुढील दोन ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणारे आहेत. हे प्रश्न विशेष करून हिंदू समाजापुढील प्रश्न आहेत. आमच्या देशाच्या नेते मंडळींनी सर्वधर्मसमभावाचे अत्यंत चुकीचे तथाकथित तत्त्व या देशाच्या जनतेपुढे मांडले, अजूनही मांडताहेत. यात कदाचित त्या नेत्यांचा या तत्त्वावर प्रामाणिक विश्वास असेलही. परंतु जगात फक्त चांगुलपणावर सन्मानाने जगता येत नाही. व्यक्तीच्या तसेच समाजाच्या चांगुलपणाचा गैरफायदा इतर समाजांनी घेतल्याची अनेक उदाहरणे इतिहासात सहजपणे सापडतात. त्यामुळे हिंदू तत्त्वज्ञान साम, दाम, दंड, भेद असे सगळे मार्ग वापरण्याचा सल्ला देते. आमच्या काही नेत्यांना नेमका याचाच विसर पडला होता, असेच दुर्दैवाने म्हणावे लागते.

या जगात आजच्या घडीला अस्तित्वात असलेले मोठे धर्म म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदू धर्म होत. जागतिक पातळीवर जरी हे चार धर्म असले, तरी आपल्या देशाच्या पातळीवर मात्र तीनच धर्म मानावे लागतात. कारण एक तर बौद्ध धर्म भारतातूनच इतर देशांमध्ये गेला. दुसरं म्हणजे हिंदू आणि बौद्ध धर्माची आधारभूत तत्त्वे ही एकच आहेत. जसे पुनर्जन्म, अपरिग्रह, ध्यान, व्यक्तिगत आध्यात्मिक प्रगती इत्यादी. त्यामुळेच भारतात तरी बौद्ध, जैन, शीख हे वेगळे धर्म न मानता हिंदू धर्माचे पंथ मानले पाहिजेत. तसेच जगात भारताइतकी विविधता असलेले देश आज अस्तित्वात नाहीत. अनेक धर्म, अनेक उपासना पद्धती, अनेक पंथ, अनेक भाषा, अनेक प्रथा-परंपरा अस्तित्वात असूनही एकसंध असलेला देश म्हणजे भारतराष्ट्र होय.

तलवारीच्‍या बळावर जगातील ५७ देश झाले इस्‍लामी !

जगातील मुसलमानांविना अन्‍य धर्मियांना काफीर समजून एक तर त्‍यांना जगातून नष्‍ट करणे किंवा त्‍यांचे धर्मपरिवर्तन करून त्‍यांना इस्‍लाम धर्माची दीक्षा घेण्‍यास बाध्‍य करणे, यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या मार्गांचा अवलंब करणे, हा इस्‍लाम धर्माच्‍या अनुयायांचा आणि त्‍याच्‍या निर्मितीपासूनचाच मुख्‍य विषय (अजेंडा) आहे. इतिहासाकडे नजर टाकली, तर ही वास्‍तविकता लक्षात येईल.

https://www.quora.com/If-Islam-is-a-religion-of-peace-why-did-it-spread-by-the-sword-instead-of-by-peace

वर्ष ६१० मध्‍ये या इस्‍लाम धर्माची स्‍थापना झाली आणि अवघ्‍या १ सहस्र ४०० वर्षांत या जगातील ५७ देश इस्‍लामी झाले. या ५७ देशांत जे अन्‍य धर्मीय होते त्‍यांचा, त्‍यांची प्रार्थनास्‍थळे, सभ्‍यता आणि संस्‍कृती यांचा पूर्णपणे विच्‍छेद करण्‍यात आला. या ५७ देशांतील सर्व प्रजेसमोर मुसलमान आक्रमकांनी ३ पर्याय ठेवले. पहिला पर्याय ‘इस्‍लामचा स्‍वीकार करा’, दुसरा पर्याय ‘या भूमीवरून अन्‍यत्र निघून जा’ आणि तिसरा पर्याय, म्‍हणजे ‘वरील दोन पर्याय मान्‍य नसतील, तर मरणाला सिद्ध रहा.’ या पर्यायानुसार काही जणांनी इस्‍लामचा स्‍वीकार केला, काही जण आपला धर्म वाचवण्‍यासाठी नेसत्‍या वस्‍त्रासह अन्‍य देशांत पळून गेले, तर काही धर्मासाठी लढता लढता मेले. अशा प्रकारे ५७ देश तलवारीच्‍या बळावर मुसलमान झाले.

जगाचा विचार केला तर ५७ देश हे मुस्लिम धर्मीय आणि मुस्लिमबहुल आहेत. उरलेले ८०-९० देश हे ख्रिश्चन आहेत. काही देश बौद्धबहुल आहेत. तर, भारत आणि नेपाळ हे दोनच देश हिंदूबहुल आणि हिंदूंचे आहेत. भारत देशाची फाळणी धर्माच्या आधारावर करण्यात आली आणि या देशातील स्वप्नाळू (खरं तर बावळट) नेतृत्वाने ती मान्यही केली. त्या पुढे जाऊन मुस्लिम धर्मीय लोकांनी देश सोडून जाऊ नये, या देशातच राहावे म्हणून त्यांच्या विनवण्या केल्या, वरून फाळणीच्या भळभळत्या जखमा घेऊन, जीव वाचवण्यासाठी भारतात आलेल्या हिंदूंनी, निवाऱ्यासाठी म्हणून व्यापलेल्या दिल्लीतील मशिदी पोलिसांकरवी त्वरित रिकाम्या करून देण्यात याव्यात, असा आंधळा हट्ट धरला गेला.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला कबूल केलेले ५५ कोटी त्यांना लगेचच दिले पाहिजेत, अशीही मागणी केली गेली. परिणामी इथे समंजस, उदार, सर्वांना सामावून घेणारा, भविष्यगामी, भिरू आणि होय बराचसा नेभळा असा एक हिंदू समाज आकाराला आला. दुसरा संख्येने कमी पण आक्रमक, देशाप्रती निष्ठा नसलेला, आढ्यताखोर, पराजीत असूनही स्वतःला विजयी समजणारा, बेदरकार, बेमुर्वतखोर, बेईमान,धर्मांध,जिहादी असा मुस्लिम समाज असे दोन समाज गट निर्माण झाले.

त्यापुढे जाऊन या देशाच्या परंपरा, संस्कृती, वैशिष्ट्य नाकारणाऱ्या नेतृत्वाने मतांसाठी देशातील हिंदू समाजाला विभागण्याचे तर मुस्लिम समाजाच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करण्याचे धोरण वापरले. परिणामी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व कागदावरच राहिले आणि ‘अर्धा तासासाठी पोलिस काढून घ्या, मग बघू’ अशा वल्गना करणारा, अरेरावी, मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून दूर गेलेला मुस्लिम समाज अस्तित्वात आला. हा मुस्लिम समाज सर्व अर्थांनी अशिक्षित आहे. याला धडपणाने हिंदी भाषा येत नाही. शिक्षणाचा चांगलाच अभाव असलेला आहे. त्यामुळे आमच्या देशातील मुसलमानांना ना उर्दू भाषा समजत, ना इंग्रजी भाषा समजत, ना कुठलीही भारतीय भाषा समजत. अर्थात अरबी आणि फारसी भाषा तर यांच्यापासून कोसो दूर आहेत.

क्रमशः

Back to top button