HinduismNews

काशी विश्वनाथ मंदिर ज्ञानवापी परिसराच्या पुरातत्व सर्वेक्षणास परवानगी

वाराणसी, दि. ८ एप्रिल : काशी विश्वनाथ मंदिर ज्ञानवापी परिसराच्या पुरातत्व सर्वेक्षणसाठी मंजूरी मिळाली आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी परिसर प्रकरणात डिसेंबर २०१९ पासून पुरातत्व सर्वेक्षण करण्याबाबत न्यायालयात वाद सुरू झाला. त्यानुसार वाराणसी फार्स्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश आशुतोष तिवारी यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून या संदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

डिसेंबर 2019 मध्ये अधिवक्ता विजय शंकर रस्तोगी यांनी स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वर यांच्या वतीने दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे (एएसआय) संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली होती.

यानंतर, जानेवारी 2020 मध्ये, अंजुमन इंतजामिया मशिदी समितीने ज्ञानवापी परिसराचे एएसआय सर्वेक्षणांच्या मागणीसाठी प्रतिवाद दाखल केला. पहिल्यांदा 1991 मध्ये ज्ञानवापी येथे पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वर यांच्या वतीने वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने असा दावा केला आहे की काशी विश्वनाथ मंदिर सुमारे औरंगजेबाने नष्ट केले आणि या मंदिराच्या अवशेषांचा वापर मशिद बांधण्यासाठी करण्यात आला.

Back to top button